DNA मराठी

ताज्या बातम्या

Jaykumar Rawal 840x1024

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप

Jayakumar Rawal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. तर आता मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले असल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल गोटे यांनी केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडाताखाली आपली जमीन जात असल्याचे भासवून खोटे अर्ज करून महाराष्ट्र शासनाकडून मंत्री जयकुमार रावल यांनी तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये हडप केले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे. मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतला आहे. तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून तीन वेळा सदर जमिनीचा जॉइंट सर्वे करण्यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेटीस धरून सदर कृत्य मंत्री जयकुमार रावल यांनी केल्याचे म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावर तक्रार देखील दिली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. मंत्री जयकुमार रावल तसेच धुळे महानगरपालिका भ्रष्टाचार विरोधात अनिल गोटे हे सातत्याने आवाज उठवत आहे व वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागत असल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनिल गोटे यांच्या संदर्भात गांभीर्याने चर्चा झाली असून मराठवाड्यातील बीड पॅटर्न प्रमाणे धुळ्यातील राजकीय विरोधक असलेले अनिल गोटे यांचा संतोष देशमुख सारखाच बंदोबस्त केला पाहिजे अशी चर्चा झाली असल्याचे आपल्याला पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खात्रीशीर माहिती दिली असल्याचे अनिल गोटे यांनी यावेळी सांगितले.

आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार रावल यांच्यावर 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप Read More »

Devendra Fadnavis

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

Ladki Behen Yojana : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारी लाडकी बहिण योजना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याची घोषणा महायुती कडून करण्यात आली होती मात्र आतापर्यंत याबाबत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका करत आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025 – 26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे.अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेसाठी 36 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पात देखील लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सभागृहात महायुती सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजकोषीय संतुलन साधल्यानंतर, महाराष्ट्र सरकार आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करेल आणि माझी लाडकी बहीणयोजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये; मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा Read More »

Donald Trump

41 देशांच्या प्रवासावर बंदी येणार, डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

Donald Trump : अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याचे तयारीत आहे. ट्रम्प प्रशासन डझनभर देशांच्या नागरिकांवर व्यापक प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण 41 देशांना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागता येईल. 10 देशांच्या पहिल्या गटात अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारखे देश आहेत, ज्यांचे व्हिसा पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. दुसऱ्या गटात, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदानसह पाच देशांना अंशतः निलंबनाचा सामना करावा लागेल, ज्यामुळे पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसा तसेच काही अपवादांसह इतर स्थलांतरित व्हिसा प्रभावित होतील. जर पाकिस्तान, भूतान आणि म्यानमारसह एकूण 26 देशांच्या सरकारने “60 दिवसांच्या आत कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत” तर तिसरा गट त्यांना अमेरिकन व्हिसा देण्यावर अंशतः बंदी घालण्याचा विचार करेल. यादीत बदल होऊ शकतातएका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यादी बदलू शकते आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह प्रशासनाने अद्याप तिला मान्यता दिलेली नाही. हे पाऊल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात सात मुस्लिम बहुल देशांमधून प्रवाशांना प्रवेश बंदी घालण्याच्या धोरणाची आठवण करून देते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला मान्यता देण्यापूर्वी अनेक वेळा या धोरणाचे रिव्ह्यू केले. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे की नाही हे शोधण्यासाठी अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या कोणत्याही परदेशी व्यक्तीची सखोल सुरक्षा तपासणी करणे आवश्यक आहे. त्या आदेशात अनेक मंत्रिमंडळ सदस्यांना 21 मार्चपर्यंत अशा देशांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते ज्यांमधून प्रवास अंशतः किंवा पूर्णपणे निलंबित करावा कारण त्यांची “चाचणी आणि तपासणीची माहिती अत्यंत अपुरी आहे.” ट्रम्प यांनी ऑक्टोबर 2023 च्या भाषणात त्यांच्या योजनेचा आढावा घेतला, गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन आणि “आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही ठिकाणाहून” लोकांना बंदी घालण्याची प्रतिज्ञा केली.

41 देशांच्या प्रवासावर बंदी येणार, डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय Read More »

Police

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद

Maharashtra News: नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे, ही बाब केवळ स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर पोलीस व्यवस्थेसाठीही मोठी आव्हाने निर्माण करत आहे. या परिसरात टोळी युद्धाची घटना वाढत आहेत, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. अवैध धंद्यांचे परिणामनगर एमआयडीसी हा औद्योगिक क्षेत्र असून, येथे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यांमध्ये अवैध दारू विक्री, सावकारी आणि इतर गैरकायदेशीर कारवाया समाविष्ट आहेत. यामुळे या परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे आणि टोळी युद्धाच्या घटना घडत आहेत. या टोळी युद्धात अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक पोलिसांची भूमिकास्थानिक पोलिसांची भूमिका या संदर्भात संशयास्पद असल्याचे आरोप आहेत. पोलिसांकडून योग्य प्रमाणात कारवाई न झाल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या असताना, त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सामाजिक परिणामया अवैध धंद्यांमुळे स्थानिक समाजावरही वाईट परिणाम होत आहेत. अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याने त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे आणि समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय केले नाही तर भविष्यात ही समस्या आणखी वाढू शकते. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या असल्याचे सांगितले. “पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने ही समस्या वाढत आहे. आम्ही अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत, पण काहीच बदल होत नाही,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले. नगर एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवर तातडीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पोलिसांनी सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अल्पवयीन मुलांचा वापर होऊ नये म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. या समस्येवर उपाय केल्याशिवाय समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास थांबणार नाही.

नगर एमआयडीसीमध्ये अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी वाढली, पोलिसांची भूमिका संशयास्पद Read More »

Crime

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण

Maharashtra News: मुकुंदनगर येथील मौलाना आझाद शाळेजवळ काल (दि. 13 मार्च) सायंकाळी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नाझीम नामक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर काही काळ मुकुंदनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

मुकुंदनगरमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, परिसरात तणावाचे वातावरण Read More »

Tata Car

Tata CNG Car: स्वस्तात मस्त, टाटाने CNG सह लॉन्च केली सफारीसारखी कार

Tata CNG Car : भारतीय बाजारात टाटा ऑटो कंपनी लोकप्रिय हॅचबॅक कार टियागोचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. नवीन कारमध्ये एकापेक्षा एक फीचर्स स्टाइलिंग अपडेट्स आणि नवीन ट्रान्समिशन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहे. 2025 टाटा टियागो एनआरजीची किंमत आता 7.2 लाख ते 8.75 लाख एक्स-शोरूम आहे. हे मॉडेल फक्त टियागोच्या टॉप-स्पेक XZ ट्रिममध्ये उपलब्ध आहे. 2025 च्या टियागो प्रमाणेच, नवीन टियागो एनआरजीमध्ये मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, तर मोठा बदल म्हणजे सीएनजी-एएमटी पर्याय. 2025 टाटा टियागो एनआरजीमध्ये काही किरकोळ स्टायलिश अपडेट्स आहेत. यामध्ये नवीन मॅट ब्लॅक क्लॅडिंगसह नवीन डिझाइन केलेला बंपर आणि पुढील आणि मागील बाजूस जाड सिल्व्हर स्किड प्लेट्सचा समावेश आहे. 15-इंच स्टीलच्या चाकांना वेगवेगळे कव्हर मिळतात. कारमध्ये सीएनजीचा पर्याय टाटा टियागो एनआरजीमध्ये 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 84.8 बीएचपी पॉवर निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटसह जोडलेले आहे. सीएनजी व्हर्जन 71 बीएचपी पॉवर निर्माण करण्यासाठी तयार केलेली आहे आणि 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटशी जोडलेली आहे. या मॉडेलसाठी CNG-AMT हा एक पूर्णपणे नवीन पर्याय आहे आणि गेल्या वर्षी Tiago CNG मध्ये सादर करण्यात आला होता. अपडेटेड टाटा टियागो एनआरजी मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई ग्रँड आय10 निओस या कारशी स्पर्धा करणार आहे.

Tata CNG Car: स्वस्तात मस्त, टाटाने CNG सह लॉन्च केली सफारीसारखी कार Read More »

Water

Health Tips : जास्त पाणी पिणे किडनीसाठी असते धोकादायक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Tips : किडनी या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. जर किडनीचे आरोग्य बिघडले तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा किडनीचे आजार जीवघेणे ठरतात. त्यामुळे किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार जर जास्त प्रमाणात पाणी प्यायले तर ते किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शरीराला आवश्यक तितकेच पाणी प्यावे. जास्त पाणी पिणे रक्तातील सोडियमची पातळी कमी करते. याच कारणामुळे हायपोनाट्रेमियाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हृदयरोग असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हायड्रेशनची पूर्ण काळजी घ्यावी. किती पाणी प्यावे?प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, परंतु सामान्यत: प्रौढांनी दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. दिवसभर पाण्याचे सेवन करत राहा. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. आपण सकाळी प्रथम एक ग्लास पाणी प्या, त्यानंतर हळूहळू दिवसभर पाण्याचे सेवन करा.

Health Tips : जास्त पाणी पिणे किडनीसाठी असते धोकादायक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत Read More »

Tamil Nadu ₹ Symbol

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले

Tamil Nadu ₹ Symbol : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेचा विरोध मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर आता तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पातून ₹ हे चिन्ह काढून टाकले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने ₹ च्या जागी ‘ரூ’ (ru) चिन्ह स्वीकारले आहे, जे तमिळ लिपीतील एक अक्षर आहे. देशभरात ₹ चिन्ह बदलण्याची ही पहिलीच घटना आहे आणि तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषा वादाशी याचा संबंध जोडला जात आहे. रुपया (₹) चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाइन केलेल्या भारतीय तिरंग्यापासून प्रेरित होते. धर्मलिंगम हे तामिळनाडूचे आहेत आणि त्यांची रचना पाच निवडलेल्या चिन्हांमधून निवडण्यात आली. हे चिन्ह 2010 मध्ये स्वीकारण्यात आले आणि ते भारतीय चलनाचे अधिकृत चिन्ह बनले. विशेष म्हणजे, धर्मलिंगम हा तामिळनाडूतील एका माजी आमदाराचा मुलगा आहे. ₹ च्या जागी नवीन चिन्हआता, तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावण्याचा निर्णय राज्यात सुरू असलेल्या हिंदी विरोधी चळवळीशी जोडला जात आहे. तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्ध बऱ्याच काळापासून राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अलीकडेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या मुद्द्यावर विधान केले आहे. हिंदी लादण्याच्या प्रयत्नामुळे भारतातील प्राचीन भाषा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्थानिक भाषा नाहीशा होत आहेत, असे स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणच्या भाषांचे उदाहरण दिले, जिथे हिंदीच्या दबावाखाली स्थानिक भाषा मरत आहेत. त्यांच्या मते, हिंदीने अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत आणि त्यामुळे त्या भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा भाषेबाबत वाद सुरू झाला आहे. तामिळनाडू सरकारच्या या पावलामुळे राज्याची, विशेषतः हिंदीबद्दलची भूमिका स्पष्ट होते आणि सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले Read More »

Maharashtra Politics

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदले असून 11 विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारली आहे. संगमनेरमध्ये देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर विखेंनी बाळासाहेब थोरात यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का दिला असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात थोरात विरुद्ध विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षाचे प्रमुख कारण म्हणजे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा मुद्दा. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पनाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्यासाठी 30 टक्के जमिनीचे संपादन झाले आहे. या प्रकल्पामुळे या भागातील विकासाच्या नव्या दिशा खुल्या होतील, परंतु त्याचबरोबर राजकीय नेत्यांमधील वादही तीव्र होत आहेत. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील हा वाद केवळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतच नाही तर त्याच्या राजकीय फायद्यांबाबतही आहे. आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालयसंगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी या कार्यालयाची स्थापना आश्वीलाच होणार असल्याची स्पष्टोक्ती केली आहे. या मुद्द्यावरून थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय शह-काटशह सुरू आहे. राजकीय परिणामया संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर पडतील. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हे दोन्ही दिग्गज नेते आहेत आणि त्यांच्यातील वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. या वादाचा फायदा इतर राजकीय पक्षांना घेता येऊ शकतो, ज्यामुळे राज्यातील राजकीय स्थिती अधिक जटिल होऊ शकते. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यातील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. या संघर्षाचे परिणाम राज्याच्या राजकीय भूमितीवर पडतील आणि त्याचा फायदा घेण्यासाठी इतर राजकीय पक्षांना संधी मिळू शकते.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प अन् थोरात-विखे पुन्हा आमनेसामने Read More »

KL Rahul

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »