DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला

Maharashtra News: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर आले आहे. तर आता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील बोल्हेगाव या भागात बिबट्याने एका युवकावर प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना गुरुवार दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला आहे. बोल्हेगावला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाजवळ हि घटना घडली आहे.या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे.तसेच या नदीजवळ बाहेर राज्यातील लोक मोठ्या कामाला आलेले आहेत तिथे त्यांची लोकवस्ती आहे.बिबट्याने अक्षय चंद्रशेखर गुंजाळ या युवकार प्राणघातक हल्ला केला त्याच्या पायाला बिबट्याने चावा घेतला आहे. दरम्यान भर वस्ती व वर्दळीचे ठिकाण असलेल्या भागामध्ये बिबट्यांकडून हल्ला झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरात तसेच बोल्हेगाव परिसरातील लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. जखमी अक्षय गुंजाळ याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra News: नगर शहरात बिबट्याची दहशत, बोल्हेगावमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला Read More »

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले

Former PM Manmohan Singh Death : देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय राजकीय कारकिर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधन म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली. त्यांचा दहा वर्षाचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Former PM Manmohan Singh Death : महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड – नाना पटोले Read More »

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन

Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन Read More »

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम

IND VS AUS 4th Test : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्सने कसोटीत डेब्यू केला आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्समध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याच्या 11व्या षटकात विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे पंच आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी प्रकरण शांत केले. 19 वर्षीय सलामीवीराच्या खांद्याला धक्का दिल्याने आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील 11 वे षटक टाकत होता. ज्यावर नवोदित सॅम कॉन्स्टासने चौकार आणि षटकार ठोकले. त्यानंतर 11व्या षटकाच्या मध्यावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या दिशेने जाताना दिसतो. याच व्हिडिओमध्ये विराट बॉल घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याची सॅम कॉन्स्टासशी टक्कर झाली. आयसीसीचे नियम काय सांगतात ते जाणून घ्याजर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) चे नियम पाहिले तर कलम 2.1 नुसार क्रिकेटपटू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला धक्का दिल्यास आयसीसी कारवाई करू शकते. या घटनेपूर्वीही क्रिकेटच्या इतिहासात अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आधीच्या घटना पाहिल्या तर कळेल की अशा प्रकरणांमध्ये सामन्यावर बंदी किंवा निलंबनासारखी शिक्षा दिली जात नाही. केवळ सामनाधिकारीच शिक्षा म्हणून सामना फी किंवा डिमेरिट पॉइंट देऊ शकतात.

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम Read More »

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा

IMD Rain Alert: जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरवर जवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लांबणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. गारपीटीदरम्यान मोकळ्या जागी आल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू किंवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यापासून शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असेल किंवा तसे नियोजन केले असल्यास शेतीमालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. स्वतःचे व जनावरांचे संरक्षण होईल याबाबत नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी कळविले आहे.

IMD Rain Alert: नगरकरांनो सावधान.., आजपासून धो धो पावसाचा इशारा Read More »

Mobile Recharge: अरे वा…आता करता येणार फक्त SMS अन् कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज

Mobile Recharge: टेलिकॉम कंपन्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा प्रदान करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने सांगितले की, या ग्राहकांना अनावश्यक सेवांसाठीही पैसे मोजावे लागतात. अशा लोकांसाठी अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र रिचार्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना ट्रायने दूरसंचार कंपन्यांना केली आहे. TRAI ने 2012 च्या दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये सुधारणा करून हा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की कमीत कमी एक स्पेशल टेरिफ व्हाउचर फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवांसाठी जारी केले जावे. देशातील 15 कोटी मोबाईल ग्राहक अजूनही 2G कनेक्शन वापरतात. हे लक्षात घेऊन ही नवीन दुरुस्ती करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांना विद्यमान रिचार्ज व्हाउचरसह जास्तीत जास्त 365 दिवसांची वैधता प्रदान करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वृद्ध, ग्रामीण भागातील लोक आणि इंटरनेटचा जास्त वापर न करणाऱ्या दोन सिम वापरणाऱ्यांसाठी ही सूचना फायदेशीर ठरणार आहे. स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि कॉम्बो व्हाउचरची वैधता देखील 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ट्रायने टॉप-अपसाठी 10 रुपयांच्या पटीत असलेली अटही काढून टाकली आहे.

Mobile Recharge: अरे वा…आता करता येणार फक्त SMS अन् कॉलिंगसाठी स्वस्त रिचार्ज Read More »

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप

Supreme Court: ‘लॉटरी किंग’ प्रकरणात सुनवाई करताना आज देशातील सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. या प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार आता ईडीला मोबाईल आणि लॅपटॅाप तपासण्याची अनुमती मिळणार नाही. तसेच ईडीला मोबाईल, लॅपटॅापचा ॲक्सेस देता येणार नाही शिवाय डेटा कॅापी करता येणार नाही. याच बरोबर आता ईडीला धाड टाकल्यावर संशयिताच्या खाजगी वस्तूंना हात लावता येणार नाही. विशेष करून इलेक्ट्रॅानिक वस्तू ताब्यात घेता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये “लॉटरी किंग” सँटियागो मार्टिन, त्याचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.

Supreme Court: मोठी बातमी! ED ला तपासता येणार नाही मोबाईल अन् लॅपटॉप Read More »

Health Update: नागरिकांनो, अंड्यांसोबत ‘या’ 5 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर…

Helath Update: हेल्दी राहण्यासाठी आज अनेकजण अंडी खातात. अंड्याला सुपरफूड म्हटले जाते पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्यांसोबत अंडी खाणे टाळावे, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. अंडी खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल जाणून घ्या. सोया दूधसोया दुधातही प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. अंड्यांसोबत सोया दुधाचे सेवन केल्याने शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त होऊ शकते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, दोन्हीचे मिश्रण शरीरातील प्रथिने शोषण्यास अडथळा आणू शकते. चहाअंड्यासोबत चहा पिणे ही एक सामान्य सवय आहे, परंतु ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. चहामध्ये असलेले टॅनिन प्रथिने शोषण्यास अडथळा आणते. अंड्यासोबत चहा प्यायल्याने शरीरातील प्रथिनांचे शोषण कमी होते, ज्यामुळे पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. लिंबूलिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, परंतु अंड्यांसोबत लिंबू खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. लिंबाच्या आंबटपणामुळे अंड्यातील प्रथिने पचणे कठीण होते. मासअंडी आणि मांस दोन्ही प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. पण दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनसंस्थेवर जास्त ताण पडतो. यामुळे पोट फुगणे, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Health Update: नागरिकांनो, अंड्यांसोबत ‘या’ 5 गोष्टी खाणे टाळा, नाहीतर… Read More »

Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू

Smriti Mandhana : भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत मंगळवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. मंधानाने वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 53 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही त्याची सलग सहावी 50 हून अधिक धावसंख्या आहे. तिने प्रतिका रावलसोबत पहिल्या विकेटसाठी 110 धावांची शतकी भागीदारी केली. मानधनाने आतापर्यंत या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाचही डावांमध्ये (3 टी-20, 2 वनडे) अर्धशतके झळकावली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला WACA येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. स्मृती मानधनाने इतिहास रचलावडोदरातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर मानधनाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. एका वर्षात 7 वेळा तीन वेळा 50 प्लस स्कोअर करणारी ती इतिहासातील पहिली खेळाडू ठरली. मानधनाने यापूर्वी 2018 आणि 2022 मध्येही अशीच कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कने 1997 आणि 2000 मध्ये दोनदा ही कामगिरी केली होती. 28 वर्षीय मानधना एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वेळा 50 हून अधिक धावा करणारी इतिहासातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. मंधानाच्या नावावर 2024 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके आणि तीन अर्धशतके आहेत. त्याने T20I मध्ये आठ अर्धशतके झळकावली आहेत. या वर्षी भारतातर्फे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत शतकही झळकावले.

Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू Read More »

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट

Maharashtra News : एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्यांबाबतची स्थिती चिंताजनक आहे. अनेक वर्षांपासून उद्योजकांनी जागेची मागणी केली असतानाही त्यांना प्लॉट मिळत नाहीत. यामध्ये अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट होत आहे. अधिकारी आणि भूखंड माफियांच्या संगनमतामुळे काही निवडक लोकांना प्लॉट मिळत आहेत, तर इतरांना आर्थिक तडजोडीच्या आधारावरच जागा मिळवावी लागते. प्लॉट शिल्लक नसल्याच्या कारणाने वेबसाईट बंद ठेवली जाते, परंतु अचानक प्लॉटचा लिलाव होणे हे अनेक प्रश्न उपस्थित करते. उद्योग मंत्री लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर उद्योजकांच्या विकासाला मोठा धक्का बसू शकतो. एमआयडीसीमध्ये अधिकाऱ्यांचे वर्चस्व आणि भूखंड माफियांची कारस्थाने थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. उद्योजकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा या गोंधळामुळे उद्योग क्षेत्रात मोठा अडथळा येऊ शकतो. अहिल्यानगर एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्नअहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांच्या मुख्य समस्यांचा सारांश खालीलप्रमाणे आहे: उद्योग मंत्र्यांनी लक्ष द्यावेउद्योग मंत्र्यांनी अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून उद्योगांचा विकास होईल. समाधान काय?

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट Read More »