Dnamarathi.com

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक आहे. यामुळे सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरात प्रचार करताना दिसत आहे. 

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. VBA च्या एका उमेदवाराचे अर्ज रद्द करण्यात आले आहे. 

 यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जातील त्रुटींमुळे तो रद्द करण्यात आला आहे.

 यवतमाळ-वाशीममध्ये होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पाहता येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल होती. आज प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. याच प्रक्रियेत VBA उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्याने त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 4 एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिममधून उमेदवार बदलून सुभाष खेमसिंग पवार यांच्या जागी तरुण अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती. यानंतर अखेरच्या दिवशी अभिजीतने उमेदवारी अर्ज दाखल केला.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 38 उमेदवारांचे 49 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. येथे महायुतीकडून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीचे संजय देशमुख आहेत. VBA उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने MVA आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. यानंतर दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *