DNA मराठी

राजकीय

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल

Eknath Shinde: उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. उबाठा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केले. उबाठा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्याना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात नवी मुंबईतील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेविका मेघाली राऊत, शिवसेना उबाठा गटाचे कोपरखैरणेचे विभागप्रमुख मधुकर राऊत आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे. दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट धरली.यात उबाठा गटाच्या माजी नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी नगरसेविका दीपा पामळे, उबाठा शहरप्रमुख प्रवीण पाटील, माजी नगरसेवक तुषार भानुशाली, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील, युवासेना शहर संघटक निमिष पाटील तसेच डहाणूतील आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष विराज गडग यांनी आज पक्षप्रवेश केला. तर धुळे जिल्ह्यातून माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संदीप चव्हाण, चंद्रकांत मस्के, मनीषा शिरोळे, आधार हाके आदी पदाधिकारी, तर धुळे शहरातील माजी नगरसेवक नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, पुरुषोत्तम जाधव, शेखर दुधाने, धुळे ग्रामीण मधील संजय माळी, सुधाकर पाटील, किशोर माळी, किशोर देवरे, साक्री शहरातील महावीर जैन, नितीन गायकवाड, महेश खैरनार, हर्षल माळी तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व वर्गातील नागरिकांनी शिवसेनेची भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीत आपल्या पक्षाचे 57 आणि 3 सहयोगी पक्षाचे असे 60 उमेदवार निवडून आले. त्यामुळे जनतेने शिवसेनेची साथ दिली असून, खरी शिवसेना कुणाची आहे हेदेखील दाखवून दिले असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Eknath Shinde: ठाकरेंना धक्का अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल Read More »

Maharashtra Politics: शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात इलेक्शन पिटीशन दाखल

Maharashtra Politics: एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे पराभूत उमेदवार कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात कैलास गोरंटयाल यांच्याकडून इलेक्शन पिटीशन दाखल करण्यात आली आहे. अर्जुन खोतकरांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचा आरोप या याचिकेत कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने खोतकरांचा अर्ज आक्षेपानंतरही कायम ठेवल्याचा गोरंटयाल यांचा आरोप आहे. तर दुसरीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिका दाखला करण्यात आली असल्याची माहिती गोरंटयाल यांनी दिली आहे. तसेच न्यायदेवता आम्हाला योग्य न्याय देईल अशी अपेक्षाही गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Politics: शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात इलेक्शन पिटीशन दाखल Read More »

Suresh Dhas : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मीटिंग अन् अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी, सुरेश धस यांचा धक्कादायक दावा

Suresh Dhas : 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, 14 जून 2024 वाल्मिक कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांचे पीए जोशी त्यांच्या माध्यमातून अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्याबोरबर संधान साधत होते परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचे वाल्मिक कराड यांनी काम बंद पाडले. तसेच धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली त्यापैकी दोन कोटींच्या खंडणीची डील झाली असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला. पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज आहे, पोलिसांनी त्याला पकडले तर यातील बरेचसे राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये निवडणूक काळात यांनी त्या कंपनीकडून घेतले, उर्वरीत दीड कोटीच्या मागणीसाठी गेले तेव्हा वॉचमनला मारले तेव्हा संतोष देशमुख तिथे मध्ये गेला आणि त्यांचा अमानवीय कृत्य करुन मर्डर केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. नितीन कुलकर्णी नावाचा आका वाल्मिक कराड यांचा पीए आहे तो 17 मोबाईल नंबर वापरतो, नितीन कुलकर्णीला अटक करुन 17 मोबाईल जप्त करा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.

Suresh Dhas : धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर मीटिंग अन् अवादा कंपनीकडे तीन कोटी रुपयांची मागणी, सुरेश धस यांचा धक्कादायक दावा Read More »

Manipur CM N Biren Singh :  I Am Sorry… मणिपूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष…

Manipur CM N Biren Singh : मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गेल्या एक वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल माफी मागितली आहे. येत्या वर्षभरात राज्यात शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, 3 मे पासून राज्यात जे काही घडत आहे त्याबद्दल मला राज्यातील जनतेची माफी मागायची आहे आणि हे संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बिरेन सिंग यांनी गेल्या एक वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल माफी मागितली आणि येत्या वर्षभरात राज्यात शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त केली. सीएम बिरेन सिंह म्हणाले, ‘मला खरोखरच खेद वाटतो. मला माफी मागायची आहे, मला आशा आहे की नवीन वर्ष 2025 मध्ये राज्यात सामान्यता आणि शांतता पूर्ववत होईल.   मणिपूरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या हिंसाचारात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे, तर नागा आणि कुकी लोकसंख्या सुमारे 40 टक्के आहे आणि हा समुदाय पर्वत येथे राहतो. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्तमणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. सोमवारी जिल्ह्यातील सगाईशाबी रोआ परिसरातून ही वसुली करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या वस्तूंमध्ये पिस्तूल, बंदुका, रायफल, एक कार्बाइन आणि हातबॉम्ब यांचा समावेश आहे. अद्याप तपास सुरू आहे.

Manipur CM N Biren Singh :  I Am Sorry… मणिपूर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष… Read More »

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक?

Valmik Karad : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई करत पुण्यातून वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी होत होती. तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्यामुळे वाल्मिक कराडला कधी अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 21 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

Valmik Karad : मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला अटक? Read More »

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Manmohan Singh Death: भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल.

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर Read More »

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले

Former PM Manmohan Singh Death : देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले Read More »

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन

Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन Read More »

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप

Supreme Court: ‘लॉटरी किंग’ प्रकरणात सुनवाई करताना आज देशातील सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार आता ईडीला मोबाईल आणि लॅपटॅाप तपासण्याची अनुमती मिळणार नाही. तसेच ईडीला मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेस देता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही. याच बरोबर आता ईडीला धाड टाकल्यावर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो मार्टिन, त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

मोठी बातमी: जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आदेश प्रभावी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश २१ डिसेंबर २०२४ पासून ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, धारदार हत्यारे, दारुगोळा, स्फोटके किंवा अनुशासन बिघडवणाऱ्या वस्तू बाळगणे व पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. सवलती यांना लागू नाही बंदी: कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 📢 नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »