Dnamarathi.com

Kangana Ranaut:  बॉलीवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. सिमला उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली. याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी आरोप केला आहे की मंडीतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग ऑफिसरने चुकीच्या पद्धतीने नाकारला.

नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना राणौतकडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.

जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

माजी सरकारी कर्मचारी आणि किन्नौरचे रहिवासी असलेले लायक राम नेगी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नेगी म्हणाले की त्यांनी 14 मे रोजी निवडणूक अर्ज दाखल केला आणि 15 मे रोजी इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना स्वीकारले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी नोटीस बजावली आणि रणौत यांना 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

कंगना रणौतच्या निवडीला लायक राम नेगी यांनी आव्हान दिले आहे, ज्यांनी म्हटले आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या उपायुक्तांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून चुकीच्या पद्धतीने नाकारला होता. वनविभागातील निवृत्त कर्मचारी नेगी यांनी उपायुक्तांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. हिमाचलच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता.

या दोघांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. कंगनाने विक्रमादित्य सिंगचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑगस्टला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *