Dnamarathi.com

Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा भारतीय संघात दिसणार आहे. ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मैदानाबाहेर आहे. यामुळे तो मैदानावर कधी परतणार याची चर्चा सध्या सूरू आहे.

 तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत IPL 2024 मध्ये खेळताना दिसू शकतो. असे झाल्यास दिल्ली कॅपिटल्ससाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असेल. मात्र अद्याप त्याच्या पुनरागमनाबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दावे केले जात आहेत.

ऋषभ पंत रस्ता अपघातात जखमी झाला होता

संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. एवढेच नाही तर दुखापतीमुळे तो वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघात सहभागी होऊ शकला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *