Maharashtra Politics: तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 05 डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेला होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी महायुती सरकारच्या काळात मंत्री असणाऱ्या अनेक नेत्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणाला मंत्रीपदाची संधी मिळू शकते.
(संभाव्य मंत्री)
भाजप
- गिरीश महाजन
- रविंद्र चव्हाण
- चंद्रशेखर बावनकुळे
- संजय उपाध्याय
- योगेश सागर
- देवयानी फरांदे
- अनुप अग्रवाल
- संजय कुटे
- चैनसुख संचेती
- नितेश राणे
- माधुरी मिसाळ
- गणेश नाईक
- शिवेंद्रराजे भोसले
- श्रीजया चव्हाण
- स्नेहा दुबे
शिवसेना
- उदय सामंत
- तानाजी सावंत
- शंभूराजे देसाई
- दादा भुसे
- गुलाबराव पाटील
- राजेश क्षीरसागर
- आशिष जैस्वाल
- प्रताप सरनाईक
- संजय शिरसाट
- भरत गोगावले
राष्ट्रवादी काँग्रेस
- आदिती तटकरे
- हसन मुश्रीफ
- छगन भुजबळ
- धनंजय मुंडे
- धर्मरावबाबा अत्राम
- अनिल पाटील
- दत्ता भरणे