DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar News : “गाढवाला गुळाची चव कशी कळणार” लंकेवर दिलीप भालसिंग यांचा घणाघात!

Ahmednagar News: निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहमदनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे.  लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की,  ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला. सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेले हे कार्य कोणाच्याही डोळ्यात खुपण्याची गरज नाही. असा घणाघात भाजप नेते दिलीप भालसिंग यांनी केला.  प्रभु रामाच्या आगमनाने अवघा भारत प्रफुल्लीत झाला असताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील कोणत्याही घटकातील नागरिकाला आपल्या आर्थिक अडचणीमुळे हा आनंद साजरा करण्यास अडचण येऊ नये यासाठी हा उपक्रम राबविला.त्यात पारनेरच्या आमदाराच्या बुडाला आग लागण्याचे कोणतेही कारण नाही. अशा सनसनाटी शव्दात  दिलीप भालसिंग यांनी लंकेचा समाचार घेतला. त्याच बरोबर पाच वर्षे  ‘आपला माणूस’म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे.  लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला देऊन उपकृत करावे असा टोला देखील लगावला. विखेंनी साखर आणि डाळ वाटून धार्मिक कार्यात हातभार लावला त्यासाठी त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेची गरज नाही. त्यासाठी ते स्वत: सक्षम आहेत. सामाजिक बांधिलकी ही काय असते हे विखे पाटील परिवाराकडून लंकेनी शिकावे असा सल्ला सु्द्धा भालसिंग यांनी दिला.   गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे. त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही.हे खंडणीखोर आपला माणूस असल्याचा टेंबा मिरवणाऱ्याला काय कळणार? मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्या निलेश लंके यांना काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.   विखेंनी तरी डाळ साखर वाटून लोकांचा आंनद गोड केला. पण तुम्ही सुपा एमआयडीसीतील व्यापाऱ्यांचे  खिसे कापून त्यांना दरिद्री बनवले आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवण्याआधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे  तपासून घ्यावे असा सल्ला दिलीप भालसिंग यांनी निलेश लंके यांना दिला आहे.

Ahmednagar News : “गाढवाला गुळाची चव कशी कळणार” लंकेवर दिलीप भालसिंग यांचा घणाघात! Read More »

Sujay Vikhe: भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर, विखेंना जबरदस्त रिस्पॉन्स

Sujay Vikhe: डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे काल आयोजन  करण्यात आले होते. यावेळी कामोठेकरांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हजारो नागरिकांच्या वतीने डॉ. सुजय पाटील यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी  आम्ही पारनेरकर, विजुभाऊ औटी मित्र परिवार व कोमोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने कामोठे नगरी दुमदुमली होती. सर्वत्र सुजय विखे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता. मोठ्या थाटामाटात कामोठे पुलापासून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पारनेरकर सहभागी झाले होते.  सदर सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुजय विखे पाटील यांच्या स्वरूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम मध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीने सुजय विखे पाटील येणाऱ्या काळात नेतृत्व करतील, असा विश्वास व्यक्त केला.  तर विजय औटी यांनी व्हिजन असलेला नेता जनतेला मिळणार असून, विखे पाटील कुटुंबीयांनी मागील 50 वर्षांपासून जनतेची सेवा केली असून डॉ. सुजय विखे पाटील, ही परंपरा अखंड चालवत आहेत. यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी असून त्यांच्या चौथ्या पिढीला सत्तेत बसविले आहे. विरोधकांवर ताशरे ओढताना औटी यांनी सुपा midc च्या मध्ये स्थानिकांना डावलून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पारनेर मधील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  या दहशतिला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरंग लागणार असून, त्यांच्या व्हिजनमुळे येणाऱ्या काळात स्थलांतरणाला आळा बसणार असून स्थानिक तरुणांना आपल्या परिसरात काम मिळेल, मागील पाच वर्षांच्या त्यांच्या विकास कामामुळे  जनतेचा नेता म्हणून डॉ. सुजय विखे पाटील लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत सदरची निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे. यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे. विखे परिवार सदैव पारनेरकरांच्या पाठीशी आहे. मी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार असून येणाऱ्या काळात फक्त विकासाचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पारनेर,अहिल्यानगर, आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Sujay Vikhe: भूमीपुत्राच्या स्वागतास लोटला जनसागर, विखेंना जबरदस्त रिस्पॉन्स Read More »

Maharashtra News: दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा, 96 हजारांचा मुददेमाल उध्वस्त

Maharashtra News:- अकोला  जिल्ह्य़ातील व बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या  उरळ पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई पोलीस स्टेशन उरळ हवदीतील ग्राम डोंगरगाव शिवार मन नदी पात्रात मोहा हातभटटी गावठी दारू वरती रेड करून एकूण ९६००० रू.चा मुददेमाल नाश करण्यात आला. ०७ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील ग्राम डोंगरगाव येथील मन नदी पात्रामध्ये काही इसम मोह हातभटटी गावठी दारू काढत असल्याची माहीती मिळाल्यावरून आम्ही पोलीस. स्टॉप व पंच सह गावठी हातभटटीची दारू काढणारे इसमांवर रेड केली असता आरोपी नामे १) दादाराव सुलताने, २) गजानन पाखरे दोन्ही (रा. ग्राम डोंगरगाव) यांना पोलीसांची चाहुल लागताच घटनास्थळावरून फरार झाले.  घटनास्थळाची पाहणी केली असता ४५ डब्बे (डब्यात) एकूण ६७५ लिटर सड़वा मोहामाद किं. अं. ६७५००/-रू.व १५ लिटर गावठी मोहा दारू किं.अं. १५००/-रु. अशा एकूण ६९,०००/-रु. चा मिळुन आला. त्यानंतर ३) आरोपी नामें नारायण पांडे रा. डोंगरगाव याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर ०६, डब्बे डब्यात एकूण ९० लिटर सडवा मोहामाच किं. अं. ९०००/-रु.व २० लिटर मोहा गावठी दारू कि.अं. २०००/-रू.असा एकूण ११,०००/-रू.वा मुददेमाल मिळून आला. ४) आरोपी नामे संतोष मेहेंगे रा. घुई ता. शेगांव जि. बुलढाणा याने लावलेल्या हातभटटी गावठी दारूचे घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर १० डबे डब्यात एकुण १५० लिटर सहवा मोहा माच किं. अं.१५,०००/-रू.य १० लिटर मोहा गावठी दारू किं. अं. १००० रू.. असा एकूण १६,०००/-रू. वा मुददेमाल मिळून आला. सदरचा मुददेमाल नाशवंत असल्याने घटनास्थळीच नाश करण्यात आला. आज रोजी ग्राम डोंगरगाव शिवारातील मन नदीचे पात्रात गावठी हातभटटी दारूवर केलेल्या ०३ कारवाईमध्ये एकुण ९६,०००/-रु.चा मुददेमाल घटनास्थळावर नाश करून नमुद आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेले आहेत. सदरची कार्यवाही ही  पोलीस अधिक्षक बच्चन सिंह साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे साहेब, सहायक पोलीस अधिक्षक  गोकुल राज जी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले. ए. एस. आय. राजभाउ बचे, पो. हया. विकास वैधकार, पो. शि. निखिल माळी सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली.

Maharashtra News: दारूच्या हातभट्टी अड्ड्यावर छापा, 96 हजारांचा मुददेमाल उध्वस्त Read More »

Ahmednagar News: नगर जिल्‍ह्यातील 67 हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान

Ahmednagar News: राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्‍ह्यातील ६७ हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना झाला असून, या अनुदानापोटी सुमारे ६१ कोटी रुपये शेतकऱ्यांनाच्‍या बॅक खात्‍यात वर्ग झाले आहेत.  राज्‍य सरकारच्‍या वतीने दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याकरीता ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांनाच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात अडथळे निर्माण होत होते. दूग्‍ध व्‍यवसाय व पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने अनुदानासाठी लावण्‍यात आलेल्‍या अटी आणि नियमांमध्‍ये शिथीलता केल्‍यामुळे अनुदान शेतकऱ्यांनाच्‍या खात्‍यात वर्ग होण्‍यात मोठी मदत झाली. जिल्‍ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असल्‍याची माहीती विभागाच्‍या वतीने देण्‍यात आली.  अकोले तालुक्‍यातील २ हजार ७२५ शेतकऱ्यांना १५ कोटी २४ लाख ९६ हजार, संगमनेर तालुक्‍यातील १७ हजार ११९ शेतक-यांना १२ कोटी १० लाख ६३ हजार, कोपरगाव तालुक्‍यातील ७ हजार ९२ शेतकऱ्यांना ५ कोटी १६ लाख १२ हजार, राहाता तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतक-यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार, श्रीरामपूर तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार, नगर तालुक्‍यातील २ हजार १३८ शेतक-यांना २१ कोटी ५५ लाख ७ हजार, नेवासा तालुक्‍यातील ४ हजार ६८ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पारनेरमध्‍ये ५ हजार ८१४ शेतक-यांना ४ कोटी ८२ लाख ४० हजार, पाथर्डी तालुक्‍यातील २७८ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख ३४ हजार, राहुरी तालुक्‍यातील १२ हजार ५ शेतकऱ्यांना ११ कोटी ६० लाख ६७ हजार आणि श्रीगोंदा तालुक्‍यातील ६ हजार ४५४ शेतकऱ्यांना ५ कोटी ८२ लाख ३१ हजार एवढे अनुदान प्राप्‍त झाले आहे.   जिल्‍ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्‍ह्यातील दूध संघाना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतकऱ्यांची माहीती विभागाने संकलित केली असून, हे दूध उत्‍पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नयेत म्‍हणून, त्‍यांनाही अनुदनाचा लाभ मिळाला आहे. अशा शेतक-यांची संख्‍या ही २९ हजार ४४१ असून, या शेतकऱ्यांना ५ कोटी २३ लाख ६६ हजार ९१५ रुपयांचे अनुदान मिळण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहु नये यासाठी विभागाने १५ एप्रिल पर्यंत मुदत वाढविली असल्‍याचेही विभागाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

Ahmednagar News: नगर जिल्‍ह्यातील 67 हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांचे अनुदान Read More »

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल

Nilesh Lanke News : गेली पन्नास,साठ वर्षे आमच्याकडे जिल्ह्याची सत्ता असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगतात.या काळात त्यांनी केलेले असे एक काम दाखवावे की जे पंचवीस वर्षे जनतेच्या लक्षात राहिले आहे.त्यांच्याकडे मंत्रीपदे होती, आहेत.पण एकही मोठा प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणला नाही.त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण नगर जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले.असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रावर केला.  स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, जि.प.चे मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  लंके म्हणाले, तुमच्या तालुक्याला खासदार धार्जिण नाही असे भाषणातून सांगण्यात येते. ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही ते कृतघ्न असतील. परंतू नीलेश लंके हा माणूस असा आहे की एखाद्याने एकदा मदत केली तर मी त्याला आयुष्यभर विसरत नाही. त्याला शंभरवेळा मदत केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आपल्या संकटात ज्यांनी मदत केली त्यांना मदत करण्याची भावना मनात असली पाहिजे.  विखेंना ज्यांनी मदत केली, त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांनी त्यांना नगर शहर दाखविले. निवडणूकीनंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही आम्ही कोण ?असा सवाल लंके यांनी  केला.    राजकारणात जिरवाजिरवी करण्यापेक्षा मी कामाला महत्व देणारा माणूस आहे.तुम्ही म्हणाल खरोखर माणूस भेटला आपल्याला. त्यांच्याकडे कामापेक्षा जिरवाजिरवीला जास्त महत्व असते. मागच्या निवडणूकीत त्यांनी मोठ मोठ्या गप्पा केल्या. सहा महिन्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. ते प्रचाराला गेल्यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडून मते मागतील.  खासदारांनीही कामाचा लेखाजोखा मांंडणे अपेक्षीत असताना अपयश झाकून ठेवण्यासाठी डाळ आणि साखर वाटप करण्याची आयडीया त्यांनी शोधून काढल्याचे लंके म्हणाले.  नादी लावणारांना  घरी पाठविण्याची वेळ  पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. शेतकऱ्याचा जोड धंदा असलेल्या दुधाला २२,२३ रूपयांचा भाव मिळतो आहे. पालकमंत्री दुग्धविकास मंत्री आहेत ते दुधाला भाव का वाढून देत नाहीत ? ते म्हणाले, ५ रूपये अनुदान देऊ. कागद गोळा केले, शेतकऱ्यांना नादी लावले अनुदान मात्र मिळालेच नाही. हे लोक नादी लावणारे असून त्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.  रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर नाव बदलेल नगर-पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केले ते उपोषणही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या उपोषणानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले. १३ तारीख होऊ द्या, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर मी माझे नाव बदलून ठेवील. आभाळ फाटलंय, कोणतीच यंत्रणा शिवू शकणार नाही ! पूर्वी निवडणूकीच्या प्रचारासाठी एखादा नेता येणार असेल तर हातापाया पडून लोक जमा करावे लागत असत. इथे उलटे झाले आहे. दोन, दोन, तीन, तीन तास लोक वाट पाहत आहेत. जिल्हयात असे भासविले जाते की यंत्रणा, यंत्रणेचा याला फोन, त्याला फोन. कसली यंत्रणा ? यंत्रणा फिंत्रणा काही नाही ! आभाळ फाटल्यावर कोणीही रोखू शकत नाही. फाटलेले आभाळ शिवायला जगात कोणतीही यंत्रणा नाही असे लंके यांनी सांगितले.

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल Read More »

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe On Congress:  काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील  बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा पडखर समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. क्रॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल सुद्धा डॉ. विखे यांनी विचारला आहे. अनेक दशक देशात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती  मिळत आहेत. मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.  जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ मोठी विकास कामे झाली आहेत. यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त करत केवळ विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे घराघरात मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पोहचवा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे Read More »

Health Tips: सावधान, दुधासोबत ‘हे’ 7 पदार्थ चुकून खाऊ नये, आरोग्यासाठी ठरणार हानिकारक

Health Tips : दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहे कारण दुधात पोषक तत्त्व जसे कॅल्शियम, प्रोटीन इतर आढळतात ज्याने शारीरिक विकास होण्यास मदत होते. परंतू दुधाचे सेवन करताना यासोबत कोणते असे पदार्थ आहे जे आहारात सामील करू नये जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण अशात आरोग्यावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. नमकीन मीठ आणि दूध याचे सोबत सेवन करणे चुकीचे आहे कारण अशात लिव्हरसंबंधी त्रास उद्भवण्याची शक्यता असते. दुधात प्रोटीन आणि मिठात आयोडीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचा विपरित प्रभाव लिव्हरवर पडतो. केळी अनेक लोक वजन वाढवण्यासाठी दुधासोबत केळी खातात परंतू दूध आणि केळ शेक या रूपात घेतल्यास फायदा होतो परंतू ज्यांना फक संबंधी तक्रार असेल त्यांनी याचे सेवन करणे टाळावे. कच्चा कांदा दूध पिण्यानंतर किंवा आधी लगेच कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचा संबंधी समस्या उद्भवू शकते. स्किन इन्फेक्शन, खाज इतर समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. मासे मासे खात असल्यास त्यासोबत दूध किंवा दुधाने तयार कोणतेही पदार्थ खाणे टाळावे. नाहीतर त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात. मसालेदार पदार्थ मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यावर लगेच दूध पिण्याने पचन तंत्रावर विपरित परिणाम होतो. जेवण पचण्यास त्रास होत असून पोट दुखी, जळजळ, गॅस सारख्या समस्यांना सामोरा जावं लागतं. उडद डाळ अनेक लोक रात्री उडीद डाळीचे सेवन केल्यावर दूध पितात. परंतू असे केल्याने अन्न पचायला त्रास होतो. सोबतच पोटाशी निगडित समस्यांना सामोरा जावं लागतं. आंबट पदार्थ दूध पिण्यानंतर लगेच दही, लिंबू किंवा इतर आंबट फळं खाल्ल्याने अपचन होतं. पोटात दूध फाटल्यामुळे अॅसिडिटी, उलटी किंवा मळमळणे अश्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.

Health Tips: सावधान, दुधासोबत ‘हे’ 7 पदार्थ चुकून खाऊ नये, आरोग्यासाठी ठरणार हानिकारक Read More »

Weather Update: उष्णतेचा कहर! ‘या’ भागात पारा 40 अंश पार; 41 जण आजारी

Weather Update : राज्यात आता उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. राज्यातील बहूतेक ठिकाणी आता कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला आहे.  जे सामान्यपेक्षा काही अंशांनी जास्त आहे. तर कडक उन्हामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने  या उन्हाळी हंगामात उष्णतेच्या लाटेसह तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात सध्या तीव्र उष्णतेचे कारण म्हणजे उत्तर-पश्चिम भारतातील उष्ण प्रदेशातून येणारी हवा आणि महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरात तयार झालेले अँटी-सायक्लोनिक परिचलन. १ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रात उष्माघाताची 41 प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी २८ पैकी सर्वाधिक प्रकरणे गेल्या पंधरवड्यात आढळून आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बुलढाण्यात उष्माघाताचे सर्वाधिक पाच, तर कोल्हापूर आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी ४ बळी गेले आहेत. तर पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये दुपारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. गुरुवारी बीडचे कमाल तापमान ४०.३ अंश, जळगाव ४०.६ अंश, जेऊर ४२ अंश, मालेगाव ४२ अंश, मोहोळ ४१.१ अंश, नांदेड ४१.२ अंश, धाराशिव ४१.२ अंश, परभणी ४१.७ अंश, सांगली ४०.४ अंश, सोहळे ४० अंश सेल्सिअस होते. रेकॉर्ड केले.

Weather Update: उष्णतेचा कहर! ‘या’ भागात पारा 40 अंश पार; 41 जण आजारी Read More »

Lok Sabha Elections 2024: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘या’ उमेदवाराचे अर्ज रद्द

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक आहे. यामुळे सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरात प्रचार करताना दिसत आहे.  तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. VBA च्या एका उमेदवाराचे अर्ज रद्द करण्यात आले आहे.   यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जातील त्रुटींमुळे तो रद्द करण्यात आला आहे.  यवतमाळ-वाशीममध्ये होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पाहता येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल होती. आज प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. याच प्रक्रियेत VBA उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्याने त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 4 एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिममधून उमेदवार बदलून सुभाष खेमसिंग पवार यांच्या जागी तरुण अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती. यानंतर अखेरच्या दिवशी अभिजीतने उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 38 उमेदवारांचे 49 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. येथे महायुतीकडून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीचे संजय देशमुख आहेत. VBA उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने MVA आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. यानंतर दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे.

Lok Sabha Elections 2024: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘या’ उमेदवाराचे अर्ज रद्द Read More »

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील

Maharashtra News:  केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.  भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी  हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये.  तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील Read More »