Kotla Crime : नगर शहरातील कोठला परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री गोळीबाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,
राज चेंबर समोर बुधवारी (ता. 11) रात्री सव्वाअकरा वाजता गोळीबार झाला. यात अबरार मुख्तार शेख हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यदने, अबरारवर गोळीबार केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोठला परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. परिसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.






