DNA मराठी

ताज्या बातम्या

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा

Israel Attack On Lebanon :  गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर बुधवारी या हल्ल्यांना प्रतिउत्तर म्हणून हिजबुल्लाकडून इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आला आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.इस्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवर हल्ला करण्याची तयारी करत आहे.  इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सैन्यांना लेबनॉनमध्ये हिजबुल्लासोबतच्या वाढत्या संघर्षाच्या दरम्यान जमिनीवर आक्रमणासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. इस्रायलचा हल्ला असाच सुरू राहिल्यास हिजबुल्लाला पूर्ण पाठिंबा देऊ, असे इराणने म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लेबनॉनमध्ये जर जमिनीवर हल्ला केला तर ते ‘ऑल आऊट वॉर’ असेल, असे म्हटले आहे. बुधवारी इस्त्रायली हल्ल्यात किमान 72 लोक ठार आणि 233 जखमी झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. “तुम्ही ओव्हरहेड जेट्सचा आवाज ऐकत आहात. आम्ही दिवसभर हल्ला करत आहोत. हे तुमच्या संभाव्य प्रवेशासाठी आणि हिजबुल्लाला कमकुवत करण्यासाठी मैदान तयार करण्यासाठी आहे,” इस्रायली सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हर्झी हॅलेवी यांनी इस्रायली सैन्याला सांगितले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले – लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यूएन जनरल असेंब्लीला सांगितले की, “लेबनॉनमध्ये युद्ध होऊ नये. आम्ही इस्रायलला लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याची आणि हिजबुल्लाला इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्याची विनंती करतो.” इस्त्रायलने हिजबुल्लाहविरोधात सोमवारी सुरू केलेल्या मोहिमेपासून लेबनॉनमध्ये 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. UN च्या आकडेवारीनुसार लेबनॉनमध्ये सुमारे 90,000 लोक विस्थापित झाले आहेत. हे 110,000 लोकांव्यतिरिक्त आहेत ज्यांनी तणाव वाढण्यापूर्वी घरे सोडून पळ काढला.

Israel Attack On Lebanon : मोठी बातमी, इस्रायल लेबनॉनवर जमिनी हल्ला करणार, बिडेनने दिला इशारा Read More »

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा

iPhone 15 Pro Discount: काही दिवसापूर्वी iPhone 16 सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही iPhone 15 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Flipkart बिग बिलियन डेज सेलमध्ये फक्त 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे.  Apple इंटेलिजेंस फीचर्ससह सर्व नवीनतम Apple अपग्रेडसाठी डिव्हाइस तयार आहे. Flipkart Big Billion Days Sale सह, तुम्ही कमी किमतीत या फिचर्सचा फायदा घेऊ शकता. ई-कॉमर्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विकला जाणार आहे.   फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीझरनुसार, सेल दरम्यान फ्लिपकार्ट आयफोन 15 सीरीजच्या प्रत्येक मॉडेलवर प्रचंड सूट देईल. प्रो सोबतच, आयफोन 15 प्रो मॅक्स वर देखील सवलत जाहीर केली आहे. फ्लॅगशिप मॉडेलची किंमत 1,39,999 रुपयांवरून 1,09,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Flipkart ने सांगितले की iPhone 15 Pro ची किंमत 1,19,999 रुपयांवरून 99,999 रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ 10,000 रुपयांची सूट प्रत्येकासाठी लागू आहे. तथापि, पुढील 10,000 रुपयांची सूट बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरमध्ये विभागली गेली आहे. Flipkart VIP ग्राहकांना 2,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफ मिळेल.

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा Read More »

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter Case :  पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर घटनेचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. तर आता त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आली आहे.  रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्याचे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचे मुख्य कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.   रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक   अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी अक्षय शिंदेचे पोस्टमॉर्टम झाला, जे सुमारे सात तास चालले आणि त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.  5 डॉक्टरांच्या समितीने अक्षय शिंदेचे शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही. अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधानात विसंगती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ते म्हणाल्या की, ज्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला आणि हातात हातकड्या असलेला आरोपी चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्याकडून पिस्तुल कसा हिसकावू शकतो. बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, खटला संपल्यानंतर आरोपींना जाहीर फाशी द्यावी, जेणेकरून समाजात मजबूत संदेश जाईल, अशी मी मागणी केली होती.  दुसरीकडे, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला. आरोपीवर गोळीबार करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले की, अक्षयच्या वागण्यावरून तो सगळ्यांना मारेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा Read More »

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….! Read More »

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत. त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.   गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर   बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या  दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्… Read More »

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »

भारतीय बाजारात PhonePe चे वर्चस्व, ऑगस्टमध्ये 7.23 अब्जांचा व्यवहार

PhonePe Update: भारतीय बाजारपेठेमध्ये UPI ने आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे.   नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये, UPI ने भारतातील UPI मार्केटपैकी निम्म्याहून अधिक भाग काबीज केला आहे.  PhonePe ही Walmart च्या मालकीची अमेरिकन कंपनी आहे, जी भारतातील Google Pay आणि Paytm शी स्पर्धा करते. Google Pay ही अमेरिकन मालकीची कंपनी आहे, तर Paytm ही भारतीय कंपनी आहे. मात्र, आरबीआयच्या बंदीनंतर पेटीएमचे यूपीआय मार्केट खूपच कमी झाले आहे. NPCI च्या ऑगस्टच्या डेटाबद्दल बोलायचे तर, भारताच्या UPI मार्केटमध्ये ऑगस्टमध्ये 20,60,735.57 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. सुमारे 14.96 अब्ज व्यवहार झाले आहेत. यापैकी 10,33,264.34 कोटी रुपयांचे व्यवहार एकट्या PhonePe द्वारे झाले आहेत. त्याची संख्या 7.23 अब्जांपेक्षा जास्त आहे. जर आपण व्यवहारांची संख्या पाहिली तर, PhonePe चा बाजारातील हिस्सा 48.36 टक्के होतो, तर UPI पेमेंटच्या मूल्याच्या दृष्टीने बाजारातील हिस्सा 50.14 टक्के होतो. NPCI ऑगस्ट आकडेवारी PhonePe – रु 10,33,264.34 कोटी Google Pay – रु 7,42,223.07 कोटी Paytm – रु 1,13,672.16 कोटी ऑगस्टमध्ये मार्केट शेअर PhonePe – 48.39 टक्के Google Pay – 37.3 टक्के paytm – 7.21 टक्के पेटीएमची अवस्था बिकट   ऑगस्टमध्ये, Google Pay ने 7,42,223.07 कोटी रुपयांच्या 5.59 अब्ज UPI पेमेंटवर प्रक्रिया केली, तर Paytm ने 1,13,672.16 कोटी रुपयांच्या व्यवहारांवर प्रक्रिया केली. या कालावधीत Google Pay चा बाजार हिस्सा 37.3 टक्के आहे, तर Paytm चा बाजार हिस्सा 7.21 टक्के आहे. NPCI च्या जुलैच्या आकडेवारीनुसार, PhonePe चा मार्केट शेअर जवळपास 48 टक्के आहे. Google Pay चा बाजार हिस्सा 37 टक्के होता आणि पेटीएमचा बाजार हिस्सा 7.82 टक्के होता. 2026 पर्यंत दररोज 1 अब्ज UPI पेमेंट अपेक्षित ऑगस्ट महिन्यात PhonePe आणि Google Pay च्या UPI पेमेंटमध्ये वाढ झाली आहे, तर पेटीएमच्या UPI पेमेंटमध्ये घट झाली आहे. UPI दररोज 500 दशलक्ष व्यवहार करत आहे, जे 2026-27 पर्यंत दररोज 1 अब्ज UPI व्यवहारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

भारतीय बाजारात PhonePe चे वर्चस्व, ऑगस्टमध्ये 7.23 अब्जांचा व्यवहार Read More »

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र

Bangladesh Crisis: बांगलादेशात झालेल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात  गोंदियामध्ये 72 समजातील हजारोच्या संख्येने महिला पुरुष रस्त्यावर उतरले व झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चामध्ये 72 समाजांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे शहरातील मुख्य बाजारात हा मोर्चा भ्रमण करत बांगलादेशा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर आंबेडकर चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने रॅलीचे समापन करण्यात आले.   काही दिवसा अगोदर  बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी दैवतांची मंदिरे तोडली यात काही लोकांचें दुर्दैवी मृत्यू झाले. याचे पाडसाद संपूर्ण भारतात व हिंदू समुदाय मध्ये उमटू लागले.  अनेक हिंदू संघटना देशातील राज्य पातळीवर आंदोलने केली. तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांर झालेल्या हल्ल्या करणाऱ्या संघटनेच्या विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने देशात हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले.  याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गोंदियात सकल हिंदू समाजाच्या वतीने जण आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅली मध्ये गोंदिया जिल्यातील हजारो हिंदू बांधवानी सहभाग घेत सामील झाले. ही रॅली गोंदिया शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण भ्रमण करत बांगलादेशा विरोधात नारेबाजी करण्यात आली.

Bangladesh Crisis: बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ 72 समाज आले एकत्र Read More »

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert: देशात मान्सून परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागात 23 ते 25 सप्टेंबर जोरदार पावसाचा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच 26 सप्टेंबर रोजी  वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  जिल्‍ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्‍यात आलेला आहे.   पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे  जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केले आहे.   मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी. वेळीच सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.  धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी  काढू नये.                   वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844  अथवा 2356940  या क्रमांकावर  संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी Read More »

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »