Chandrashekhar Bawankule : चंद्रपूर महापालिकेत कुणाचा महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेससह भाजप देखील महापौर पदासाठी प्रयत्न करत असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरच्या जनतेची इच्छा महापौर भाजपाचा व्हावा असं म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज किंवा उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटी बैठक होणार असून त्यामध्ये गट नोंदणीवर निर्णय होणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमत कोणाकडेच नसल्याने त्या ठिकाणी मोठा पेच आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने चंद्रपूरच्या जनतेची इच्छा आहे. महापौर भाजपाचा व्हावा त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून मोठा सहकार्य मिळेल असा एक सूर आहे. त्यावर आम्ही करत आहोत. सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही महापौर बनविण्यासाठी काम करू असं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई महापालिकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
संघर्ष किंवा स्पर्धा नाही तर चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे, अजित पवार एकत्र बसून योग्य पद्धतीने राज्यातील 29 पालिकेत महायुतीचा महापौर बसेल असा आमचा प्रयत्न राहील असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.






