DNA मराठी

ताज्या बातम्या

an attempt to save the culprits of the sawedi land scam

Land scam – “मुहूर्त सापडेना की दोषींना वाचवायचं प्रयत्न?”

पुरावे असून सुधा असूनही अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. नागरिकांना हे खटकतं आहे की, ज्याठिकाणी सामान्य नागरिक एका साध्या खात्याच्या नोंदणीसाठीही फेऱ्या मारतो land scam अहमदनगर – सावेडी परिसरातील तब्बल १ हेक्टर ३५ आर इतक्या क्षेत्रफळाची बिनशेती जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ३४ वर्षांपूर्वीचा हा गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुरू झाली आहे.या प्रकरणाचा अहवाल लवकर पाठवण्यासाठी फाईल अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे.  Sawedi land scam मात्र, “मुहूर्त सापडेना” या कारणावर कारवाई लांबणीवर टाकल्याने प्रशासनावर दोषींना वाचवण्याचा आरोप होत आहे.शेख मतिन आलम बशीरुद्दीन (रा. जुना बाजार, भिस्त गल्ली, अहमदनगर) यांनी सह जिल्हा निबंधक, मार्केटयार्ड रोड, माळीवाडा व दुय्यम निबंधक कार्यालय (अहिल्यानगर-१ दक्षिण) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नमूद केलं आहे की, दिनांक १५ ऑक्टोबर १९९१ रोजी पारसमल मश्रीमल शाह (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्या नावावर बनावट खरेदीखत करून जमीन नोंदवण्यात आल्यचा संशय आहे. बनावट कागदपत्रांची साखळी:तक्रारीनुसार, सर्वे नं. २४५/८/१ (७२ आर) आणि २४५/ब/२ (६३ आर) या मिळकती गणेश शिवराम पाचार्णे यांच्या कुलमुखत्यारपत्रावर आधारित नोंदवण्यात आल्या. हे व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात छ-४३० क्रमांकानुसार आणि खंड १९६, पृष्ठ २१ ते ३२ या नोंदणी पुस्तकात नमूद आहेत.शेख यांची मागणी: खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मिळकती नोंदविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच या जमिनीवर कोणतीही नवीन नोंदणी होऊ नये, अशी मागणी शेख यांनी केली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, यामुळे मूळ हक्कधारकांचे मोठं नुकसान होऊ शकतं. दोषींना संरक्षण? की यंत्रणेचा गलथानपणा? लेखी तक्रार, दस्तऐवजांची साखळी, खोट्या खरेदीखताची तारीख आणि नावांची सुस्पष्ट माहिती असूनही अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. नागरिकांना हे खटकतं आहे की, ज्याठिकाणी सामान्य नागरिक एका साध्या खात्याच्या नोंदणीसाठीही फेऱ्या मारतो, तिथं ३४ वर्षांपूर्वीचा इतका मोठा गैरव्यवहार उघड होऊनही कारवाई नाही?  “मुहूर्त सापडेना की दोषींना वाचवायचं प्रयत्न?” अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.दरम्यान, निबंधक कार्यालय व महसूल विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून पुढील चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं. या प्रकरणात जिल्हधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

Land scam – “मुहूर्त सापडेना की दोषींना वाचवायचं प्रयत्न?” Read More »

pankaj ashiya

Pankaj Ashiya : अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

Pankaj Ashiya : जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी संबंधित विभागांनी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, विनापरवानगी उभारलेले गतीरोधक तत्काळ काढावेत आणि अधिकृत थांब्यांवरच वाहने थांबवण्याची व्यवस्था करावी, अशा ठोस सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, एस. आर. वर्पे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, वसंत पंदरकर, अभिजित पोटे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन ड्रंक अँड ड्राईव्ह, रिफ्लेक्टर, हेल्मेट आदींची तपासणी करावी. अपघातस्थळी पोलीस, सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे पाहणी करून अपघातांचे विश्लेषण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ब्लॅकस्पॉटवरील अपघातांची माहिती घेऊन तेथे सुधारणा कराव्यात.’’ ‘‘अनेकदा अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्या जातात, परिणामी अपघात होतात. यासाठी अधिकृत थांब्यांवरच बस थांबतील, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक बसमध्ये तक्रार क्रमांक प्रदर्शित करावा,’’ अशाही सूचना त्यांनी दिल्या. ‘‘जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. या गतीरोधकांमुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे ते काढून टाकावेत व आवश्यकतेनुसारच गतीरोधक ठेवावेत. गतीरोधकांच्या ठिकाणी रिफ्लेक्टर व सूचना फलक बसवावेत. बीओटी तत्त्वावरील रस्त्यांच्या दुरुस्त्यांची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्या करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदारांना द्याव्यात,’’ असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Pankaj Ashiya : अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश Read More »

img 20250723 wa0003

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधक करत आहे. तर दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर पठाण, सरपंच शरद पवार, फय्याज तांबोली, अनिस शेख, आरिफ पटेल, जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान देखील केलेला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफी वरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एका कृषिमंत्रीने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले. तर नुकतेच कृषिमंत्री कोकाटे विधान परिषदेत अधिवेश सुरु असताना चक्क मोबाईलवर रम्मीचा जुगार खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक Read More »

img 20250723 wa0002

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या आजच्या Pandharpur दौऱ्यासाठी स्वागताचे अनोखे पोस्टर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचाविरोध होत असल्याने प्रोजेक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे या प्रोजेक्टला विरोध दर्शवण्यासाठी संतांच्या अभंगातील ओव्यांचा वापर करून पंढरपुरात पोस्टरबाजी करण्यात आली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आहेत. या पार्श्वभूमीवर ” वतन आमची मिराशी पंढरी…” हा संत नामदेव महाराजांचा अभंग पोस्टरवर छापून देवेंद्रजी आपण पंढरपूरची मूळ रचना व संस्कृती कायम ठेवाल असा विश्वास वाटतो, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने हे पोस्टर लावले आहेत. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसरातील 600 घरांचे भूसंपादन प्रस्तावित आहे. याच भूसंपादनाला आता थेट विरोध करण्यासाठी संत वचनांचा वापर करून फडणवीस यांचे स्वागत अनोख्या पोस्टर मधून केले जाते.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या आजच्या Pandharpur दौऱ्यासाठी स्वागताचे अनोखे पोस्टर Read More »

img 20250723 wa0001

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा आलेख वाढतात दिसत आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री रिक्षा, कार, स्कूल बससह 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथनगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 22 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी एकूण 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 शालेय बस, आणि 1 पियाजिओ टेम्पो यांची काचफोड करत मोठे नुकसान केले आहे. हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या डीबी शाखा आणि स्थानिक पोलीस अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दहशत…,15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार Read More »

7 talathis, 3 board officers, 1 clerk finally suspended dna marathi

7 तलाठी, 3 मंडळ अधिकारी, 1 लिपिक अखेर निलंबित 

संगमनेरमध्ये 42 ड अंतर्गत बेकायदेशीर नोंदी प्रकरण गाजते; 11 महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई अहिल्यानगर | प्रतिनिधी -संगमनेर शहर व तालुक्यातील महसूल विभागात 42 डअंतर्गत झालेल्या बेकायदेशीर फेरफार व मंजुरी प्रकरणात मोठी कारवाई करत सात तलाठी, तीन मंडळ अधिकारी (सर्कल) आणि एक लिपिक यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी तत्कालीन तहसीलदारांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस येण्यामागे एका सामाजिक कार्यकर्त्याने विभागीय आयुक्तांकडे दिलेली लेखी तक्रार कारणीभूत ठरली. त्यानंतर झालेल्या तपासात गंभीर अनियमितता व कायदेशीर प्रक्रिया डावलून फेरफार केल्याचे उघड झाले.  काय आहे प्रकरण? संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाण हद्दीत मधील 42 ब, 42 क व 42 ड अंतर्गत आकृषक आकारणी, परवानगी व सनद पूर्ण क्षेत्रासाठी उपलब्ध असताना देखील, या मध्ये संबधित खाते महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत नियोजन प्राधिकरणाची मंजुरी न घेता, भूमिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडून आवश्यक पत्रके न मिळवतामहसूल कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार केले आणि मंडल अधिकाऱ्यांनी त्यावर प्रमाणन शिक्कामोर्तब केले. या मुळे हि कारवाई करण्यात आली आहे यामुळे कायदेशीर गुंतागुंत व शासकीय नियमांचा भंग झाला असून, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.  निलंबनाची कारणे: महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85(2) चा भंग1947 चा जमिनीचे तुकडे टाळण्याचा कायदा झुगारून देणेमहाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन  जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण: जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या निलंबन आदेशात ही सर्व कारणे स्पष्ट करत, दोषींवर विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, इतर जिल्ह्यांतील अशा प्रकरणांवरही नजर टाकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार व चुकीच्या नोंदींविरोधातील ही कारवाई इतर जिल्ह्यांसाठीही एक इशारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

7 तलाठी, 3 मंडळ अधिकारी, 1 लिपिक अखेर निलंबित  Read More »

kiran kale

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक

Kiran Kale : अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना महिला अत्याचार प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या बाबत कर्जत तालुक्यातील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. काही दिवसापूर्वी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर 350 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत किरण काळे राज्यातील राजकारणात चर्चेत आले होते. फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित महिला व तिचा पती यांच्यातील वैवाहिक वाद मिटविण्यासाठी पीडित महिला किरण काळे यांच्या संपर्कात आली होती. महिलाला विश्वासात घेत मदतीचे आश्वासन देत 2023 ते 2024 या दरम्यान काळे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात वारंवार अत्याचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेबाबत कुणाला काही सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी किरण काळे याला अटक केली आहे.

Kiran Kale : मोठी बातमी! महिला अत्याचार प्रकरणी किरण काळेंना अटक Read More »

alcohol price hike is it good or bad for public health

दारू महागली: आरोग्याला फायदा की तोटा काळ्या बाजार जोरात?

Alcohol price hike: बनावट आणि बेकायदेशीर विक्रीचा वाढता होण्याचा धोका कायम आहे. किमती वाढल्याने गरीब व व्यसनाधीन लोक कायदेशीर उत्पादनांना पर्याय शोधतात आणि त्यामुळे नकली, घातक दारू व तंबाखू उत्पादनांची मागणी वाढते. याचे थेट परिणाम आरोग्य हानी आणि गुन्हेगारीट  वाढ होण्यची शक्यता नाकारता येत नाही. दारू बंदी कायदा सक्षम करणार का? Alcohol price hike:मुंबई : – राज्य सरकारने अलीकडेच मद्य व तंबाखूवरील उत्पादन शुल्कात लक्षणीय वाढ केली आहे, त्यामुळे दारूच्या किमती वाढ झाली आहे. सरकारच्या मते, या वाढीचा उद्देश म्हणजे व्यसनाधीनतेला आळा घालणे, तसेच ‘सिन टॅक्स’च्या माध्यमातून महसूल वाढवणे. मात्र, या धोरणावरून सध्या राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. एकीकडे सरकार आणि आरोग्य क्षेत्र या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे औद्योगिक क्षेत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. सरकारचा दावा:- आरोग्य फायदा आणि महसूल वाढ मद्य व तंबाखूच्या किमती वाढल्यामुळे सामान्य जनतेमध्ये या नशेपासून मुक्ती होऊन या वस्तूंपासून दूर राहण्याची प्रवृत्ती वाढेल. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर चांगला परिणाम होईल आणि आरोग्य सेवांवरचा ताण कमी होण्यास मद्दत होईल असा राज्य सरकारचा दावा आहे. याशिवाय, वाढलेल्या उत्पादन शुल्कामुळे सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा होणार आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार हा निधी आरोग्य, शिक्षण आणि जनहिताच्या योजनांमध्ये वापरला जाईल. आरोग्य संस्थांचा पाठिंबा राज्य सरकारच्या या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि देशातील अनेक आरोग्य तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. WHO च्या अहवालानुसार, तंबाखूवर ५० टक्क्यांहून अधिक दरवाढ केल्यास भारतात लाखो मृत्यू टाळले जाऊ शकतात. यामुळे सरकारच्या निर्णयाला आरोग्य क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गरीब व मध्यमवर्गीयांचा दृष्टिकोन आरोग्य आणि व्यसन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढलेले दर व्यसन करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांमध्ये मानसिक आवर घालण्याचे काम करतात. महागाईमुळे ते या वस्तूंमधून दूर राहतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि कुटुंबाचा आर्थिक सतोल सुधारणा होईल. मात्र, हा बदल तात्पुरता की दीर्घकालीन, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्योग क्षेत्राची नाराजी मद्य उत्पादक आणि वितरक संघटनांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत म्हटले आहे की, “अचानक केलेल्या दरवाढीमुळे मद्य उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. विक्री कमी होईल, उत्पादन घटेल आणि परिणामी अनेकांचे रोजगार धोक्यात येतील.” सरकारने दरवाढ टप्प्याटप्प्याने करावी आणि उद्योग क्षेत्राशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.अशी मागणी काही संघटनानीकेली आहे. काळा बाजार आणि बनावट उत्पादनांचा धोका दारू आणि गुन्हेगारी – या निर्णयामुळे एक मोठा धोका उभा राहत शकतो – बनावट आणि बेकायदेशीर विक्रीचा वाढता धोका कायम आहे. किमती वाढल्याने गरीब व व्यसनाधीन लोक कायदेशीर उत्पादनांना पर्याय शोधतात आणि त्यामुळे नकली, घातक दारू व तंबाखू उत्पादनांची मागणी वाढते. याचे थेट परिणाम आरोग्य हानी आणि गुन्हेगारीट  वाढ होण्यची शक्यता नाकारता येत नाही. गुटखा बंदीचा अपयश आणि नवा प्रश्न गुटखावर बंदी का फसली राज्यात गुटखा विक्रीवर पूर्ण बंदी असतानाही, अनेक ठिकाणी तो सर्रास विक्री होत आहे. पोलीस आणि अन्न प्रशासन, आणि इतर प्रशासन यांना माहिती असूनही मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ मते – “जर पूर्ण बंदी असलेला गुटखा रोखता येत नसेल, तर फक्त महाग केलेली दारू आणि तंबाखू कशी थांबेल?” अशी मद्यप्रेमींची प्रतिक्रिया आहे. हा मुद्दा सरकारच्या अंमलबजावणी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यांच्यात योग्य समन्वय नसेल, तर मद्य व तंबाखूच्या दरवाढीचे सारे फायदे केवळ कागदावरच राहतील. मद्य व तंबाखूवरील दरवाढीतून सरकारचा महसूल वाढतो, आरोग्य सेवेला दिलासा मिळतो, आणि व्यसनाधीनता कमी होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अंमलबजावणीत कुचराई झाली, तर याचा फायदा काळ्या बाजाराला होणार असून, बनावट उत्पादनांमुळे आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात याची विचार व्हायला हवा. गुटखा बंदीची फसलेली अंमलबजावणी लक्षात घेता, सरकारने यावेळी केवळ महसूलवाढीपुरता विचार न करता, कडक नियंत्रण आणि पारदर्शक यंत्रणा उभी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, ‘दारू महाग – पण अधिक घातक आणि बेकायदेशीर मार्गाने उपलब्ध’ अशी नवी समस्या समोर येण्यास वेळ लागणार नाही.

दारू महागली: आरोग्याला फायदा की तोटा काळ्या बाजार जोरात? Read More »

pankaja munde

Pankaja Munde : राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती; खर्च होणार 458 कोटी

Pankaja Munde: राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार असल्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी 458 कोटी 41 लाख 34 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पशुसंवर्धनला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सात महसूली विभागातील 34 जिल्ह्यात एकूण 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. नवीन इमारत बांधण्याकरिता 287 कोटी 76 लाख 44 हजार तर दुरुस्तीसाठी 121 कोटी 11 लाख 82 हजार, स्वच्छतागृह साठी 25 कोटी 17 लाख 20 हजार, विविध उपकरणे खरेदीसाठी 24 कोटी 35 लाख 88 हजार असा एकूण 458 कोटी 41 लाख 34 हजार रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यात 24 इमारतीसाठी 9 कोटी 40 लाख बीड जिल्ह्यात सर्व सहा मतदारसंघात 24 इमारतीसाठी 9 कोटी 40 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत, त्यांची विभागनिहाय संख्या पुढील प्रमाणे- मुंबई विभाग – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13, पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात 125, नाशिक विभाग – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात 55, छत्रपती संभाजीनगर विभाग – छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात 51, लातूर विभाग- लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात 39, अमरावती विभाग- अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात 38, नागपूर विभाग- नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात 36 अशा एकूण 327 ठिकाणी नवीन इमारतीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Pankaja Munde : राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती; खर्च होणार 458 कोटी Read More »

img 20250721 wa0003

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल

Honey Trap : नाशिक शहरात सध्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘ती’ बुलावत होती, आणि तो गेला… मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ! सुरुवातीला तीन कोटी, नंतर थेट दहा कोटी रुपयांची मागणी झाली. अखेर प्रकरणाची वात खुलली, पण दोन्ही बाजूंनी लेखी तक्रार नाही. पोलिस मात्र संभ्रमात. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागातील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सापळ्यात अडकवून, त्याच्याकडून प्रथम तीन कोटी रुपये उकळण्यात आले. पण हे पुरेसे न वाटल्याने पुन्हा दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ‘ती’ महिला थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. सुरुवातीला तोंडी तक्रार करण्यात आली, त्यानंतर काही दिवसांनी लेखी तक्रारीसाठी ती पुन्हा आली. दरम्यान, संबंधित अधिकारी याच काळात ठाणे येथे गेले असताना त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचे समजते. तिथेच त्यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. पण काही दिवसांतच दोघांनीही परस्पर समजुतीने तक्रारी मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा संभ्रमात आहे. कोणतीही अधिकृत तक्रार नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई करणे कठीण ठरत आहे. या प्रकरणात काही बड्या नावांचा समावेश असल्याचीही कुजबुज सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये तपास करून त्या हॉटेलची खोली सील करण्यात आली, अशी चर्चा रंगली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी याचा अधिकृत इन्कार केला आहे. सध्या त्या मजल्यावर प्रवेश बंद करण्यात आला असून, परिसरात संशयाचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढचा रंग काय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सध्या तरी ‘हनी ट्रॅप’च्या गूढ गर्तेत प्रशासनही अडकले आहे, हे निश्चित.

Honey Trap : ओ बुलाती है मगर जाने का नही, ‘हनी ट्रॅप’ प्रकरण गाजतंय, पण तक्रारच नाही; पोलिस हतबल Read More »