DNA मराठी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलिस अधीक्षक

Ahilyanagar – एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरचे पोलीस (Rakesh Ola) अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज राज्य सरकारने अधिकृतरीत्या याबाबतची माहिती दिली आहे. राकेश ओला(Rakesh Ola) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असताना कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता त्यांना बृहन्मुंबईमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या जागी सोमनाथ घार्गे (Somnath Gharge)यांची अहिल्यानगरच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घार्गे हे यापूर्वीही विविध महत्त्वाच्या पदांवर काम पाहिले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलिस अधीक्षक Read More »

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

Rajendra Hagavane : राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे (वय 23) यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. एफआयआरनुसार, वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडा प्रथा याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

मोठी बातमी! राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी Read More »

सीमेवर पाकिस्तानचा कट फसला, बीएसएफने 5 बंकर उद्ध्वस्त केले

BSF Action on Pakistan: बीएसएफने जम्मू सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या कारवाईत बीएसएफने पाच पाकिस्तानी चौक्या आणि एक दहशतवादी लॉन्चपॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईची माहिती बीएसएफ कमांडंट चंद्रेश सोना यांनी दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये भारतीय गावे आणि चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत मस्तपूर भागात असलेले पाकिस्तानचे एक सक्रिय लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यात आल्याचे कमांडंट सोना यांनी सांगितले. याशिवाय पाकिस्तानच्या पाच चौक्या आणि अनेक बंकरनाही लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ते म्हणाले, “आम्ही त्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या अनेक संरचना उद्ध्वस्त केल्या. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का होता.” पाक सैन्य आणि रेंजर्सचे नुकसान बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 10 मे रोजी पाकिस्तानने भारतीय सीमेवर 61 मिमी आणि 82 मिमी मोर्टार डागले, ज्याचा वापर करून गावे, चौक्या आणि तैनाती स्थळांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. बीएसएफने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्सचे मोठे नुकसान केले. जखमींच्या हालचालींमुळे उघड झालेले नुकसान कमांडंट सोना म्हणाले की, कारवाईनंतर अनेक तासांपर्यंत पाकिस्तानी भागातून रुग्णवाहिकांची हालचाल दिसून आली, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे दिसून येते. महिला सैनिकांच्या शौर्याला सलाम ऑपरेशन सिंदूर दरम्यान महिला सैनिकांची भूमिका देखील कौतुकास्पद होती. कमांडंट म्हणाले की, प्रत्येक बीएसएफ बटालियनमध्ये महिला कॉन्स्टेबल तैनात आहेत आणि त्यांनी आघाडीवर राहण्याचा संकल्प केला आहे. त्याने मुख्यालयात परतण्याची विनंती केली नाही किंवा रजा घेतली नाही.

सीमेवर पाकिस्तानचा कट फसला, बीएसएफने 5 बंकर उद्ध्वस्त केले Read More »

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस

Kajal Guru : नगर शहरामध्ये बोगस तृतीयपंथी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी लूटमार करून दमदाटी करत असल्याची घटना काही दिवसापासून घडत असून याबाबतची माहिती नागरिकांनी तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांना दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन काजल गुरु यांनी सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणले होते. यामध्ये सदरची व्यक्ती ही बोगस प्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कडून तसेच शहरातील सोने व्यापाऱ्यांकडून तसेच काही उद्योजकांकडून पैशांची लूटमार करून दमदाटी करत होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरिकांची लूटमार देखील सदर व्यक्ती करत होती. त्यामुळे या व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदरचा व्यक्ती हा तृतीयपंथी नसून माणूस आहे. या व्यक्तीमुळे तृतीयपंथी समाज हा बदनाम होऊ नये म्हणून सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. तर दुसरीकडे अशा प्रकारे कोणाची फसवणूक होत असेल तर तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस Read More »

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!”

Ahilyanagar News: नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाच्या मुरूम संबंधित कामात तलाठी व अप्पर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून अक्षरशः एक लाख रुपयांचा ‘हंटर’ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार इतका संगनमताने पार पडला की सर्कलला बायपास करून तलाठी आणि ‘कडक’ साहेबांनीच आपापसात वाटणी केली. सदर व्यावसायिकाने मुरूम वाहतुकीसाठी शासकीय पावती भरून अधिकृत मुरूम उचललेला असतानाही, नव्याने आलेल्या अप्पर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या दरम्यान, “35 ते 40 लाखांचा दंड होईल,” असा धाक दाखवून तलाठी साहेबांनी तो व्यावसायिक थेट गाऱ्हाणीच्या स्थितीत आणला. यानंतर प्रकरण एका लाखात मिटवण्यात आलं. यातील काही हिस्सा खिलाडी साहेबांचा तर काहीसा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्टपणे एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. “साहेब फार कडक आहेत, मी तुमचं काम करून देतो… कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील!” अशा सज्जड दमासह ही रक्कम स्वीकारण्यात आली. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – हे सर्व ‘पंचनामा’ करून अधिकृतपणे मांडल्याचा देखावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात पैसे ‘खाल्ले’ गेले. रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं – “फर्स्ट पणे साहेबांसाठी एक लाख द्या… लवकर द्या…” कारवाई होणार का? हा प्रकार उघडकीस येताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “निव्वळ दमदाटी करून भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल तयार केले आहे काय?” असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!” Read More »

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती

Ravindra Dhangekar : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पुढील एका वर्षासाठी शिंदे यांनी शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. महानगर प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, पुण्यात पक्षाच्या वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करून आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा शब्दही दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून धंगेकर यांना कोणते पद मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, धंगेकर यांनी ‘मी कुठल्याही पदासाठी नव्हे; तर लोकांच्या समस्या जलद गतीने आणि प्रभावीपणे सोडवण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, असे जाहीर केले होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा मी सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करेन. पुण्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करेन. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी माझी निवड केल्याबद्दल मनस्वी आभार.: रवींद्र धंगेकर, माजी आमदार

पुण्यात मोठी राजकीय खेळी, माजी आमदार धंगेकर यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती Read More »

राज्यात नवीन 1 लाख रोजगार येणार, ‘या’ प्रकल्पांना सरकारची मान्यता

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३२५ उद्योग प्रस्तावांना मंजुरी; १ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, ९३ हजार रोजगारांची अपेक्षा राज्य शासनाच्या उद्योग धोरणांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ उद्योग प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमुळे एकूण ₹१,००,६५५.९६ कोटींची गुंतवणूक आणि सुमारे ९३,३१७ नवीन रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. उद्योग विभागाच्या अधीन येणाऱ्या खालील धोरणांचा कालावधी संपला आहे: नवीन धोरणे ठरवण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून, दरम्यानच्या काळात विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रस्तावांना प्रोत्साहन मंजूर करण्यास वित्त विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे. मंजूर करण्यात आलेले प्रमुख प्रस्ताव: 🔹 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ अंतर्गत: 🔹 अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण २०१८ अंतर्गत: 🔹 फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण २०१८ अंतर्गत: राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धोरणांचा कालावधी संपला असतानाही महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प रखडणार नाहीत, तसेच गुंतवणूकदारांना वेळेत प्रोत्साहने मिळून उद्योग सुरू करता येतील, अशी माहिती मंत्रिमंडळानंतर देण्यात आली.

राज्यात नवीन 1 लाख रोजगार येणार, ‘या’ प्रकल्पांना सरकारची मान्यता Read More »

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले

Laxman Hake on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री पदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ देखील अजित पवारांवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत असल्याने छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देत भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असल्याचे देखील बोलले जात आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचा स्वागत आहे.ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है! लक्ष्मण हाके स्पष्ट बोलले Read More »