IMD Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता मात्र आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही काही भागात वातावरणात आर्द्रता आणि ढगाळपणा राहील त्यामुळे अचानक वादळी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात 18 ऑक्टोबरपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके वाऱ्यापासून आणि पावसापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच उघड्यावर ठेवलेले धान, भुसा किंवा जनावरांचे खाद्य झाकून ठेवावे आणि हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.