DNA मराठी

Evangeline Booth Hospital : माजी परिचारिका विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा

Evangeline Booth Hospital: इव्हॅनजलीन बूथ हॉस्पीटल, येथे नर्सिंग स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा थाटात संपन्न झाला. फेब्रुवारी 1943 साली बूथ हॉस्पीटल मध्ये नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. दर्जेदार प्रशिक्षणाची परंपरा असलेले या संस्थेतून जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले, आणि महाराष्ट्रात, भारतात, आणि जगातील विविध भागात सेवा देत आहेत. आजही येथिल विद्यार्थ्यांची देशात आणि परदेशात अधिक मागणी आहे. काहीं कार्यरत आहेत तर काही निवृत्त झाले आहेत.

रूग्ण सेवेचा वारसा असलेल्या बूथ हॉस्पीटल चे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या स्नेहसंमेलना साठी देशाच्या विविध भागातील आणि परदेशात वास्तव्यास असणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते. जवळपास 40 वर्षानंतर ते सर्व अशाप्रकारे एकत्र आले होते.

एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, भेटल्यानंतर ओळखता येईल का? असा प्रश्न घेउन आलेले सर्व एकमेकांना पाहून भावूक झाले. त्यांची ती गळाभेट, डोळ्यात तरळलेले अश्रू पाहून पाहणाऱ्यांच्या पापण्याच्या कडा ओल्या झाल्या.

कार्यक्रमाची सुरुवात जरी भावनिक वातावरनात झाली तरी पुढे जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं. गाणं , नृत्य जुन्या आठवणींना बूथ हॉस्पीटल ची शाळा 40 वर्षानंतर पुन्हा भरली. प्रीती भोजनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी माजी परिचारिका विद्यार्थी यांनी मोलाचा सहभाग दिला, त्यात काही स्थानिक विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच नर्सिंग स्कूल च्या प्राध्यापक मल्लिका साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या कार्यक्रमासाठी हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि मेजर ज्योती कळकुंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सेवा निवृत्त कमिशनर लहासे आणि त्यांच्या पत्नी कमिशनर कुसुम लहासे, कॅप्टन डेनिसन परमार, कॅप्टन निलम परमार, कॅप्टन सुहास वाघमारे आणि कॅप्टन प्रिया वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *