Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे.
गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे.
राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.