Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे.
याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे.
सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.