Oscar 2026 : नीरज घायवान यांचा “होमबाउंड” हा चित्रपट 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी निवडला गेला आहे. याबाबत माहिती देताना चित्रपटाचे निर्माते करण जोहर भावूक झाला.
त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “‘होमबाउंड’च्या प्रवासाबद्दल मी किती अभिमानी, उत्साहित आणि आनंदी आहे हे शब्दात कसे व्यक्त करावे हे मला कळत नाही. आमच्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट आल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. नीरज, आमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवल्याबद्दल धन्यवाद. कान्सपासून ऑस्करसाठी निवड होण्यापर्यंतचा हा एक अद्भुत प्रवास होता. संपूर्ण कलाकारांना प्रेम.
“होमबाउंड” चित्रपटाची स्टोरी काय?
“होमबाउंड” ही बालपणीचे मित्र शोएब (ईशान) आणि चंदन (विशाल) यांची कथा आहे, ज्यांची पोलिस दलात सामील होण्याची इच्छा त्यांच्या जीवनाला आणि निर्णयांना आकार देते. हा चित्रपट मैत्री, कर्तव्य आणि तरुण भारतीयांना तोंड द्यावे लागणारे सामाजिक दबाव या विषयांवर प्रकाश टाकतो आणि जान्हवी कपूर देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
कोणते चित्रपट नामांकित झाले ?
98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी पुढील फेरीच्या मतदानासाठी पंधरा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या यादीत अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट्स केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटिमेंटल व्हॅल्यूज”, पॅलेस्टाईनचा “पॅलेस्टाईन 36”, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सिरात”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.






