DNA मराठी

हायलाईट

cold wave

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून, अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला असून, जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ​नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना उबदार कपड्यांचा वापर : हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे तसेच शाल, चादर यांसारख्या उबदार कपड्यांचा पुरेसा वापर करावा. आहार व आरोग्य : शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पेय आणि पौष्टिक आहार घ्यावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. प्रवास व निवारा : थंडीची लाट असताना शक्यतो घरातच राहावे. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. घर आणि परिसर उबदार राहील याची दक्षता घ्यावी. ​लहान मुले व वृद्धांची काळजी : घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ​वैद्यकीय सल्ला : थंडीत दीर्घकाळ राहिल्याने त्वचा निस्तेज किंवा बधीर होत असल्यास, तसेच शरीराचा थरकाप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे (Hypothermia) लक्षण असू शकते पशुधनाची काळजी : नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना थंड वाऱ्यापासून वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. ​आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा ‘108’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही Read More »

img 20251210 wa0004

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त

Mephedrone Drug Factory : वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला आहे. बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याने “ऑपरेशन हिंटरलँड ब्रू” अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो इतक्या वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स (MD) जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी मेफेड्रोन ड्रग्सच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणारे उपकरणे जप्त केले आहेत. कारंजा (घाडगे) ठिकाण वर्धापासून सुमारे 75 किलोमीटर दूर आहे. या भागातील जंगलामध्ये बेकायदेशीररित्या ड्रग्सचा कारखाना चालविला जातोय अशी अत्यंत गोपनीय माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालय नागपूर येथील युनिटला समजली होती. त्या आधारेच DRI च्या पथकाने धाड टाकून हा कारखाना उद्धवस्त केला आहे. ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी या कारखान्यात एमडी ड्रग्स तयार करण्याचे काम सुरू होते. कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी)  जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 192 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत विदर्भातील ही सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारंजा (घाडगे) या तालुक्यातील एका निर्जन जंगल भागात मेफेड्रोनची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना समजली होती त्या आधारे  अधिकाऱ्यांनी या भागावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली होती. हा संपूर्ण परिसर पूर्णतः अत्यंत घनदाट जंगलाने व्यापलेला आहे ज्यावेळी कारखान्यात एमडी ड्रग्सची निर्मिती  सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने तिथे छापा टाकला आणि तब्बल 128 किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. शिवाय 245 किलो कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करणार:- गृहराज्य मंत्री वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे या ठिकाणच्या जंगलात सुरू बेकायदेशीरपणे असलेली एमडी ड्रग्स तयार करण्याची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचलनालयाने उद्धवस्त केल्याचेनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता ते म्हणालेत की मी आज वर्धा जिल्हाचा दौरा करणार आहे आणि प्रकरणात दोषी असलेली असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Mephedrone Drug Factory : मेफेड्रोन ड्रग्सची फॅक्टरी महसूल गुप्तचर संचालनालयाने केली उद्धवस्त, 192 कोटी रुपयांचे तब्बल 128 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त Read More »

sonia gandhi

Sonia Gandhi  : काँग्रेसच्या अडचणीत वाढ, नागरिकत्व प्रकरणात सोनिया गांधींना नोटीस

Sonia Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला एकामागे एक मोठे धक्के मिळत आहे. यातच आता काँग्रेसच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक होण्यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मंगळवारी, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि दिल्ली पोलिसांना त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास नकार देण्याच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नोटीस बजावली. सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिक होण्यापूर्वी तीन वर्षे मतदार यादीत नाव नोंदवल्याचा आरोप आहे. बार अँड बेचच्या वृत्तानुसार, विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी फौजदारी सुधारणा याचिकेवरील वरिष्ठ वकील पवन नारंग यांच्या सुरुवातीच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर सोनिया गांधी आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2026 रोजी होईल असे न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्ता विकास त्रिपाठी यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांच्या 11 सप्टेंबरच्या आदेशाला आव्हान देणारी ही फौजदारी सुधारणा याचिका दाखल केली आहे. त्रिपाठी यांचा दावा आहे की सोनिया गांधी यांचे नाव 1980 मध्ये नवी दिल्ली संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, तर त्या एप्रिल 1983 मध्ये भारतीय नागरिक झाल्या. त्यांनी सांगितले की सोनिया गांधी यांचे नाव 1980 मध्ये मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, 1982 मध्ये काढून टाकण्यात आले होते आणि नंतर 1983 मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले होते. न्यायाधीश वैभव चौरसिया यांनी याचिका फेटाळताना म्हटले की, याचिकाकर्त्याने मागणी केल्याप्रमाणे न्यायालय चौकशी सुरू करू शकत नाही. त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाशी संबंधित बाबी केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येतात. मतदार यादीतून एखाद्या व्यक्तीचा समावेश किंवा वगळण्याची पात्रता निश्चित करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाला आहे. न्यायाधीशांनी पुढे म्हटले की, या प्रकरणाची चौकशी करणे संवैधानिक अधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्रात अनावश्यक हस्तक्षेप करेल. हे भारतीय संविधानाच्या कलम 329 चे देखील उल्लंघन करेल. याचिकाकर्ता विकास त्रिपाठी यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील नारंग यांनी आज न्यायालयात सांगितले की, सोनिया गांधी यांचे नाव नागरिक होण्यापूर्वी नवी दिल्ली संसदीय मतदारसंघाच्या मतदार यादीत होते, त्यामुळे काही कागदपत्रे बनावट असू शकतात. त्यांनी सांगितले की, मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी काही कागदपत्रे बनावट, बनावट किंवा खोटी असू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की, त्रिपाठी यांनी या तथ्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. वकील नारंग यांनी युक्तिवाद केला की, “मी आरोपपत्र दाखल करण्याचे सुचवत नाही, परंतु या पैलूची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

Sonia Gandhi  : काँग्रेसच्या अडचणीत वाढ, नागरिकत्व प्रकरणात सोनिया गांधींना नोटीस Read More »

vijay wadettiwar

Vijay Wadettiwar: जागा घ्या अन् ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह बांधा; विजय वडेट्टीवरांची सभागृहात मोठी मागणी

Vijay Wadettiwar : राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येत आहे. पण सध्या ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याऐवजी सरकारने जमीन विकत घेऊन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृहाच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की या वसतिगृहात प्रवेश मिळण्याच्या अटी आणि नियम हे अडचणीचे आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही.त्यामुळे या अटी शिथिल कराव्या आणि सरसकट विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. तसेच राज्यात 72 वसतिगृह शासनाने बांधावी आणि त्यासाठी बजेट मध्ये तरतूद करावी अशी भूमिका मांडली. यावर उत्तर देतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाड्याच्या इमारतीत वसतीगृह सुरू ठेवायची नसून ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जमीन संपादन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जागा ठरल्या की मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन विभागाला जागा हस्तांतरीत करण्यात येईल,अस स्पष्ट केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले पुणे, जालना, बुलढाणा, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि रत्नागिरी या जिल्ह्यात जागा घेण्यात आल्या आहेत. महसूल विभागाने जागा घेतल्या ते जिल्हे सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर गोंदिया हे आहेत. काही जिल्ह्यात जागा निश्चित झाली आहे तिथे जागा हस्तांतरण बाकी आहे,ते जिल्हे नागपूर ,कोल्हापूर , सातारा , नाशिक जळगाव, नंदुरबार लातूर, नांदेड हिंगोली, बीड परभणी सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजीनगर,अहिल्यानगर असे आहेत. राज्यातील फक्त चार जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह साठी जागा मिळालेल्या नाही. रायगड, ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यात जागा मिळवून देण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करेल असं ही मुख्यमंत्री म्हणाले.

Vijay Wadettiwar: जागा घ्या अन् ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह बांधा; विजय वडेट्टीवरांची सभागृहात मोठी मागणी Read More »

renovation construction

Renovation Construction : इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रात नोकरीच्या संधी

Renovation Construction : इस्रायल देशामध्ये बांधकाम व नूतनीकरण (Renovation Construction) क्षेत्रात युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील नोकरीस इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले आहे. ​बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रामध्ये प्लास्टरिंग वर्क्स आणि सिरॅमिक टाइलिंगसाठी प्रत्येकी १ हजार जागा, ड्रायवॉल वर्करसाठी ३०० जागा, तर मॅसनसाठी ३०० जागा उपलब्ध आहेत. वरील पदांसाठीची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाबाबतची माहिती https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदभरतीबाबत अधिक माहितीसाठी ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा वसीम पठाण यांच्याशी ९४०९५५५४६५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Renovation Construction : इस्रायलमध्ये बांधकाम व नूतनीकरण क्षेत्रात नोकरीच्या संधी Read More »

nashik accident

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू

Nashik Accident : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह राज्यात रस्ते अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरू असून या अपघातात अनेक जण जखमी होत आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे खाजगी आणि सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात झाला घटना बसवंत पिंपळगाव येथे घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, बसवंत पिंपळगाव येथून इनोव्हा. एम एच 15 बी एन झिरो 0555 या क्रमांकाचे चार चाकी वाहन वनी येथील नांदुरी गडावर दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरचा तोल गेल्याने कार 400 फूट दरीत कोसळून कार मधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक हा गंभीर जखमी असून त्यास स्थानिक च्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी वणी ग्रामीण पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी येऊन रेस्क्यू ऑपरेशन करून वाहन चालकाला उपचारासाठी दाखल केले. घटनेचा अधिक तपास घटनेचा अधिक तपास वणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नांदुरी गाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहे.

Nashik Accident : दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची कार चारशे फूट दरीत कोसळून अपघात; 2 महिलांचा जागीच मृत्यू Read More »

big boss 19 winner

Bigg Boss 19 Winner : टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता; ‘प्राईस मनी’ जाणून व्हाल धक्का

Bigg Boss 19 Winner : भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील लोकप्रिय बिग बॉसच्या 19 व्या हंगामाचा विजेता समोर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणारा बिग बॉस 19 चा रविवारी 7 डिसेंबर रोजी फिनाले होता. हा शो जसजसा शेवट जवळ येत गेला तसतसे स्पर्धकांचे कठोर परिश्रम आणि त्यांनी बनवलेले नाते प्रेक्षकांमध्ये आवडते बनले. फरहाना भट्ट, गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि अमाल मलिक हे फिनालेमधील टॉप पाचमध्ये होते. कालांतराने, स्पर्धकांना एक एक करून बाहेर काढण्यात आले, शेवटी फक्त गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट राहिले होते. सलमान खानने विजेत्याची घोषणा केली फिनाले दरम्यान, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आणि गौरव खन्नाने बिग बॉस 19 चा किताब जिंकला. या विजयासह, त्याला शोची ट्रॉफी आणि 50 लाख बक्षीस रक्कम मिळाली. गौरव खन्नाचा विजय प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा होता, कारण त्याने संपूर्ण सीझनमध्ये संयम राखला आणि कधीही अपशब्द वापरले नाहीत. या शोमध्ये गौरवने दोन मजबूत आणि खरे नातेसंबंध निर्माण केले. त्याने माजी स्पर्धक मृदुल तिवारी आणि अंतिम फेरीतील स्पर्धक प्रणित मोरे यांच्याशी खोल, बंधुभावाचे नाते निर्माण केले. गौरव बाहेर पडल्यानंतरही मृदुलने त्याच्यासाठी मतांची मागणी करणे सुरू ठेवले, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली. फरहाना भट्ट दुसऱ्या क्रमांकावर आली आणि तिने तिच्या वर्तनाने आणि क्रीडा कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि अमाल मलिक अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर होत्या. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीने शोमध्ये योगदान दिले, प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि भावनिक क्षण निर्माण केले. गौरव खन्नाच्या विजयाने हे सिद्ध केले की कोणत्याही रियालिटी शोमध्ये संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मजबूत सामाजिक संबंध अत्यंत महत्त्वाचे असतात. बिग बॉस 19 चा हा सीझन प्रेक्षकांसाठी रोमांचक, भावनिक आणि मनोरंजक होता.

Bigg Boss 19 Winner : टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता; ‘प्राईस मनी’ जाणून व्हाल धक्का Read More »

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Crime: पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद क्षणातच चांगल्या मारामारीत परिवर्तित झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तेजस सोमनाथ आव्हाड, विठठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांसह एकूण पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2023 साली दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने गाव सोडले होते. शनिवारी तो पुन्हा गावात आल्यानंतर परिस्थिती ताणली गेली. रविवारी सकाळी दोन्ही गटातील पंधरा ते वीस जणांमध्ये तुफान बाचाबाची झाली आणि पुढे हाणामारीला सुरुवात झाली.भांडणात धारदार शस्त्रे, काठ्या, तसेच दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू, पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर व संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू Read More »

high cholesterol

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे

Cholesterol 5 Symptoms : कोलेस्टेरॉलच्या समस्या हृदयाशी जोडल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याची सुरुवातीची लक्षणे पायांमध्ये दिसतात? WHO, WebMD आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने उच्च कोलेस्टेरॉलची पाच लक्षणे सूचीबद्ध केली आहेत जी कधीही दुर्लक्षित करू नयेत. लोक सहसा असे गृहीत धरतात की उच्च कोलेस्टेरॉल हृदयाशी संबंधित आहे, आणि म्हणूनच, त्याची लक्षणे हृदयात किंवा छातीच्या भागात दिसून येतील. पण तुम्हाला माहित आहे का की उच्च कोलेस्टेरॉलची सुरुवातीची लक्षणे प्रथम पायांमध्ये दिसतात? आपले शरीर आपल्याला वारंवार हे संकेत देते, परंतु आपण त्यांना साधे थकवा किंवा अशक्तपणा म्हणून नाकारतो? अमेरिकन हार्ट असोसिएशन, WHO आणि WebMD नुसार, उच्च कोलेस्टेरॉलची ही पाच लक्षणे आहेत. चालताना पाय दुखणे जर तुम्हाला चालताना तुमच्या खालच्या पायांमध्ये, मांड्यांमध्ये किंवा कंबरेमध्ये वेदना किंवा पेटके येत असतील आणि थांबल्यानंतर वेदना कमी होत असतील, तर ते रक्त प्रवाह खराब होण्याचे लक्षण असू शकते. थोडे चालल्यानंतरही लवकर थकणे जर तुमचे शरीर ठीक असेल परंतु तुमचे पाय लवकर थकतात, तर हे खराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकते. तुमच्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे तुमच्या स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे पायऱ्या चढणे किंवा लांब चालणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण वाटू शकते. एक पाय दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटू शकते जर एक पाय अनेकदा दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटत असेल, विशेषतः चालल्यानंतर, तर हे रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्त शरीराला उष्णता प्रदान करते, त्यामुळे रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे पाय थंड वाटू शकतो. कधीकधी, त्वचा थोडीशी फिकट किंवा निळी होऊ शकते. बोटांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे पायांच्या बोटांमध्ये वारंवार मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे हे रक्तप्रवाह खराब झाल्यामुळे होऊ शकते. शिरांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचे कार्य बिघडते. जर हे बराच काळ चालू राहिले तर पायांच्या जखमा लवकर बऱ्या होणार नाहीत. पायांवर डाग आणि रंग बदलणे जर चालताना तुमच्या पायांची त्वचा फिकट, डाग असलेली किंवा हलकी निळी झाली तर ते रक्ताभिसरण खराब होण्याचे लक्षण आहे. गंभीर प्रकरणांमध्ये, त्वचा चमकदार दिसू शकते. पायांवर केसांची वाढ देखील मंद असते आणि जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागतो.

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे Read More »

indigo airlines

IndiGo Airline वर संकट कायम; आज 400 उड्डाणे रद्द, जाणून घ्या ताजे अपडेट

IndiGo Airline : इंडिगो एअरलाइन्स वरील संकट दूर होताना दिसत नाही. आज देखील देशात 400 हून जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. देशात आज 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडिगो एअरलाइन्सची सलग चौथ्या दिवशीही विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे, शनिवारी देशभरातील अनेक प्रमुख विमानतळांवर मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करण्यात आली. उड्डाणे अचानक रद्द केली जात आहेत, तर काही तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांची स्थिती बिकट झाली आहे. अनेक विमानतळांवर परिस्थिती इतकी गर्दीची आहे की ती रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकासारखी आहे. अनेक विमानतळांवर शेकडो उड्डाणे रद्द दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, कोची आणि तिरुअनंतपुरमसह अनेक प्रमुख शहरांमधील विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणे रद्द करण्याचे काम सुरूच आहे. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे सकाळपासूनच विमानतळ टर्मिनल्स भरून गेले आहेत. 100 हून अधिक उड्डाणे रद्द शनिवारी, राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) येथे ५४ निर्गमन आणि ५२ आगमन, एकूण १०६ उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळ प्रशासनाने सेवा हळूहळू सामान्य होत असल्याचा दावा केला असला तरी, रात्री उशिरापर्यंत टर्मिनल्सवर मोठी गर्दी दिसून आली. अनेक प्रवासी त्यांच्या फ्लाइट्सच्या अपडेट्सची वाट पाहत असल्याचे दिसून आले, तर काहींना शेवटच्या क्षणी रद्द झाल्याचे कळले. 109 फ्लाइट्स उशिरा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही प्रवाशांच्या अडचणी वाढल्या. शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, १०९ इंडिगो फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये ५१ आगमन आणि ५८ निघणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश होता. विमानतळाबाहेरून आतपर्यंत लांब रांगा दिसून आल्या. अनेक प्रवाशांनी सांगितले की इंडिगोची ग्राहक सेवा प्रतिसाद देत नाही, ज्यामुळे तिकिटे रद्द करणे किंवा नवीन फ्लाइट्स बुक करणे कठीण झाले. हैदराबाद आणि पुण्यातही परिस्थिती गंभीर सकाळपर्यंत, हैदराबादच्या जीएमआर विमानतळावर इंडिगोची ६९ फ्लाइट्स रद्द करण्यात आली: २६ आगमन आणि ४३ प्रस्थान. दरम्यान, पुणे विमानतळावर एकूण ४२ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये १४ आगमन आणि २८ निघणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश आहे. एअरलाइनला क्रूची तीव्र कमतरता भासत आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत आहे. कंपनीने अद्याप सामान्य स्थितीत परतण्यासाठी विशिष्ट वेळापत्रक दिलेले नाही. चार दिवसांत 2000 हून अधिक उड्डाणे रद्द गेल्या चार दिवसांत इंडिगोने २००० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. सतत बदलणारे वेळापत्रक, लांब रांगा आणि प्रतीक्षा वेळ यामुळे प्रवाशांचा संताप वाढत आहे. एअरलाइनने प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती ऑनलाइन तपासण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे इंडिगोच्या सततच्या उड्डाणे रद्द करणे आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील नरेंद्र मिश्रा यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून या संकटावर स्वतःहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

IndiGo Airline वर संकट कायम; आज 400 उड्डाणे रद्द, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »