DNA मराठी

ताज्या बातम्या

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.    बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे.  या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर … Read More »

IND vs SL Live Streaming :  Hotstar-Jio Cinema वर दिसणार नाही IND vs SL सामना, ‘येथे’ येणार पाहता

IND vs SL Live Streaming : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर आजपासून (27 जुलै) भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका खेळणार आहे. भारत-श्रीलंका मालिका खूपच रोमांचक होणार आहे.  त्यामुळे T20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होईल आणि तुम्ही ते टीव्हीवर कुठे पाहू शकता ते जाणुन घ्या  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कधी होणार? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना 27 जुलै रोजी होणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कुठे खेळला जाईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता? भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार? भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रसारण सोनी लिव्हवर होणार आहे. दोन्ही संघ भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रायन पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद. श्रीलंका- चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चामिंडू विक्रमसिंघे, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, कुसल परेरा, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, महेश थेकशाना फर्नांडो, महेश थेकशाना फेरनांदो, आणि दिलशान मधुशंका.

IND vs SL Live Streaming :  Hotstar-Jio Cinema वर दिसणार नाही IND vs SL सामना, ‘येथे’ येणार पाहता Read More »

IMD Alert: मान्सून सक्रिय, पुण्यात रेड अलर्ट, गुजरातमध्ये 8 जणांचा मृत्यू

IMD Alert: देशातील बहुतेक भागात सक्रिय मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी भूस्खलनाने रस्ते अडवले तर काही ठिकाणी रेल्वे, रस्ते आणि हवाई सेवा ठप्प झाली आहे. सध्या राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील 4 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 25 ते 26 जुलै, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 26-27 जुलै, पश्चिम राजस्थानमध्ये 25, 26 आणि 29 जुलै रोजी जोरदार पाऊस पडू शकतो. राजधानी दिल्लीत पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्याची परिस्थिती वाईट  मुसळधार पावसाने मुंबईला ब्रेक लावला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे, बस आणि हवाई सेवा प्रभावित झाली आहे. अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. जुलैमध्ये आतापर्यंत येथे 1500 मिमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे, रात्रभर पडलेल्या पावसानंतर पुण्यातील परिस्थितीही बिकट झाली. शाळांना सुटी देण्यात आली आहे आणि लोकांना मदत करण्यासाठी बोटी तैनात करण्यात आल्या. शहरात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दल, पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक अनेक भागात मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. गुजरातमध्ये 8 जणांचा मृत्यू गुजरातमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडोदरा, भरूच, सुरत आणि आनंदसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये पावसामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ईशान्येकडील पावसाची शक्यता कमी झाली आहे, तर राजस्थान आणि सौराष्ट्रमध्ये वाढ झाली आहे.

IMD Alert: मान्सून सक्रिय, पुण्यात रेड अलर्ट, गुजरातमध्ये 8 जणांचा मृत्यू Read More »

पूजा खेडकर प्रकरण अन् UPSC ने घेतला मोठा निर्णय,परीक्षेचा पॅटर्न बदलला

UPSC Exam :  वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिला अपंगत्व कोट्यातून UPSC मध्ये स्थान मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने एक मोठे पाऊल उचलले आहे.  UPSC आपल्या परीक्षा पद्धतीत बदल करणार आहे. आता परीक्षेतील हेराफेरी आणि फसवणूक रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये आधार फिंगरप्रिंट प्रमाणीकरण, उमेदवारांच्या चेहऱ्याची ओळख आणि थेट एआय आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे. एआय तंत्रज्ञानाने UPSC परीक्षा मॉनिटरिंग केले जाईल मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेदरम्यान तंत्रज्ञान सेवांसाठी PSUs च्या संपर्कात आहे. नोटीसनुसार, नमूद केलेल्या गोष्टींमध्ये आधार आधारित बोट प्रमाणीकरण, ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग आणि थेट एआय आधारित सीसीटीव्ही स्क्रीनिंग यांचा समावेश आहे. यूपीएससीच्या नोटीसमध्ये काय आहे? “मुख्य परीक्षा/मुलाखत/पडताळणी प्रक्रियेच्या वेळी, सेवा प्रदात्याला परीक्षेच्या प्राथमिक टप्प्यात मिळालेल्या डेटावरून उमेदवारांची ओळख व्हेरिफाय करावी लागेल,” UPSC नोटिसमध्ये म्हटले आहे. तसेच, परीक्षार्थी आणि इतर व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही लावले जातील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. अशी असेल तयारी  या सूचनेनुसार, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेच्या ठिकाणांची तपशीलवार यादी आणि प्रत्येक ठिकाणासाठी उमेदवारांची संख्या परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी तांत्रिकदृष्ट्या तयार केली जाईल. फिंगरप्रिंट आणि चेहर्यावरील ओळखीसाठी उमेदवाराचे तपशील (नाव, रोल नंबर, फोटो इ.) परीक्षेच्या सात दिवस आधी देखील प्रदान केले जातील. NEET, CUET सारख्या अनेक परीक्षांवर प्रश्न उपस्थित   UPSC चा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा NEET UG, CUET UG यासह अनेक परीक्षा वादांनी घेरल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने NEET UG फेरपरीक्षेबाबत आपला निर्णय दिला आहे. पण लाखो लोकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत.  दुसरीकडे, तथाकथित बनावट कागदपत्रे सादर करून अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला यूपीएससीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

पूजा खेडकर प्रकरण अन् UPSC ने घेतला मोठा निर्णय,परीक्षेचा पॅटर्न बदलला Read More »

Mumbai Fire: मोठी बातमी! बोरिवली परिसरात 22 मजली इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

Mumbai Fire: एकीकडे मुंबईमध्ये धो धो पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे बोरिवली परिसरात गुरुवारी एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई उपनगरातील बोरिवली भागातील एका उंच इमारतीला गुरुवारी 12.30 च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. 22 मजली कनाकिया समर्पण टॉवरमध्ये ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील कनकिया समर्पण टॉवरला 12.37 वाजता आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक बीएमसी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईत 1:02 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी 108 रुग्णवाहिका घटनास्थळी स्टँडबाय ठेवण्यात आली होती. इमारतीच्या पहिल्या आणि 16व्या मजल्यांदरम्यान असलेल्या इलेक्ट्रिक डक्टमधील विद्युत तारा आणि केबलला ही आग लागली. मात्र आग आणि धुरामुळे गुदमरल्याने चौघांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी महेंद्र शहा (70) यांना मृत घोषित केले. तर रंजना राजपूत (59), शिवानी राजपूत (26) आणि शोभा सावळे (70) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी, बुधवारी सकाळी मुंबईतील जोगेश्वरी भागात एका बहुमजली इमारतीला आग लागल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. धुरामुळे एका ज्येष्ठ नागरिकासह चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Fire: मोठी बातमी! बोरिवली परिसरात 22 मजली इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू Read More »

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला

Nilesh Lanke: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या चार दिवसांपासून पोलीस खात्यात होत  असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अहमदनगरचे खासदार नीलेश लंके अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालया बाहेर उपोषणाल बसले होते. आज निलेश लंके यांच्या मागण्या मान्य झाले असून नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने लंके यांनी उपोषण मागे घेतले आहे. नाशिक ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही चौकशी इन्कॅमेरा होणार असल्याचे लेखी आश्वासन नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे.बाळासाहेब थोरात यांची यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण सुटला आहे.

Nilesh Lanke: मोठी बातमी! खासदार लंके यांच्या मागण्या मान्य, उपोषण सोडला Read More »

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस

Kangana Ranaut:  बॉलीवूडची क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. सिमला उच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली. याचिकाकर्ते लायक राम नेगी यांनी आरोप केला आहे की मंडीतून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज रिटर्निंग ऑफिसरने चुकीच्या पद्धतीने नाकारला. नोटीस जारी करत न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी कंगना राणौतकडून 21 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण? माजी सरकारी कर्मचारी आणि किन्नौरचे रहिवासी असलेले लायक राम नेगी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नेगी म्हणाले की त्यांनी 14 मे रोजी निवडणूक अर्ज दाखल केला आणि 15 मे रोजी इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना स्वीकारले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल यांनी नोटीस बजावली आणि रणौत यांना 21 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. कंगना रणौतच्या निवडीला लायक राम नेगी यांनी आव्हान दिले आहे, ज्यांनी म्हटले आहे की त्यांचा उमेदवारी अर्ज मंडीच्या उपायुक्तांनी रिटर्निंग ऑफिसर म्हणून चुकीच्या पद्धतीने नाकारला होता. वनविभागातील निवृत्त कर्मचारी नेगी यांनी उपायुक्तांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली होती. हिमाचलच्या सुखू सरकारमधील कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता. या दोघांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. कंगनाने विक्रमादित्य सिंगचा सुमारे 74 हजार मतांनी पराभव केला. सध्या या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑगस्टला होणार आहे.

Kangana Ranaut: कंगना राणौतची खासदारकी रद्द होणार? हायकोर्टाने ‘त्या’ प्रकरणात बजावली नोटीस Read More »

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »