Vijay Wadettiwar: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार आणि महापौर काँग्रेसचा असणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र दुसरीकडे भाजप देखील चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी प्रयत्न करत असल्याने महापौर कुणाचा याबाबत सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपुरात सत्ता काँग्रेस स्थापन करणार आहे. काँग्रेसचा महापौर होणार ते कसे होईल हे येणारा काळ सांगेल.
कोण कोणाला भेटले ते आम्हालाही भेटून गेले. भाजपने मुस्लिम लीग सोबत युती केली तर बरोबर आम्ही केली तर चालत नाही. अचलपूरमध्ये भाजपने सत्तेसाठी युती केली आम्ही स्वीकृत नगरसेवक पदासाठी केली तर त्यात चूक काय? असं माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले.
तर मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आता जुळवाजुळव सुरू आहे, वाद आहे. सत्ताधाऱ्यांमध्यें वाद आहे. अजूनही तिथे एकमत नाही. आपसांत बेबनाव आहे. आपसांत पदावरून मारामाऱ्या आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
तर दुसरीकडे यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील निशाणा साधला. विजय वडेट्टीवार म्हणाले की,
मुनगंटीवार यांचे स्वप्न कुठे आहे हे माहीत नाही. सुधीर भाऊंच्या बानामध्ये आता तीर नाही. आमचे नगरसेवक कुठेही जाणार नाही. माझ्याकडे 20 नगरसेवक आहेत.
गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल
यांचा बाबासाहेबांना विरोध आहे, संविधान निर्माण करताना त्याला विरोध करणारी ही मंडळी आहे. आंबेडकरांचे नाव घ्यायला लाजच वाटते, या देशात राहण्याचा अधिकार आहे, जे संविधानाला मनात नाही ते खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहेत का? संविधान निर्मात्याचे नाव घ्यायला लाज वाटते तर हे हुकूमशाही की लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले याचे उत्तर सरकार मागेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले.






