Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत. हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या.
नवीन नियम काय?
कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल.
नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे.
हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल.
17 जूनपासून लागू होणार नवीन नियम
हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल.
बनी हॉप्स म्हणजे काय?
सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.