Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
मागील महिन्यात कुणाल भंडारी यांची समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड झालेली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत आता कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे बागेश्वर धामचे महंत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री कुणाल भंडारी यांची बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी बढती केली आहे.
सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा यावेळी प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांनी व्यक्त केली.