DNA मराठी

ताज्या बातम्या

बंकर बस्टर, बॉम्बर आणि युद्धनौका…, इराणविरुद्ध अमेरिकेचा प्लॅन तयार

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावात अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवली असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या लष्करी कारवायांची पुष्टी केली आहे, ते म्हणाले की “आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिकता आहे.” पेंटागॉनने लढाऊ विमाने तैनात केली आहेत, टँकर आणि युद्धनौकांना मोक्याच्या ठिकाणी इंधन भरत आहेत, जे अमेरिकेच्या हालचाली आणि संभाव्य कारवाईचे संकेत देतात. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “आता आमचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे,” ज्यामुळे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या अटकळाला बळकटी मिळाली आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की मंगळवारपर्यंत, कोणतेही अमेरिकन विमान इराणी हवाई क्षेत्रात प्रवेश केलेले नाही आणि आतापर्यंतचे सर्व लष्करी कारवाया पूर्णपणे बचावात्मक आहेत. मध्य पूर्वेतील अमेरिकन लढाऊ विमानांची तैनाती जरी अचूक संख्या गुप्त ठेवण्यात आली असली तरी, माहितीनुसार, सुमारे एक डझन एफ-16 लढाऊ विमाने सौदी अरेबियाला पाठवण्यात आली आहेत. अमेरिकन लढाऊ विमाने संपूर्ण प्रदेशात गस्त घालत आहेत. डिएगो गार्सियामध्ये बी-52 बॉम्बर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. 30,000 पौंड वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकणारे बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स सध्या तैनात नसले तरी, ते अमेरिकेकडे एक शक्तिशाली पर्याय आहेत. इराणच्या पर्वतांमध्ये असलेल्या फोर्डो अणुस्थळाला फक्त मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (GBU-57) सारख्या शक्तिशाली बॉम्बनेच लक्ष्य करता येते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, “अशा हल्ल्यासाठी आवश्यक विमाने आणि शस्त्रे फक्त अमेरिकेकडेच आहेत.” युरोपमधूनही धोरणात्मक तैनाती माध्यमांच्या वृत्तानुसार, मध्य पूर्वेतील ओपन-सोर्स इंटेलिजन्सवर लक्ष ठेवणाऱ्या ऑरोरा इंटेलने वृत्त दिले आहे की अमेरिकेने इंग्लंड, स्पेन, जर्मनी आणि ग्रीससह युरोपियन तळांवर इंधन भरणारी विमाने आणि लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत. ही माहिती सार्वजनिक विमान वाहतूक ट्रॅकिंग वेबसाइट्सद्वारे मिळवण्यात आली आहे. अमेरिकन सैन्याची संख्या 40,000 पर्यंत पोहोचली मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्याची संख्या आता सुमारे 40,000 पर्यंत वाढली आहे, जी पूर्वी सामान्यतः 30,000 होती. काही लष्करी तळांवरील कुटुंबांना स्वेच्छेने स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि लष्करी प्रतिष्ठानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि इराणमधील तणाव आणि येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे ही संख्या 43,000 पर्यंत पोहोचली होती.

बंकर बस्टर, बॉम्बर आणि युद्धनौका…, इराणविरुद्ध अमेरिकेचा प्लॅन तयार Read More »

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ जुन २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

Marathi Movie: गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च

Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.” निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ” तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर १७६०’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.” तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Marathi Movie: गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर लॉन्च Read More »

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले!

Maharashtra Politics: महाराष्ट्राची ओळख कष्टकरी, बुद्धिजीवी आणि परिवर्तनवादी राज्य म्हणून होती. पण गेल्या काही दशकांत ही ओळख झाकोळली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, शेतकरी अडचणीत, तरुण बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था कोलमडलेली त्यामुळे जनता अडचणीत आहे. मात्र याच काळात नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये उमेदवार दाखल करत असलेल्या मालमत्ता विवरणपत्रांवर नजर टाकली, तर अनेक नेत्यांची संपत्ती काही वर्षांत दुप्पट-तिप्पट झाल्याचे स्पष्ट होते. कुठून येतो हा पैसा? सत्तेचा वापर फक्त समाजसेवेकरता नाही, तर वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी होतो, अशीच जनता भावना बळावते. शेतकरी कर्जमाफीसाठी विनवणी करत असतो, विद्यार्थी फी भरू शकत नाहीत, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. पण मंत्रीमहोदयांच्या कोट्यवधींच्या गाड्या, फौजफाटा, बंगल्यांची झळाळी मात्र झकास असते. ही दुहेरी परिस्थिती लोकशाहीला सुरुंग लावत आहे. महाराष्ट्रातील सत्ता म्हणजे केवळ सत्ता नव्हे, ती संपत्तीची शिडी बनली आहे. विरोधात असताना “भ्रष्टाचारविरोधी” घोषणा करणारे सत्तेत गेल्यावर मात्र त्याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतात आणि जनतेला आश्वासनांची विषारी गोळी देत राहतात. आज महाराष्ट्राला गरज आहे ती जबाबदार नेतृत्वाची, पारदर्शक कारभाराची आणि जागरूक जनतेची. अन्यथा “महाराष्ट्र गरीब, नेते श्रीमंत” ही ओळख आपणच कायमस्वरूपी स्वीकारावी लागेल.

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले! Read More »

ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार, मुंबईच्या दिशेने रवाना

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर,माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय. नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत. ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर,माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नेते आज भाजपात प्रवेश करणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय. नाशिकच्या सिडको परिसरातून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत.

ठाकरे गटाचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार, मुंबईच्या दिशेने रवाना Read More »

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

Chandrakant Patil:  राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ Read More »

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट

Maharashtra Rain Alert: 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. 1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे. 22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही. अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

तहसीलदार साहेब न्याय द्या…, सरपंच शरद पवार यांच्यासह अरुण रोडे पाटील, शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये

Ahilyanagar News : सरोदे परिवार व चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये न्यायासाठी घुसले. चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या मालकीच्या गट नंबर 1026 मधील सातबारा वरून तत्कालीन तलाठी सर्कल यांना हाताशी धरून खरेदीखत न घेता आणि फेरफार न बनवता समाजकंटकाने सरोदे परिवाराचे घर पाडून भूमिहीन करून 51 गुंठे जमीन बेकायदेशीर स्वतःच्या नावावर लावून घेतले आहे त्यामुळे सदर गट नंबर 1026 सातबारा वर माझ्या नावाची नोंद करून ताबा मिळावा व दोषींवर 420 चा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी 12 वर्षापासून अनेक वेळा करून अनेक वेळा उपोषण करूनही अनेक सुनावण्या होऊन अहिल्यानगर तालुका तहसीलदार साहेबांनी सदर प्रकरण निकालावर बंद करून अहिल्यानगर तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी न्याय (निकाल )देत नसल्यामुळे पीडित कौसाबाई मारुती सरोदे व सरोदे परिवार हे आज सोमवार 16 जूनपासून जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत अहिल्यानगर तालुका तहसील कार्यालयातच शेळ्या मेंढ्यांना घेऊन राहणार असल्याचे प्रतिक्रिया देताना सरोदे परिवाराने व सरपंच यांनी सांगितले. आज या आंदोलनस्थळी पीडित कौसाबाई मारुती सरोदे व सरोदे परिवार, चिचोंडी पाटीलचे शरद पवार,अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील, व धनगर बांधव मोठ्या संख्येने तहसील कार्यालय येथे उपस्थित होते या सर्वांनी तहसीलदार साहेब न्याय द्या,न्याय द्या.या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

तहसीलदार साहेब न्याय द्या…, सरपंच शरद पवार यांच्यासह अरुण रोडे पाटील, शेळ्या मेंढ्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये Read More »

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या

Cricket New Rules: सीमारेषेवरील ‘बनी हॉप्स’ झेलबाबत एमसीसीने नवीन नियम केले आहेत.  हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, हे जाणून घ्या. नवीन नियम काय? कायदा 19.5.2 चे बदल करण्यात येणार आहे.नवीन नियमानुसार असा झेल क्षेत्ररक्षकाने घेतला, तर त्या फलंदाजाला नाबाद ठरविले जाईल. नवीन नियमानुसार झेलसाठी सीमारेषेबाहेर गेलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हवेत असताना चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करण्याची परवानगी असणार आहे. हा नियम रिले (दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून घेतलेल्या) झेललाही लागू होईल. 17 जूनपासून लागू होणार नवीन नियम हा नियम 17 जून 2025 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू होईल आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे एमसीसीच्या कायद्यांमध्ये समाविष्ट केला जाईल. बनी हॉप्स म्हणजे काय? सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक झेल टिपतो आणि त्याचा तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर जात असेल, असे त्याला वाटते, तेव्हा तो चेंडू हवेत उडवितो. पुन्हा उंच उडी मारून (जमिनीला पायाचा स्पर्श होऊ न देता) तो झेल टिपतो आणि पुन्हा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून पुन्हा झेल टिपतो. या वेगळ्या झेलने ‘बनी हॉप्स’ असे म्हटले जाते.

क्रिकेटमध्ये होणार बदल, आयसीसीचा नवीन नियम जाणून घ्या Read More »

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra Wheather Update :  राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने (IMD) आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रात्री उशिरापासून अधूनमधून पाऊस सुरू आहे,  यासोबतच, आज दुपारी 3.30 वाजता समुद्रात 4.31 मीटर उंचीची भरती येईल, ज्यामुळे या काळात 14 फूट उंच लाटा उसळतील. मान्सून लवकर आला मुंबईत पुन्हा पावसाने वेग घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामान आल्हाददायक तर झालेच, शिवाय तापमानातही घट झाली आहे, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगरांचे तापमान 30.9 अंशांपर्यंत आणि शहराचे तापमान 28 अंशांपर्यंत खाली आले आहे. या आठवड्यात शहरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनने 26 मे रोजी दार ठोठावून हवामानाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला, कारण गेल्या 69 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर आला. तथापि, सुरुवातीच्या दोन दिवसांच्या पावसानंतर त्याचा वेग मंदावला होता, परंतु आता ढग पुन्हा सक्रिय झाले आहेत. 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या मते, सोमाली जेट स्ट्रीम सक्रिय झाला आहे, जो भारतीय उपखंडात मान्सूनला चालना देत आहे. सोमालियाहून अरबी समुद्रातून भारतात जलदगतीने वाहणारा हा प्रवाह आणि नैऋत्य मान्सूनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या प्रभावामुळे 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, 15 दिवसांच्या अंतरानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या मुंबईत चांगला पाऊस पडत आहे आणि हा टप्पा या आठवड्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट Read More »