DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे. अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते. काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’. बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा Read More »

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Threat: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने बॉलीवूडमध्ये एकच खडबड उडाली आहे. तर पुन्हा एकदा सलमान खानला धमकी मिळाली आहे. मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवलेल्या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर गाणे लिहिणाऱ्या व्यक्तीला महिनाभरात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स गेन्सकडून ही धमकी आल्याचा दावा केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या धमकीचा तपास सुरू केला आहे. गेल्या 15 दिवसांत सलमानला सहाव्यांदा धमकी मिळाली आहे. तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्याला ही धमकी देण्यात आली आहे. खरे तर हे गाणे लॉरेन्स आणि सलमानने एकत्र करून लिहिले आहे. हे गाणे लिहिणाऱ्याला महिनाभरात त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे धमकीत म्हटले आहे. वृत्तानुसार, ‘गीतकार गाणे लिहू शकणार नाही’ अशी धमकी देण्यात आली होती. या मेसेजमध्ये सलमान खानला थेट आव्हान देण्यात आलं आहे. ‘सलमान खानकडे ताकद असेल तर त्यांनी त्यांना वाचवावे’, असे म्हटले आहे. याआधी गुरुवारीच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती आणि त्याच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमक्यांनंतर आता शाहरुखला धमक्या आल्या आहेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शाहरुख खानला धमकी देणारा कॉल वांद्रे पोलिस स्टेशनला आला आणि 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 4 नोव्हेंबरला सलमानला धमकीही मिळाली होतीसलमान खानला 4 नोव्हेंबरला आणखी एक धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. तो तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा त्याने केला. याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला पकडण्यात आले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. व्यवसायाने वेल्डर असलेल्या या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली.

Salman Khan Threat: … तर एक महिन्यात, सलमना खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी Read More »

Maharashtra News: बालमटाकळी येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोकलाल नहार अनंतात विलीन

Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील रहिवासी असलेले सध्या व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले प्रसिद्ध उद्योगपती तथा डी.एन.के. ग्रुप आणि नहार ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष अशोकलाल झुंबरलाल नहार यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मंगळवार दि. ५ रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बालमटाकळी सह परिसरात होणाऱ्या धार्मिक, सामाजिक गावच्या सार्वजनिक कार्यात नेहमी त्यांचा सिंहाचा वाटा असायचा मंदिराच्या तसेच इतर सामाजिक कार्यात मोठे आर्थिक योगदान त्यांनी या भागासाठी दिलेले आहे, त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने बालमटाकळी सह पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर पुणे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला राजकीय, सामाजिक, धार्मिक, व्यापारी यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. अंत्यविधी झाल्यानंतर शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे, बालमटाकळी सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, युसुबभाई शेख, छगनराव राजपुरे, रमेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख, विक्रम गरड, अरुण बामदळे यांच्यासह अनेकांनी त्यांना आपआपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली असून युवा उद्योजक चेतन नहार व आदित्य नहार यांचे ते वडील होते तर प्रसिद्ध उद्योगपती रसिकलाल नहार यांचे ते मोठे बंधू होते.

Maharashtra News: बालमटाकळी येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोकलाल नहार अनंतात विलीन Read More »

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी

Rahul Gandhi: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. त्याच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित सभेत बोलताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून पाच गॅरंटी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी जर राज्यात महाविकास आघाडी सरकार आली तर महालक्ष्मी योजना लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करणार आणि संपूर्ण राज्यात महिलांना मोफत बस प्रवास मिळणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तर सरकार आल्यावर शेतकऱ्यांना देखील तीन लाखांची कर्जमाफी देणार असल्याची गॅरंटी त्यांनी दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात सरकार येताच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे. त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. तर 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. 5 गॅरंटीमहिलांसाठी राज्यभरात मोफत बस प्रवासराज्यातील सर्व महिलांना 3000 रुपये मासिक मदतशेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. कर्ज परतफेडीवर 50,000 रुपये प्रोत्साहन25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटपबेरोजगारांना सरकारकडून मासिक 4000 रुपयांची मदत.

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी Read More »

Maharashtra News: मोठी बातमी, वर्ध्यातील स्टील कंपनीला भीषण आग, 16 कर्मचारी जखमी

Maharashtra News: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असून प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, वर्धा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. एका कंपनीला लागलेल्या आगीत 16 कर्मचारी जखमी झाले आहे. तर एक कर्मचारीची प्रकृती चिंताजनक आहे. भुगाव स्टील कंपनी असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. माहितीनुसार, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्यास सुरुवात केली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News: मोठी बातमी, वर्ध्यातील स्टील कंपनीला भीषण आग, 16 कर्मचारी जखमी Read More »

Mooshak Aakhyan : ‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील, 8 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Mooshak Aakhyan : वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या  चित्रपटाच्या दिग्दर्शनाची  आणि मध्यवर्ती  भूमिकेची  धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद  यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपट 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. गौतमी पाटीलची लावणी ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे.   सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी  या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर देशमाने डिजी व्हिजन’द्वारे या चित्रपटाला प्रस्तुत करण्यात येत आहे. तर हेमंत एदलाबादकर यांनी या चित्रपटासाठी लेखन केलं आहे. तर छाया दिग्दर्शन  सुरेश देशमाने यांचे आहे.हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे  यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर  तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे.‘मूषक आख्यान’ चित्रपटात सबकुछ मकरंद अनासपुरे आहेत, पण त्यांच्यासोबत भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया,अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्क चित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्क चित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत.

Mooshak Aakhyan : ‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील, 8 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित Read More »