IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.
या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.
आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.
आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल.
गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.
मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे.
हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.