Chandrashekhar Bawankule : जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसांत करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे जमीन मोजणीचे कोट्यवधी प्रकरणे आता मार्गी लागणार आहे.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी व सिमांकन आणि मालकीहक्कासाठी मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक
मोजणी प्रकरणांचा 30 दिवसांत निपटारा करण्यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात जमीन मोजणी फक्त 30 दिवसात होणार आहे.