मुंबई | प्रतिनिधी –
Khalid Ka Shivaji – ‘खालिद का शिवाजी’ या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे कथित अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप केला आहे, हिंदू महासंघाने राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. यामुळे काही शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यानही याचे पडसाद उमटले आहेत.
मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर शहरांत महासंघाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, “छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत, चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी आंदोलनं चिघळू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, प्रशासनाने शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले कि “शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान होऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे, ही निवडणूकपूर्व औपचारिक प्रतिक्रिया आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय.
दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ या वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाचे निर्माते पुढे येत, “चित्रपटाचा उद्देश कोणत्याही समाजगटाला दुखावण्याचा नाही. अशी भूमिका घेतली आहे, कृपया संपूर्ण चित्रपट पाहिल्यावरच निष्कर्ष काढावा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
थोडक्यात:
- ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर शिवरायांच्या अपमानाचा आरोप
- हिंदू महासंघाचे राज्यभर निदर्शने, काही भागांत तणाव
- मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे संकेत दिले, मात्र संघटना संतप्त
- चित्रपट निर्मात्यांचे स्पष्टीकरण – हेतू अपमानाचा नव्हता






