DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे

Ahmednagar News:  लोकनेत्या पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. या अनुषंगाने आज पंकजा मुंडे अहिल्यादेवीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी भाजपा तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हेच नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा बाजी मारतील असे भाष्य केले.  पंकजा मुंडे यांचे काल रात्रीच आगमन झाले असून त्यांनी बुऱ्हानगर येथील शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी मुक्काम केला आणि सकाळी दौऱ्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी पाथर्डी येथील रॅलीत सहभाग दर्शवून नागरिकांनी केलेल्या जंगी स्वागताचा स्वीकार केला.  यावेळी जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपले समर्थन भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांना दर्शविले. यावेळी त्यांच्यासहित डॉ. सुजय विखे पाटील, मोनिका राजळे आणि शिवाजीराव कर्डिले यांचा क्रेनच्या सहाय्याने मोठा फुलांचा हार घालून स्वागत करण्यात आले. यांनतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये देखील भेटी दिल्या. तेथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.  यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षाचा कालावधी हा विविध विकास कामांमध्ये व्यस्त राहूनच घालवला आहे. निश्चितच त्यांची ही विकासक वाट त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवेल हा मला विश्वास आहे. मागील निवडणूकीच्या काळातही डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ मी नगर जिल्ह्यात आले होते. यंदाही आले आणि सुजय विखे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुजय दादांचा विजय निश्चित असून लोकांचे त्यांच्यावरील प्रेम हे अतिशय कौतुकास्पद आहे असे स्पष्ट करून यावेळी मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू असे मत पंकजा मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विविध मान्यवरांच्या समवेत श्री क्षेत्र मोहोटादेवी येथे देखील श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News:  सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित: लोकनेत्या पंकजा मुंडे Read More »

Realme 12+ 5G : Realme ने जाहीर केली बंपर ऑफर, मिळत आहे ‘या’ फोनवर भरघोस सूट

Realme Holi Sale : होळीपूर्वी जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला Realme कडून एक जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे.  Realme ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही जबरदस्त फोनवर बंपर सूट देत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही या ऑफरचा फायदा घेत कोणत्या कोणत्या फोन परवडणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. Realme 12+ 5G    Realme च्या या हँडसेटची किंमत 23,999 रुपये आहे. जे तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून 19,999 रुपयांना 16% च्या सूटवर खरेदी करू शकता. तुम्हाला 5,100 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. ज्याद्वारे तुम्ही हा हँडसेट अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला बँक ऑफरद्वारे फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डवर 5% कॅशबॅक देखील मिळत आहे. याशिवाय, Flipkart UPI द्वारे पेमेंटवर त्वरित 25% सूट देखील उपलब्ध आहे. ही विक्री मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ज्याचा तुम्ही आता लाभ घेऊ शकता. Realme 12   जर आपण Realme 12 5G बद्दल बोललो तर त्याच्या 128 GB व्हेरियंटवर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, बँक ऑफर अंतर्गत 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.  8GB रॅम व्हेरियंटवर 1500 रुपयांची बँक ऑफर किंवा एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. यासोबतच नो-कॉस्ट ईएमआयचाही फायदा मिळतो. Realme 12 Pro     Realme 12Pro वर उत्तम ऑफर देखील दिल्या जात आहेत. हा हँडसेट 5 हजार रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे.   8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेजसह व्हेरिएंटवर 1,000 रुपयांची कूपन सूट आणि 4,000 रुपयांची बँक ऑफर उपलब्ध आहे.  हे जाणुन घ्या, तुम्ही 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंट खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची बँक ऑफर मिळेल.

Realme 12+ 5G : Realme ने जाहीर केली बंपर ऑफर, मिळत आहे ‘या’ फोनवर भरघोस सूट Read More »

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला.   केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.  सातारा जिल्ह्यातील वाई येथे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांच्या गाडीला अचानक ब्रेक लागल्याने कंटेनरला धडकली. या धडकेने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आठवले यांची गाडी पुढे जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्याने कंटेनरला धडकली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सातारा एसपी समीर शेख यांनी केंद्रीय मंत्री आठवले सुरक्षित असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी केली. त्यानंतर आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक Read More »

Congress Candidate List : काँग्रेसकडून 7 जागांवर उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

Congress Candidate List : लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसकडून राज्यातील सात लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. राज्यात 48 जागांपैकी काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर इतर जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेसने यावेळी शाहू महाराजांना कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने अनेक दिवसांपासून केली आहे. शिवसेनेने (UBT) कोल्हापूरच्या जागेवरही दावा केला होता, पण शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे ती मागे पडली. कोल्हापूरच्या माजी राजघराण्याचे प्रमुख म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्रात खूप आदर आहे. काँग्रेससोबत त्यांचा दीर्घकाळचा राजकीय संबंध असला तरी, 1998 च्या लोकसभा निवडणुकीत अयशस्वी झाल्यापासून त्यांनी पक्षाशी औपचारिक संबंध टाळला आहे. मराठा समाजातही त्यांचा मान खूप उंच आहे. महाराष्ट्रातून ही नावे जाहीर करण्यात आली कोल्हापूर- शाहू महाराज सोलापूर- प्रणिती सुशीलकुमार शिंदे पुणे- रवींद्र धंगेकर लातूर- शिवाजी काळगे नंदुरबार- गोवळ पाडवी अमरावती- बळवंत वानखेडे नांदेड- वसंतराव चव्हाण महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.  एमव्हीएची थेट स्पर्धा भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीशी आहे.

Congress Candidate List : काँग्रेसकडून 7 जागांवर उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी Read More »

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध हातभट्टी चालकावरती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे.  नगर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीतील साकत गाव व या परिसरात हातभट्टी दारू उत्पादन करून विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना   मिळाली होती.  मिळालेल्या माहितीवरून तत्काळ पथकासह स्वतः पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते साकत गावच्या शिवारातील 13/15 सुमारास छापा टाकून हातभट्टी चालक सोमनाथ नारायण पवार (राहणार साकत ताजी अहमदनगर) याच्या कब्जात 36000 किमती चा गावठी हातभट्टी तयार करण्याची कच्चे रसायनसह मुद्देमाल नष्ट करण्यात आला व सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाई साकत गावच्या शिवारात 14/30 छापा टाकला असता आरोपी हरिभाऊ मौला पवार (गाव-साकत खुर्द ता .जि.अहमदनगर) याच्या कब्जात 38 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  तिसरी कारवाई  साकत गावाच्या शिवारात सीना नदी पात्रात   छापा टाकला असता आरोपी सोपान हरिभाऊ पवार (गाव- साकत खुर्द ता.जि. अहमदनगर) याच्या कब्जात 42 हजार रुपये किमतीचे हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले व सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ )(क) (ड) (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला चौथी कारवाई साकत गावच्या शिवारात 16.30 पास्ता छापा टाकला असता आरोपी आकाश महिपती पवार (गाव,रा साकत ता, जि अहमदनगर) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 46000 रू हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कच्चे रसायन व गावठी हातभट्टी तयार दारू साहित्य मिळून आल्याने ते नष्ट करण्यात आले सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चार कारवाई मध्ये एकूण एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट करून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Ahmednagar News:  गावठी हातभट्टी चालकाविरुद्ध मोठी कारवाई, एक लाख 62 हजार किमतीचा मुद्देमाल नष्ट Read More »

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ 

Maharashtra Politics : गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगमी लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत शामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.   सध्या महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र तरीही देखील भाजपला राज ठाकरेंच्या मनसेची गरज का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदू नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंची ही प्रतिमा भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेशी जुळते. चुलतभाऊ उद्धव ठाकरे सत्तेत असताना राज यांनी मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यानंतर टोलवरून एकनाथ शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी असूनही भाजपला मनसेची गरज का? भाजपला एकच आमदार असलेल्या पक्षासोबत युती का करायची आहे? विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असले तरी तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न सुटत नसताना भाजप मनसेला बरोबर घेण्यास उत्सुक आहे. त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘ठाकरे ब्रँड’. मुंबईत ‘ठाकरे ब्रँड’ गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना 3-3 जागा मिळाल्या. मात्र यानंतर भाजप आणि शिवसेना वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. तीनपैकी दोन खासदारांनी शिवसेनेची (एकनाथ शिंदे) बाजू घेतली. पण पक्षाचे नाव आणि त्याचे चिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे आजही मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत आहेत.  उद्धव यांचा पराभव करण्यासाठी भाजपला ‘ठाकरे ब्रँड’ हवा आहे. राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईशिवाय ठाणे आणि नाशिकमध्येही चांगला पाठिंबा आहे. ‘ठाकरे’ विरुद्ध ‘ठाकरे’ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडली, त्यामुळे शिवसेनेच्या मूळ मतदारांचा उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.  मुंबई, ठाण्यासह राज्यातील कोकणपट्ट्यात उद्धव ठाकरे यांना मोठा समर्थन दिसून येत आहे. सहानुभूतीच्या जोरावर ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत विजयी होऊ शकतात आणि याचा फायदा त्यांना आगामी बीएमसी निवडणुका आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा ढाल म्हणून वापर करायचा आहे. मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हिंदुत्वाचा मुद्दा बनवून शिंदे सेना आणि भाजप उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत, तर उद्धव प्रत्युत्तरात भ्रष्टाचार, कुशासन, मराठी अस्मिता, उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे मुद्दे उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची उत्तरे राज ठाकरेंनी दिली तर भाजपसाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.  कारण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘नेता’ बनलेल्या राज ठाकरेंना महाराष्ट्राचा धर्म, मराठी अस्मिता यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावीपणे मुकाबला कसा करायचा हे चांगलंच माहीत आहे. राज्यात आपला पाया भक्कम करणाऱ्या मराठी माणसाचा मुद्दा मनसेने सुरुवातीलाच उचलून धरला होता. विचारधारांची लढाई काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीत सहभागी होऊन बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा सोडून दिल्याचे सांगत शिंदे यांची शिवसेना आणि भाजप सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत.  दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून मनसे आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वत:ला सादर करत आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्यास त्यांना विचारसरणीची अडचण येणार नाही. उलट राजबाबत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मार्ग अवलंबत असल्याचा मेसेज मतदारांमध्ये देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Maharashtra Politics : भाजपला ‘राज ठाकरे’ ची गरज का?, एका क्लीकवर समजून घ्या संपूर्ण राजकीय खेळ  Read More »

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू  असणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेटचा सातत्याने पर्दाफाश होत आहे.    पुन्हा एकदा हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय रॅकेट पर्दाफाश झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  पोलिसांनी या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत चार मुलींना वाचवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील फिनिक्स स्पामध्ये वेश्याव्यवसायाचा काळा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी  कारवाई करत चार मुलींची सुटका केली असून स्पाच्या महिला व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, अनैतिक वाहतूक प्रतिबंध विभागाला निगडीतील इन्स्पिरिया मॉलमधील फिनिक्स नावाच्या स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर पोलिसांनी त्या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले. वेश्याव्यवसायाची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ‘स्पा’वर छापा टाकला. या प्रकरणात चार मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आले. महिला व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपी दिनेश गुप्ताचा ते शोध घेत आहेत. पैशाचे आमिष दाखवून मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस चारही मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवू शकतात. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pune News : धक्कादायक! मॉलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, मॅनेजरला अटक Read More »

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर….

Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. देशात यावेळी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे मात्र राज्यात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाबाबत  निर्णय झालेला नाही.   MVA ने वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना युतीमध्ये सामील होण्याची शेवटची संधी दिली आहे. विरोधी आघाडी MVA मध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP यांचा समावेश आहे.  प्रकाश आंबेडकरांनी जास्त जागांच्या मागणीमुळे एमव्हीएमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजकीय तापमान आणखी वाढवले ​​आहे. संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर टीका करत काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रात केला आहे. वृत्तानुसार, MVA ने VBA ला आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपला निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. MVA ने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा देऊ केल्या आहेत. त्या चार जागा स्वीकारार्ह आहेत की नवीन प्रस्ताव द्यायचा आहे का, हे आजच VBA ला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.  MVA आज जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, व्हीबीएने आम्हाला 27 जागांची यादी दिली होती, त्यापैकी आम्ही त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. त्यांना काय हवे आहे ते त्यांनी सांगावे… त्यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीची घोषणा मात्र MVA मध्ये जागावाटपावरून रस्सीखेच! प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम, आजच निर्णय घ्या नाहीतर…. Read More »

Sukanya Samriddhi Yojana:  ‘ही’ योजना मुलींना करणार मालामाल, देते 3 पट परतावा; जाणून घ्या फायदे

Sukanya Samriddhi Yojana :  तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरकार एक जबरदस्त योजना गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे.  या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या मुलीचा भविष्य चांगलं करू शकतात. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करु शकता.  10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे वडील आपल्या मुलासाठी या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेत 8.2 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक आणि किमान ठेव मर्यादा 250 रुपये आहे. अशा परिस्थितीत मुलीचे वडील त्यांच्या खिशानुसार या योजनेत रक्कम जमा करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागते. 21 वर्षांनंतर, योजना परिपक्व होते आणि गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली जाते.  तुम्ही त्यात दरवर्षी ठराविक रक्कम जमा केल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट जास्त रक्कम मिळेल. येथे गणना जाणून घ्या. 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीवर प्रथम गणना जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षांत तुम्हाला एकूण 22,50,000 रुपये जमा होतील. 8.2 टक्के व्याजानुसार तुम्हाला 46,77,578 रुपये व्याज मिळेल.  हे व्याज तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह एकूण 69,27,578 रुपये मिळतील, जे एकूण गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे. 1 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीवर दुसरी गणना तुम्ही SSY मध्ये वार्षिक 1,00,000 रुपये जमा केल्यास, 15 वर्षांत एकूण 15,00,000 रुपये जमा केले जातील. SSY कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला एकूण ठेवीवर 8.2 टक्के व्याजदराने 31,18,385 रुपये व्याज मिळेल. 15 लाखांची दुप्पट रक्कम 30 लाख रुपये असेल.  अशा परिस्थितीत हे व्याज गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 46,18,385 रुपये मिळतील, जे गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट असेल. 50 हजार रुपयांच्या वार्षिक ठेवीवर तिसरी गणना जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर या योजनेत वार्षिक 50,000 रुपये जमा केले तर तुम्ही मासिक 4,167 रुपये गुंतवाल. तुम्ही 15 वर्षांत एकूण 7,50,000रु.ची गुंतवणूक कराल.  8.2 टक्के व्याजदरानुसार, तुम्हाला एकूण 15,59,193 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील, जे दुप्पट आहे.  अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर रु.7,50,000+15,59,193= रु. 23,09,193 मिळतील. 23,09,193 रुपये हे तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे.

Sukanya Samriddhi Yojana:  ‘ही’ योजना मुलींना करणार मालामाल, देते 3 पट परतावा; जाणून घ्या फायदे Read More »

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा

Ram Shinde : भाजपकडून लोकसभेचे उमेदवारांची यादी जाहीर झाली यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली. लोकसभेच्या अनुषंगाने  नगर शहरांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजप आमदार राम शिंदे यांनी मंचावरच सुजय विखे यांना  शुभेच्छा देत त्यांचा सत्कार देखील केला. खासदार सुजय विखे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा आहे त्यासाठी सर्व एकत्र येऊन  काम करणार असल्याचं दोघांनी सांगितलं, लोकसभेची यादी जाहीर होतात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची नगर शहरात आढावा बैठक पार पडली आहे. लोकसभेची रणनीती काय असणार यावरती करण्यात आली. यावेळी भाजपाचे उमेदवार सुजय विखे तसेच आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार राम शिंदे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले की, भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होतो मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं तसेच मी सुजय विखे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिले आहे. तर एकत्र येऊन काम करत असल्याचा सुजय विखे यांनी सांगितलं.

Ram Shinde : राम शिंदे कडून विखेंना शुभेच्छा, राम शिंदेंनी केला होता खासदारकीसाठी दावा Read More »