DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra News: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा हस्ते ध्वजदिन निधी 2024 निधी संकलन शुभारंभ

Maharashtra News : जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी 2024 निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी सालीमठ यांनी केले. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उप विभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले , साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, कर्नल साहेबराव शेळके (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर वि.ल. कोरडे (निवृत्त) आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जिल्ह्यात सैनिक आणि माजी सैनिकांची साधारण १४ हजार कुटुंबे आहेत. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन महत्वाचे आहे. यावर्षी २ कोटी ८० लाखाचे उद्दिष्ट असले तरी ६ कोटीचा निधी संकलित करण्याचे उद्दीष्ट ठेवून प्रत्येकाने यात भरीव योगदान द्यावे. प्रत्येक अधिकारी – कर्मचाऱ्याने एक दिवसाचा पगार ध्वजदिन निधीसाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्याने गेल्यावर्षी विक्रमी संकलन केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी,कर्मचारी आणि नागरिकांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे. सैनिकप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. पद्मश्री पवार म्हणाले, वीर जवान सीमेवर आणि किसान गावातील शेतात देशासाठी कार्य करतो. या दोघांवर देशाची जबाबदारी आहे. देशासाठी सीमेवर लढताना अनेक बांधवांना वीर मरण येते, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अधिकाधिक निधी संकलित व्हावा यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे आणि माजी सैनिकांना शक्य असेल तिथे सहकार्य करावे. पुढील वर्षी जिल्ह्यातील सरपंचांचे ध्वजदिन निधीला भरीव योगदान राहावे यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकात कोरडे म्हणाले, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्यात येते. यात लोकसहभागाला महत्व आहे. सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीत राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी ५ कोटी ८ लाख रुपये अर्थात उद्दिष्टाच्या २७५ टक्के निधी संकलन करण्यात आले आणि २ कोटी १८ लाख रुपयांचा निधी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मनोहर नरहरी नातू यांच्यावतीने वीर पत्नी कौसल्या एकनाथ कर्डिले यांना एक लाख रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नातू यांनी सलग दहाव्या वर्षी असा निधी दिला आहे. यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. माजी सैनिक भाऊसाहेब रावजी पवार यांच्यातर्फे देण्यात येणारा १० हजाराचा निधी वीरपत्नी मिनाबाई भानुदास गायकवाड यांना धनादेशाद्वारे देण्यात आला. ध्वजदिन निधीसाठी १० हजार रुपये योगदान देणाऱ्या रामकृष्ण क्षीरसागर महाराज आराधना भक्त मंडळ आणि २ लाख रुपये योगदान देणाऱ्या सन फार्मा प्रा.लि. चा यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. सीजी पॉवर संस्थेतर्फे सामाजिक दायित्व निधीतून सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी २५ लाख रुपयाचे काम केल्याबद्दल संस्थेच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांसाठी कार्य करणाऱ्या अक्षय टेमकर आणि ज्ञानदेव शेळके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता आदी उपस्थित होते.

Maharashtra News: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा हस्ते ध्वजदिन निधी 2024 निधी संकलन शुभारंभ Read More »

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. उड्डाणपुलावर गाडीवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या दरम्यान अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. सदरचे वाहन ऊसमाल वाहतूक ट्रक असून उड्डाण पुलाच्या तीव्र वळणावर ट्रक चालकाला वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने ट्रक पुलावर पलटी होऊन गाडीतील काही माल पुलावरून थेट खाली कोसळला. दरम्यान थंडी तसेच रात्रीची वेळ असल्याने पूलाखालील वाहतूक कमी होती त्यामुळे पुन्हा एकदा मोठी जीवितहानी टळली. गेल्या वर्षभरात याच बहुचर्चित उड्डाणपुलावर अनेक अपघात घडले असेल तरी अद्याप प्रशासनाकडून कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही.

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर पुन्हा अपघात, ट्रक पुलावरून पलटी Read More »

Maharashtra Politics: भाजप देणार शिंदेंना धक्का, मिळणार नाही गृहमंत्रालय?

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलाय. माहितीनुसार 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये बैठक घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. बुधवारी (11 डिसेंबर) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची बैठक झाली. अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच ही बैठक घेतली होती. ज्यामध्ये महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या खात्यांच्या वाटपावर चर्चा झाली. शिंदे गटाला गृहमंत्रालय मिळणार नाहीया बैठकीबाबत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 14 डिसेंबरला घोषणा होऊ शकते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला गृहमंत्रालय मिळणार नाही, असेही सांगण्यात आले. शिवसेनेला नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी मिळू शकते. भाजप मुख्यमंत्रिपदासह 21 ते 22 मंत्रीपदे राखू शकतो. दुसरीकडे चार-पाच मंत्रीपदे रिक्त ठेवली जाऊ शकतात, असेही मानले जात आहे. राज्यात पोर्टफोलिओ वाटपाच्या चर्चेला सतत विलंब होत आहे, कारण इथल्या सरकारमध्ये तीन पक्ष सामील आहेत की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने 233 जागा जिंकल्या आहेत. त्यात भाजपच्या 132 जागा, शिवसेनेच्या 57 जागांवर आणि राष्ट्रवादीच्या 41 जागांवर भाजपने 149 उमेदवार उभे केले होते. शिवसेनेने 81 तर राष्ट्रवादीने 59 उमेदवारांना तिकीट दिले होते, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारमधील खात्यांच्या वाटपात प्रत्येक मित्रपक्षाचा वाटा ठरवण्यासाठी सहा आमदारांवर एक मंत्रिपदाचा फॉर्म्युला विचारात घेतला जाणार आहे.

Maharashtra Politics: भाजप देणार शिंदेंना धक्का, मिळणार नाही गृहमंत्रालय? Read More »

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करा अन्यथा…, अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Beed News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून जर आरोपींना शिक्षा झाली नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग ता. केज, जि. बीडचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून अतिशय निर्दयीपणे त्यांचे डोळे काढून खून करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे. याप्रकरणाबाबत आम्ही मागण्या करतो की, संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना व केजच्या पोलीस निरीक्षकांचे निलबंन करून त्यांना सहआरोपी करावे. हे प्रकरण सीआयडीकडे हस्तातरीत करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री. शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देवून पुर्नवसन करावे. आमच्या या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करा अन्यथा…, अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा Read More »

EVM Scam : विरोधकांना धक्का, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी अनियमितता नाहीच..

EVM Scam : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. मात्र आता विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. विरोधकांनी केलेले ईव्हीएम मतांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीच्या डेटामध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. सर्व 288 जागांवर व्हीव्हीपीएटी स्लिप जुळल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 व्हीव्हीपीएटी मशिन्सची मोजणी करण्यात आली होती जेणेकरून ती ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या मतांच्या संख्येशी जुळता येईल. “या अंतर्गत, मतमोजणीच्या दिवशीच 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात एकूण 1440 व्हीव्हीपीएटी मशिन्सची मोजणी करण्यात आली आणि त्यांच्या संबंधित ईव्हीएम क्रमांकाशी जुळणाऱ्या कोणत्याही व्हीव्हीपीएटी स्लिपमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही.” अधिकृत विधानानुसार, 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा जागेवरील 5 यादृच्छिकपणे निवडलेल्या मतदान केंद्रांची व्हीव्हीपीएटी स्लिप मोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली. व्हीव्हीपीएटी स्लिप काउंट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट गणनेमध्ये कोणतीही तफावत आढळली नाही.राज्यातील विरोधी पक्षांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे हे विधान आले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हीए) निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत निषेध केला होता. ईव्हीएममध्ये छेडछाड करून सत्ताधारी आघाडीने लोकशाहीची हत्या केली आणि प्रचंड बहुमत मिळवले, असा दावा विरोधकांनी केला. मात्र, महायुतीने विरोधकांचे आरोप फेटाळून लावत ईव्हीएमच्या नावाखाली आपला दणदणीत पराभव लपवायचा असून त्यामुळे जनतेची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे.

EVM Scam : विरोधकांना धक्का, ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी अनियमितता नाहीच.. Read More »

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ग्राहकांच्या असलेल्या अडी-अडचणी व प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून समन्वयाने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत नाही ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्राहकांच्या विद्यूत विषयक समस्या सोडविण्यासाठी तालुका व जिल्‍हा पातळीवर ऊर्जामित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने या तारांची तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात यावी. अहिल्यानगर शहरामध्ये गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये रुग्णहक्क सनद तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतचे फलक लावण्यात यावेत. ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत. रिफ्लेक्टर न बसविलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचनाही सालीमठ यांनी यावेळी केल्या. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुऱ्हाडे, विलास जगदाळे, रणजित श्रीगोड, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर उपस्थित होते.

Siddharam Salimath: ग्राहकांचे प्रश्न समन्वयातून सोडवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींची संख्या 49 वर पोचली आहे. यापूर्वी 4 मृत्यू आणि 25 जखमी झाल्याची बातमी होती. बेस्ट बसची धडकमुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा ‘बेस्ट’च्या बसने सोमवारी रात्री पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की असा संशय आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) एल. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने वार्डाजवळ हा अपघात झाला. बस चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मार्ग क्रमांक 332 वर बेस्ट बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडकली. ते म्हणाले की, यानंतर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाची बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली. बस तीन महिन्यांची होतीमिळालेल्या माहितीनुसार, बसचा नोंदणी क्रमांक MH01-EM-8228 असा आहे. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झाला. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12 मीटर लांबीची ही इलेक्ट्रिक बस हैदराबादस्थित ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ने बनवली आहे आणि ती बेस्टने भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशा बसेसचे चालक खासगी चालक पुरवतात, अशी माहिती त्यांनी दिली. तारदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने सांगितले की, “बस फक्त तीन महिन्यांची आहे. यावर्षी 20 ऑगस्ट रोजी EVEY Trans नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदणी करण्यात आली आहे.

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी Read More »

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून

Beed News : बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून हत्या करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय. सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तर मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून Read More »

Maharashtra Politics: ‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार, हसन मुश्रीफ, नितेश राणेंना मिळणार संधी?

Maharashtra Politics: तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 05 डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार 14 तारखेला होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी महायुती सरकारच्या काळात मंत्री असणाऱ्या अनेक नेत्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणाला मंत्रीपदाची संधी मिळू शकते.(संभाव्य मंत्री)भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस

Maharashtra Politics: ‘या’ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार, हसन मुश्रीफ, नितेश राणेंना मिळणार संधी? Read More »

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला !

Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात. अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर खरंच पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी ला वाहवा दिली आहे. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला ! Read More »