DNA मराठी

राजकीय

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर Read More »

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Maharashtra Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून जागावाटापाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे या जागेवर कोणता पक्ष उमेदवार देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागू आहे. माहितीनुसार, महायुतीच्या 24 आणि महाविकास आघाडीच्या 33 जागांवर निर्णय होऊ शकलेला नाही. महाआघाडीत आघाडी वाढवण्यासाठी भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा छोट्या पक्षांसाठी सोडल्या आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर काँग्रेस-शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संतुक मारोतराव हुंबर्डे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेसने दिवंगत खासदार रवींद्र चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. जो जास्त जागा जिंकतो तो मुख्यमंत्री होतोज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच मुख्यमंत्री होणार अशी अंतर्गत चर्चा म.वि. यामुळे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तीन घटक पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागांवर निवडणूक लढवण्याचा करार झाला होता, मात्र काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) 84 जागांवर तर राष्ट्रवादीने (शरद) 76 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यातील सुमारे 15 जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने काटेल जागेवर माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्राचे मुंबई-कोकण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुंबईतील पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. भाजपने काल तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीच्या 21 जागांवर सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 146 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय (आठवले) आणि जनसुराज्य शक्ती पक्षासाठी सोडल्या आहेत. कलिना जागेवर आरपीआयने अमरजीत सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस Read More »

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Lahu Kanade : विधानसभा निवडणुकीसाठी आमदार लहू कानडे यांना काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लहू कानडे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी आमदर लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Lahu Kanade : लहू कानडे यांच्या हातात घड्याळ, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त

Maharashtra Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने नगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. भरारी पथकाने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे 3 लाख 84 हजार 300 रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षककरीत आहेत. कायनेटीक चौक येथे 24 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे वाहन क्र.  एमएच 19 ईजी 6311 हे संशयित वाटल्याने वाहनास थांबविण्यात आले. झडती नंतर वाहनाचे चालक आणि सोबतच्या व्यक्तीकडून 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात आतापर्यंत 5.34 हजारांची रोकड जप्त Read More »

Sandeep Kotkar : आरोप खोटे, एन.सी रद्द करा, ‘त्या’ प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Sandeep Kotkar : नगरचे माजी महापौर संदिप कोतकर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेली खोटी एन.सी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले. माजी महापौर संदिप कोतकर केडगाव येथे येऊन केडगांव देवीचे दर्शन घेतले मात्र त्यांच्या विरोधात संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी खोटी माहिती पसरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात आणि इतर २०० लोकांविरोधात एन.सी. दाखल केली मात्र एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल करण्यात आल्याने ही एन.सी. रद्द करण्यात यावी तसेच खोटी एन.सी. दाखल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाली पोलीस स्टेशन येथे खोट्या घटनेची दि. २४/१०/२०२४ रोजी दाखल केलेली एन.सी. रद्द करुन खोटी एन.सी./तक्रार केल्याने संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आम्ही सर्व नागरीक आपणास निवेदन करु इच्छितो की, आम्ही सर्व नगर येथील राहणारे असून नगरचे माजी महापौर  संदिप कोतकर हे नगर येथे आल्यामुळे त्यांचे केडगांव ग्रामस्थ यांनी स्वागत करुन भेट घेतली तसेच त्यानंतर त्यांनी केडगांव देवीचे दर्शन घेऊन ते त्यांचे केडगांव येथील निवास स्थानी निघून गेले. अशाप्रकारे परिस्थिती असताना संग्राम संजय कोतकर व इतर दोन यांनी दुषीत हेतूने प्रेरीत होऊन कुकारस्थान रचण्याचे उद्देशाने खोटी घटना रचून कोतवाली पोलीस स्टेशन येथे ४२ लोक व इतर २०० लोक अशांविरुद्ध बी.एन.एस. कलम १८९ (२), १९०, २२३, ३(५), ३५१ (२), ३५२ अन्वये तक्रार / एन.सी. नोंदविली आहे. सदरची तक्रार / एन.सी. ही पुर्णतः खोटी असून तशी कोणतीही घटना घडलेली नाही. सदरची एन.सी. ही दुषीत हेतुने प्रेरीत होऊन व काही राजकीय नेत्यांचे दबावा खाली येऊन दाखल केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सदर तक्रार देणारे तक्रारदार यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉर्डोंग तपासून त्यांना संपर्क करणारे संशयीत व्यक्ती व राजकीय दबाव टाकणारे यांचा शोध लागण्यास मदत होईल व साहेबांना सदर प्रकरणाची सत्य परिस्थिती अवगत होईल. एन.सी. दाखल करणारे तक्रारदार हे न्युसेन्सिकल पार्श्वभूमी असलेले व उपद्रवी व्यक्ती असून त्यांना विनाकारण खोट्या केसेस, खटले दाखल करण्याची सवय आहे. अशा उपद्रवी लोकांमुळे परिसरातील आमचे सारख्या नागरीकांना फार त्रास होत आहे व वारंवार आमचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे वरील नोंदविलेल्या खोट्या एन.सी. व तक्रारीची योग्य ती शहानिशा करावी तसेच तक्रारदाराचे मोबाईल कॉल डिटेल्स, रेकॉर्डींग तपासून खोटी एन.सी. दाखल केली म्हणून तक्रारदार व त्याचे बरोबर कटात सामील असलेले संबंधीतांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व सदरची एन.सी. तात्काळ रद्द करण्यात यावी ही साहेबांना नम्र विनंती. सदर तक्रार ही तक्रारदाराने इतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व राजकीय मंडळींना हाताशी धरुन नोंदविल्याचा आम्हाला संशय आहे. असं या निवेदनात म्हटले आहे.

Sandeep Kotkar : आरोप खोटे, एन.सी रद्द करा, ‘त्या’ प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी Read More »

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात

Congress First Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपले सर्व ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आणि साकोली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणार आहे. तर धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. काँग्रेसकडून पुढील एक-दोन दिवसात आपली दुसरी यादी जाहिर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Congress First Candidate List : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर, थोरात संगमनेर तर पृथ्वीराज चव्हाण कराडमधून निवडणुकीच्या रिंगणात Read More »

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात

NCP Second Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आपली दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 38 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये काँग्रेसचे आमदार जीशान सिद्दिकी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जीशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना नेते वरून सरदेसाई विरुद्ध जीशान सिद्दिकी असा सामना रंगणार आहे. तर पक्षाकडून अनुशक्ती नगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जागी पक्षाने आता त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध इस्लामपूर मधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली आहे. तसेच तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय पाटील असा सामना रंगणार आहे. वडगाव शेरीमधून पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके आणि लोहमधून भाजपचे माजी खासदार प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.

NCP Second Candidate List: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, वांद्रे पूर्वमधून जीशान सिद्दिकी तर वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे मैदानात Read More »

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 25 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. तत्पूर्वी सकाळी 10.15 वाजता ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील. त्यानंतर संविधान चौकात येऊन तेथून सकाळी 10.40 वाजता रॅलीला प्रारंभ होईल. सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज नागपूर तहसिल कार्यालयात सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत, तर त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. 1999 पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, आज दाखल करणार उमेदवारी अर्ज Read More »

Sanjay Raut On Mahayuti: 25 ओव्हरचा खेळ बाकी, 175 जागांवर विजय मिळवणार, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

Sanjay Raut On Mahayuti: महाविकास आघाडीचा जागावाटप अंतिम चर्चेत आले असून आम्ही विधानसभा निवडणुकीत 175 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवणार आणि हे आमची बेरीज आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जागावाटपावर आता फार घोळ घालून चालणार नाही.आम्ही 85 पर्यंत आलो आहोत.अजून 25 ओव्हरचा खेळ बाकी आहे. सांगोला, पारांडा इथे शिवसेनेचा आमदार जिंकला आहे. त्यामुळे त्या जागांवर परद्यामागे चर्चा होणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच जागावाटपावरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद नाही. प्रत्येक पक्ष आघडीमध्ये आपल्या ताकदीनुसार आणि जिंकण्याच्या क्षमतेनुसार जागा मागत असतो त्याला वाद म्हणता येत नाही. आम्ही लवकरच जागावाटपाचा तिढा सोडवणार आहोत. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जागा वाटपावरून विरोधकांवर टीका करत संजय राऊत म्हणाले की, महायुतीतील सर्व पक्ष दररोज जीलाब्या खायला बसतात का? त्यांच्यात देखील चर्चा सुरू आहे. असेही संजय राऊत म्हणाले. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Sanjay Raut On Mahayuti: 25 ओव्हरचा खेळ बाकी, 175 जागांवर विजय मिळवणार, संजय राऊतांचा विरोधकांना टोला Read More »