DNA मराठी

ताज्या बातम्या

img 20260126 wa0005

Lagnacha Short : ‘लग्नाचा शॉट’ रिलीजसाठी सज्ज! ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Lagnacha Short : मराठी चित्रपटसृष्टीत लव्हस्टोरीचा नवा रंग भरण्यासाठी आगामी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’ सज्ज झाला असून चित्रपटातील अभिजीत आमकर व प्रियदर्शिनी इंदलकर या नव्या जोडीची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी बंध’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात या फ्रेश जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. प्रदर्शित होताच या गाण्याने आपल्या हळव्या सुरांमुळे आणि मनाला भिडणाऱ्या दृश्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘रेशमी बंध’ या गाण्यात अभि आणि कृतिका यांच्या प्रेमकथेची सुरुवात उलगडताना पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणात उमलणारं त्यांचं नातं, नजरेतून व्यक्त होणारी ओढ आणि एकमेकांच्या सहवासात वाढणारी जवळीक या गाण्यात अत्यंत सौम्य आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. निसर्गसौंदर्यात या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आल्यामुळे हे गाणं अधिकच लक्षवेधी ठरत आहे. या गाण्याचं संगीत आणि गीतलेखन प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांनी केलं असून, केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांच्या मधुर स्वरांनी गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात, “ ‘रेशमी बंध’ हे गाणं अभि आणि कृतिकाच्या नात्याची पहिली ओळख आहे. ज्यात त्यांच्या खुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते. अभि-कृतिकाची केमिस्ट्री, आजूबाजूचे निसर्गसौंदर्य व गाण्याचे सुमधूर संगीत यामुळे प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.” महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Lagnacha Short : ‘लग्नाचा शॉट’ रिलीजसाठी सज्ज! ‘रेशमी बंध’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला Read More »

infosys

Infosys देणार तब्बल 20 हजार नोकऱ्या; एआयमुळे होणार फायदा

Infosys Vacancy in 2027 : आयटी क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात एआयचा वापर वाढत असल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याचा गैरसमज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असल्याने एआयला विरोध वाढतोय. तसेच वाढत्या एआय सेवांमुळे आयटी क्षेत्रात बेरोजगारी निर्माण होणार असल्याचा दावा देखील करण्यात येतोय मात्र दुसरीकडे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने 2027 या आर्थिक वर्षात तब्बल 20  हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार असल्याची मोठी घोषणा केलीय. कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत याबाबत घोषणा केलीय. आयटी क्षेत्रात एआय वाढीच्या संधी दिसत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला असं यावेळी सलिल पारेख म्हणाले. सलिल पारेख यांच्या या घोषणेमुळे जगात पुन्हा एकदा एआय आयटी किंवा इतर क्षेत्रात फायदेशीर ठरणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत असून एआयच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय.  आयटी क्षेत्रात सध्या जागतिक कंपन्यांकडून नोकरी कपातचा दबाव असताना, इन्फोसिसने मोठा निर्णय घेत एका मोठ्या भरतीची घोषणा केलीयं. ग्राहक त्यांचे बजेट AI आणि ऑटोमेशनकडे वळवत असल्याने मागणीचे स्वरूप बदलत असून आम्हाला काही ठिकाणी घट आणि काही ठिकाणी वाढ दिसत आहे. आम्हाला घट दिसण्यापेक्षा वाढ थोडी जास्त दिसत आहे असं म्हणत त्यांनी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत इन्फोसिस आणखी 20 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती करणार असून आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तीन तिमाहींत, इन्फोसिसने 18 हजार महाविद्यालयीन पदवीधरांची भरती केली असं त्यांनी सांगितलं. तर केवळ तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या कर्मचारी संख्येत 5 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची वाढ झाली असल्याची देखील माहिती त्यांनी जागतिक आर्थिक मंचच्या वार्षिक बैठकीत दिलीये.  तसेच एआय एजंट्स, फाउंडेशन मॉडेल्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट,कस्टमर सपोर्ट आणि जुन्या ॲप्लिकेशन्सचं आधुनिकीकरण या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन काम तयार होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महत्त्वाचं म्हणजे, इन्फोसिसने फ्रेशर्ससाठी सुरुवातीचं वेतनही वाढवलं आहे. एआय आणि डिजिटल कौशल्य असलेल्या तरुणांसाठी वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज देण्यात येत आहे. म्हणूनच, आयटी क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी इन्फोसिसची ही घोषणा मोठी संधी ठरणार आहे. इन्फोसिसने घेतलेल्या निर्णयामुळे आयटी क्षेत्राला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Infosys देणार तब्बल 20 हजार नोकऱ्या; एआयमुळे होणार फायदा Read More »

maharashtra government

Maharashtra Government: विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के आमदारांची अट; सरकार आणणार कायदा?

Maharashtra Government: विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांच्या संख्येबाबत स्पष्टता आणण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कायदा आण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे.विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता पद रिक्त असून, यावरून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी तसेच भविष्यात ठोस नियमावली असावी, यासाठी पाऊल उचलली जात आहे . येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती विधानभवनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी विरोधी पक्षनेत्यासाठी किमान १० टक्के, म्हणजेच सुमारे २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक असावे, अशी भूमिका आहे. मात्र, राज्यात याबाबत सध्या कोणताही कांयदा किंवा निकष नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाला हे संख्याबळ मिळाले नाही. सध्याच्या संख्याबळानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे २०, काँग्रेसकडे १६, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे १०, तर शेतकरी कामगार पक्षाकडे २ आमदार आहेत. परिणामी, विधानसभेत विरोधी पक्षनेता पद अद्याप रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हा विषय कायद्याच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १९६२, १९६७ आणि १९७२ या विधानसभा निवडणुकांमध्येही विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. मात्र, त्या वेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी विशेषाधिकारांचा वापर करून सर्वाधिक आमदार असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला विरोधी पक्षनेता पद दिले होते. राजकीय वर्तुळात, विरोधी पक्षनेता पदावरून होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी आणि निर्णयप्रक्रियेत स्पष्टता आणण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचे बोलले जात आहे. या कायद्यामुळे भविष्यात विरोधी पक्षनेत्याची निवड ही राजकीय निर्णयावर नव्हे, तर स्पष्ट कायदेशीर तरतुदींवर आधारित राहु शकते. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक आमदारसंख्या निश्चित करणारा कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मांडला जातो का हे पाहणे महत्वाचे असेल.

Maharashtra Government: विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्के आमदारांची अट; सरकार आणणार कायदा? Read More »

mangalprabhat lodha

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश

Mangalprabhat Lodha : मुंबई मधील परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. यावेळी केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वक्तव्यामुळे केईएमच्या नावाबाबत राजकीय वादाला तोंड फुटले आहे. लोढा म्हणाले, “हे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही इंग्रजांच्या पाऊलखुणा कायम आहेत. मुंबई महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.” कार्यक्रमात त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठीही महत्त्वाच्या सूचना केल्या. नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा केंद्र, आरोग्य स्वयंसेवकांसाठी बैठक व्यवस्था, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करणारे कम्युनिकेशन सेंटर उभारावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेत सक्रिय सहभागी करून घेणे, एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांना मदत करणे, डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर भर द्यावा. शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मरणिका तयार करावी आणि कोविडसारख्या संकटातील केईएमच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाची माहिती दिली. दरम्यान मंत्री लोढा यांच्या सूचनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र टीका केली. “नाव बदलल्याने संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. औषधांची कमतरता, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांची गरज किंवा रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलणे अपेक्षित होते. मात्र, यांचा व्यवसाय केवळ धर्माच्या मुद्द्यांपुरताच मर्यादित आहे. अशी भूमिका देशाला मागे घेऊन जाणारी आहे. अहमदाबादचे नाव आधी बदला,” असा उपरोधिक टोला सावंत यांनी लगावला.केईएमच्या काही डॉक्टर, माजी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही या प्रस्तावाला विरोध होत असून, नाव बदलण्यापेक्षा रुग्णालयातील सुविधा, उपकरणे आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे. शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही चर्चा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश Read More »

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच? जलसंपदा–मृद व जलसंधारण प्रकरणात कारवाईला टाळाटाळ

Devendra Fadnavis: राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कायद्याच्या चौकटीत कार्यरत आहे की सत्तेच्या आणि पैशाच्या दबावाखाली, असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून पदोन्नती देण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. या प्रकरणाकडे लक्ष वेधत नागपूरचे आमदार संदीपची दिवाकरराव जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, “उशिराने विकल्प सादर केलेल्या अधिकाऱ्यांचे समावेशन” असा चुकीचा उल्लेख करून, यापूर्वी समावेशनास नकार देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट मार्गाने मृद व जलसंधारण विभागात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आमदार जोशी यांच्या मते, आठ अधिकाऱ्यांचे समावेशन नियमबाह्य असून ते तात्काळ रद्द करण्यात यावे, तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या मंत्रालयीन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. या संदर्भात, उपविभागीय जलसंधारण अधिकारी या संवर्गासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आवश्यक असताना, श्री. सिद्धेश्वर खंडप्पा कंजारे (BE यांत्रिकी, M.Tech – मटेरियल) यांना या पदावर नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट करून ३० जून २०२१ रोजी पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सेवाप्रवेश नियमांमध्ये जाणीवपूर्वक “स्थापत्य अभियांत्रिकी” या अर्हतेचा उल्लेख टाळण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या अधिकृत नोंदीत आठ अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागातील समावेश नियमबाह्य असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. जलसंपदा विभागाची पूर्वपरवानगी न घेता हा समावेश करण्यात आल्याचे मान्य असतानाही, अद्याप कोणतीही चौकशी, निलंबन किंवा जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर, आमदार जोशी यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व पुढील प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात हे आदेश अंमलात आले नसल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणामागे कक्ष अधिकारी श. हा. खरोडे हे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे. नियमबाह्य समावेश व पदोन्नतीसाठी मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू असली, तरी शासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. या प्रकाराचा थेट फटका मृद व जलसंधारण विभागातील मूळ अधिकाऱ्यांना बसत असून, नियमबाह्य समावेशामुळे त्यांच्या हक्काच्या पदोन्नती संधी हिरावल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विभागात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई होणार का, की हे प्रकरणही नेहमीप्रमाणे फाईल आणि शेर्‍यांपुरतेच मर्यादित राहणार, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच? जलसंपदा–मृद व जलसंधारण प्रकरणात कारवाईला टाळाटाळ Read More »

vikas gogawale

Raigad News : महाड राडा प्रकरण ; विकास गोगावलेसह सात आरोपी पोलीस ठाण्यात हजर

Raigad News  :  रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या आणि गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले यांच्यासह एकूण सात आरोपी अखेर आज महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला अक्षरशः धारेवर धरत, “मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला होता. “अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते. मात्र अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात,” अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली. याच सुनावणीत मुख्यमंत्री तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या, अशा स्पष्ट सूचनाही न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले यांचे पोलिस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतर आरोपींवरही गुन्हे दाखल आहेत.

Raigad News : महाड राडा प्रकरण ; विकास गोगावलेसह सात आरोपी पोलीस ठाण्यात हजर Read More »

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल

Sujay Vikhe: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक झाली. पुणे जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी शामसुंदर गुजर या पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर हा सध्या अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत आहे. तो पूर्वी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पारनेरच्या बाँण्ड्रीवरील पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये ड्रग्जच रॅकेट सापडलं. त्याचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचले. पारनेर आणि ड्रग्ज हे समीकरण उघड झालं. अहिल्यानगरच्या पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या तपासातील सगळं सत्य पत्रकारांना सांगावं, अशी अपेक्षा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखेंनी या प्रकरणावर काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या. ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणात, नगरमधील पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पत्रकारांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रकरणात आपली भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी विखेंना विचारला. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या उत्तराने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुजय विखे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी हा पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरोधात पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी करुन त्याची बदली करण्याची मागणीही त्यावेळी झाली होती. वादग्रस्त असलेल्या या पोलिसाची बदली थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी मोठ्या नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलिस घेतल्याचे सांगतात. मग त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरुन घेतलं गेलं, हे पोलिस अधिक्षकांनी सांगावं. आत्ताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते. मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावं पोलिस का सांगत नाहीत. ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावं गुन्ह्यात येऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होतं? हे सगळं मला माहित आहे. परंतु पोलिसांनी हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगावं, असंही विखेंनी स्पष्ट केलं. सुजय विखेंनी ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणावर आपली भुमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्वतः सांगावं. मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा पुढच्या आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करु. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी, असंही विखेंनी स्पष्ट केलं. विखेंनी कोणत्याही लोकप्रतिनीधींचं नाव घेतलं नसलं तरी, दक्षिणेचे खा. निलेश लंके यांच्याकडे संशयाची सुई असल्याच्या चर्चा आहेत. ज्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले होते, ते खा. लंके यांचे कार्यकर्ते होते का? हा प्रश्नही विचारला जात आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेमध्ये लोकसभा निकालानंतर झालेल्या राड्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, मी काल आजारी असल्याने हे प्रकरण संपूर्ण पाहिलं नाही. परंतु त्यावेळी एका गर्भवती महिलेला मारहाण झाली होती. लोकप्रतिनीधींच्या कुटुंबातील व्यक्तीने असं करणं, हे गंभीर आहे. आपला न्यायालयावर विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार

Prajakt Tanpure : प्रस्तावित राहुरी–शनि शिंगणापूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूमिसंपादनाला परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. या रेल्वे मार्गासाठी तांदूळवाडी, देसवंडी, कोंढवड, तमनर आखाडा, उंबरे, ब्राह्मणी, आदी गावांतील अत्यंत सुपीक शेतीजमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील बहुतांश शेतजमीन नदीकाठालगत असून कालव्यांद्वारे नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या जमिनींवर मोठ्या प्रमाणात शेती उत्पादन घेतले जाते. रेल्वे प्रकल्पासाठी होणाऱ्या भूमिसंपादनामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या भावना राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचवून भूमिसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला, ज्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prajakt Tanpure : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात प्राजक्त तनपुरेंचा एल्गार Read More »

congress

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Zilla Parishad Election: राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान,  अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,  आ. अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम,  अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण,  माजी मंत्री वसंत पुरके,  माजी आमदार धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर Read More »

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

Vijay Wadettiwar : चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार असल्याचे, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात पाच वर्ष काँग्रेसचा महापौर असणार,सगळ्यांचे समाधान होईल असा निर्णय काँग्रेस घेणार अस सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला पूर्णविराम दिला. चंद्रपूर महापालिकेबाबत काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाल्याने चंद्रपुरात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. भाजपचे कोणतेही नेते कितीही ओरडले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार अस,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी आज ठासून सांगितले. नेत्यांमध्ये गैरसमज होत असतात पण कार्यकर्ता हा महत्वाचा असल्याने त्यांना समाधान वाटेल असा निर्णय घेण्यात येईल, असं वडेट्टीवार यांनी स्पष्टं केले. चंद्रपुरात महापौर बसविण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा झाली आहे. शिवसेना हा पक्ष काँग्रेस बरोबर सत्तेत असेल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 29 महापालिका निकडवणुकांसाठी आरक्षणाची लॉटरी काढण्यात आली.पण ही फिक्सिंग होती,पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पाडली गेलीं नाही. भाजपचे नगरसेवक निवडून त्या सोयीने आरक्षण पडल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात खुला महिला प्रवर्ग आला त्यासाठी भाजपचे महापौर पदाच्या उमेदवार शिवानी दाणी ठरल्या होत्या आणि आज तसेच आरक्षण पडले असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. मुंबईतील मनसे नेत्यांनी चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र असल्याचे तारे तोडले याचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस एकत्र आहे हे दिव्य स्वप्न मनसे नेत्यांना कुठून पडले? लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम मनसेने करू नये. मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेसने केली तर चालेल का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रात भाजप आणि MIM हे पक्ष एकत्र आहेत, ते रात्री एकत्र जेवतात दिवसा भांडतात.काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.त्यांना रसद कोण पुरवते,ताकद कोण देते हे महाराष्ट्रातील जनतेला कळेल अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. वाराणसी येथील मणिकर्णिका घाट भाजप सरकारने जमीनदोस्त केला.आता भाजपचे नेते का बोलत नाही? भाजपचे हिंदुत्व हे निवडणुकी पुरता आहे ,सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतात अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Vijay Wadettiwar: पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार; चंद्रपूरबाबत विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? Read More »