DNA मराठी

Sawedi land Scam सावेडीतील जमीन फेरफार प्रकरणात चौकशी, फेरफार रद्द करण्याची मागणी

land case in sawedi scam

Sawedi land Scam प्रकरणाचा निर्णय प्रशासनाकडून चौकशी अहवालाच्या आधारे घेतला जाणार आहे. ही चौकशी कुळकायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची ठरणार असून फेरफार रद्द होतो की नाही याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

Sawedi land Scam अहिल्यानगर – मौजे सावेडी येथील सर्वे नं. २४५/ब२ या मिळकतीच्या फेरफार क्रमांक ७३१०७ (मंजूर दिनांक १७ मे २०२५) संदर्भात सखोल चौकशी सुरू झाली आहे. अर्जदार अजीज डायाभाई व साजीद डायाभाई यांच्या वतीने जनरल मुखत्यार रमाकांत नामदेव सोनवणे यांनी उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांचेकडे २३ जून २०२५ रोजी फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे.


या अर्जात म्हटले आहे की, सदर फेरफार हा मा. दुय्यम निबंधक, अहमदनगर १ दक्षिण यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक ४३०/१९९१, दिनांक १५ ऑक्टोबर १९९१ च्या आधारावर मंजूर करण्यात आला असून, तो खरेदी व्यवहार कुळकायद्याच्या अटींचे उल्लंघन करून आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा फेरफार रद्द करून न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


यासंदर्भात मंडळ अधिकारी सावेडी यांनी दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित सर्व पक्षकारांना आवश्यक कागदपत्रांसह लेखी म्हणणे सादर करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खरेदीदारांचे जनरल मुखत्यार गणेश शिवराम पार्चाणे यांनी दि. ११ जुलै २०२५ रोजी अर्ज सादर करून सदर प्रकरण त्यांचेकडे चौकशीसाठी वर्ग करावे, अशी मागणी केली होती.

त्यानंतर चौकशी अहवालासाठी हे प्रकरण अप्पर तहसीलदार नगर यांच्याकडे वर्ग करताना त्या नंतर, १६ जुलै २०२५ रोजी आयोजित सुनावणीवेळी मंडळ अधिकारी सावेडी यांनी या प्रकरणावरील आपला लेखी अहवाल सादर केल्याचे समजते,

फेरफार क्रमांक ७३१०७ अन्वये खरेदी दस्ताचा अंमल ७/१२ उताऱ्यावर घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रकरणाचा निर्णय प्रशासनाकडून चौकशी अहवालाच्या आधारे घेतला जाणार आहे. ही चौकशी कुळकायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची ठरणार असून फेरफार रद्द होतो की नाही याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.