IMD Alert : देशातील अनेक भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. केरळच्या वायनाड आणि हिमाचल प्रदेशात गेल्या आठवड्यात झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या अनुक्रमे 221 आणि 13 वर पोहोचली आहे.
उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंसह 370 हून अधिक लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमध्ये काही इमारतींचे नुकसान झाले आहे, तर गंदरबल जिल्ह्यात ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीमुळे श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. महामार्ग बंद झाल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा लडाखशी संपर्क तुटला आहे.
पूर्व, उत्तर-पूर्व, उत्तर भागात पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने सोमवारी देशाच्या पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उप-हिमालयीन जिल्ह्यांमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, कालिम्पॉन्ग, जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालमधील पूर्व आणि पश्चिम वर्धमान, बीरभूम, बांकुरा, पुरुलिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार किंवा हलका पाऊस पडू शकतो.
झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातील काही नद्यांना पूर आला आहे. शेजारील राज्य पश्चिम बंगालमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस झाला.
उत्तराखंडमधील क्षतिग्रस्त केदारनाथ यात्रा मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना वाचवण्याचे बचावकार्य रविवारी सलग चौथ्या दिवशीही सुरू राहिले. केदारनाथ बचाव मोहिमेच्या चौथ्या दिवशी 10,374 लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
पुण्यातील पाणी तुंबलेल्या निवासी भागात लष्कर तैनात
खडकवासला धरणातून मुसळधार पाऊस आणि पाणी सोडल्यानंतर शहरातील पाणी तुंबलेल्या निवासी भागात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला.