DNA मराठी

हायलाईट

landslide

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी

Mumbai Rain: शुक्रवार रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी 16 व 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी Read More »

sawedi land scam officer land mafia satellites, political blessings and the whole land game

सावेडी जमीन घोटाळा : अधिकारी–भूमाफिया साटेलोटे, राजकीय आशीर्वाद आणि संपूर्ण जमिनीचा खेळ

Sawedi land scam – अअहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात नगर मनमाड महामार्गावर ओढ्या जवळ लागून असलेल्या, आणि जुना हाडांचा कारखाना तिथे पूर्वी नागरिकही जायला घाबरत, मात्र म्हणतातना पैस्या पुढे भूतही नाचतात तसे काहीसे हे प्रकरण, १३५ गुंठे असलेली हि जमीन, स. नं. २४५/ब२ मधील फेरफार क्र. ७३१०७ हे प्रकरण केवळ एका कागदावरची नोंद नसून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी, संशयास्पद व्यवहार, आणि कायद्याच्या थेट उल्लंघनाचं जिवंत उदाहरण आहे. ३४ वर्षांपूर्वी झालेल्या खरेदी दस्तावर कुळकायद्याचा भंग करून फेरफार मंजूर केला गेला, तोही कोणत्याही सक्षम न्यायालयाच्या आदेशाविना. प्रशासनाच्या नोंदी सांगतात — १९९१ सालच्या खरेदीखतातील जमीन ही त्यावेळी अस्तित्वात नसलेल्या सर्वे नंबरांवर दाखल करण्यात आली. वाटपाचे आदेश १९९२ मध्ये झाले, पण खरेदीखतामध्ये त्यांचा उल्लेख नाही. आणखी गंमत म्हणजे, या दस्तामध्ये लागवडीयोग्य क्षेत्र शून्य दाखवून पोटखराब क्षेत्रावर व्यवहार करण्यात आला. महसूल अधिकाऱ्यांनी खरेदी देणाऱ्याचे नाव देखील तपासले नाही; प्रत्यक्षात ७/१२ वर त्या नावाचा संबंधच नव्हता. महसूल प्रक्रिया इतकी उथळ रीत्या पार पडली की, ३४ वर्ष जुन्या दस्तावरील फेरफार मंजुरीवेळी ना मुळ ७/१२ पाहिले, ना खरेदीदाराचा शेतकरी पुरावा घेतला. कुळकायदा कलम ६३ चे पालन झालेले नाही. खरेदी दस्त नोंदणीवेळी सुद्धा ७/१२ संलग्न नव्हते, आणि महसूल दप्तरी त्याची तपासणी केली गेली नाही. या प्रकरणाचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे — महसूल विभागाने स्वतःच्या अधिकार मर्यादा ओलांडत दस्तातील छेडछाड स्वीकारली. नोंदणीकृत दस्त रद्द करण्याचा अधिकार केवळ दिवाणी न्यायालयाला असूनही महसूल कार्यालयाने प्रत्यक्षात त्या दस्ताची दखल घेतली आणि नोंद केली. ही प्रक्रिया केवळ गैरव्यवहाराला आमंत्रण देणारीच नाही तर कायदेशीरदृष्ट्या ही धोकादायक पायंडा घालणारी आहे. इतकेच नाही, तर या जमिनीच्या पीकपाहणी नोंदींवरून दिसते की १९३० ते २०१७ या ८७ वर्षांच्या काळात ही जमीन कारखाना व पडीक स्वरूपात होती. यामुळे महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ चे कलम ४५ आणि कुळकायदा कलम ६५(२) अंतर्गत कारवाई आवश्यक आहे. यावरून मुळ खातेदार आणि व्यवहारातील सहभागी दोघांनाही कायदेशीर जबाबदारीस सामोरे जावे लागेल. प्रशासनाची कारवाई येथून पुढे केवळ फेरफार रद्द करण्यापुरती मर्यादित राहू नये. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, मंडळाधिकारी आणि खरेदीदार-पक्ष या सर्वांवर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. तसेच, महसूल विभागातील फाईल वळवणारे, तपासणीत हलगर्जी दाखवणारे व अधिकार मर्यादेचा भंग करणारे अधिकारी यांची जबाबदारी ठरवून त्यांच्यावरही शिस्तभंगात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. हे प्रकरण केवळ सावेडीपुरते मर्यादित नाही. महसूल विभागाच्या यंत्रणेतील अशा प्रकारचे फेरफार-घोटाळे जिल्हाभरात किती झाले आहेत, याची तपासणी न झाल्यास “फाईल फिरली की जमीन विकली” हा प्रकार सुरूच राहील. जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून पारदर्शकतेसाठी नवे निकष ठरवले नाहीत, तर ‘फेरफारातला फेरफार’ हा नव्या घोटाळ्यांचा पाया ठरेल. सावेडी सर्वे नं. २४५ : ९० वर्षांची जमीनकहाणी! अहिल्यानगर तालुक्यातील मौजे सावेडी येथील सर्वे नं. २४५ (जुना नं. २७९ब) या जमिनीचा प्रवास गेल्या ९० वर्षांत अनेक मालकांच्या, वारसांच्या, खरेदी-विक्रीच्या आणि फेरफारांच्या फेरधडाक्यातून गेला आहे. एकूण १.३५ हे.आर क्षेत्राची ही जमीन १९३० पासून आजपर्यंतच्या ७/१२ उताऱ्यांमध्ये झालेल्या सर्व बदलांचा मागोवा घेतला असता खालील चित्र उभे राहते, १९३७ : पहिली वारस नोंद १५ फेब्रुवारी १९३७ रोजी फेरफार क्र. ४७६ अंतर्गत “वारस” म्हणून मयत दायाभाई वेलजी खोजा यांच्या वारसांची नोंद झाली. १९६५ : पुढील पिढीचा हक्क १२ जुलै १९६५ रोजी फेरफार क्र. २२३० अंतर्गत दायाभाईंची मुले मुसा दायाभाई आणि अब्दुल अजीज दायाभाई यांची नावे आली. त्यानंतर मयत मुसा दायाभाईंच्या हिस्स्याचे वारस पुतणे – डायाभाई अब्दुल अजीज आणि कासम अब्दुल अजीज – प्रत्येकी ३३.२ गुंठे हक्काने मिळाले. १९६५ : ‘पोकळीस्त’ नोंद १७ ऑक्टोबर १९६५ रोजी फेरफार क्र. २२७६ मध्ये “पोकळीस्त” म्हणून पारुबाई रामजी वामन यांची नोंद घेतली गेली. १९७१ : दशमान पद्धती लागू २३ जुलै १९७१ रोजी दशमान पद्धतीनुसार क्षेत्र मोजणी झाली. जमीन १.३५ हेक्टर अशी नोंदवली गेली. १९८७ : सर्वे नंबर बदल ३१ डिसेंबर १९८७ रोजी फेरफार क्र. ९७७६ नुसार जुना सर्वे नं. २७९ब बदलून नवीन सर्वे नं. २४५ झाला. १९९२ : भावंडांमध्ये वाटप १४ जुलै १९९२ रोजी फेरफार क्र. १४६७६ अंतर्गत अब्दुल अजीज डायाभाई यांना ०.७२ हे.आर (२४५/ब१) आणि डायाभाई अब्दुल अजीज यांना ०.६३ हे.आर (२४५/ब२) असे वाटप झाले. २००२ : खरेदी व्यवहार २० ऑगस्ट २००२ रोजी २४५/व१ मधील ०.७२ हे.आर अब्दुल अजीज डायाभाई यांनी अजीज डायाभाई आणि साजिद डायाभाई यांना विकले. २०१८ : आकारणी दुरुस्ती ०३ एप्रिल २०१८ रोजी फेरफार क्र. ५४६१३ नुसार २४५/ब२ मध्ये आकारणी दुरुस्तीची नोंद झाली. २०२५ : ताज्या विक्रीची नोंद १७ मे २०२५ रोजी फेरफार क्र. ७३१०७ अंतर्गत डायाभाई अब्दुल अजीज यांनी ०.६३ हे.आर (२४५/व२) पारसमल मश्रीमल शाह यांना विकले. सावेडी जमीन प्रकरण — वादग्रस्त मुद्दे

सावेडी जमीन घोटाळा : अधिकारी–भूमाफिया साटेलोटे, राजकीय आशीर्वाद आणि संपूर्ण जमिनीचा खेळ Read More »

'coolie' vs. 'war 2' — a colorful box office battle

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत

दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दोन वेगवेगळ्या सिनेमाई प्रवाहांचा थरार अनुभवायला मिळत आहे. एका बाजूला हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या “War 2” मधील अ‍ॅक्शन-थ्रिलरचा झंझावात, तर दुसरीकडे रजनीकांतच्या “Coolie” मधील साऊथ इंडियन मास एंटरटेनमेंटचा जादुई प्रभाव पडला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या टक्करने बॉक्स ऑफिसवर एक नवा अध्याय लिहायला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक विरुद्ध व्यावसायिक ब्रँडिंग War 2 हा यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. जागतिक दर्जाच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस, स्टार कास्टची जबरदस्त केमिस्ट्री आणि हॉलीवूडसदृश सादरीकरण या सगळ्यामुळे त्याची प्रतिमा ‘इंटरनॅशनल थ्रिलर’सारखी झाली आहे. मात्र, Coolieचा प्रभाव वेगळा आहे — रजनीकांतच्या करिष्म्याने तयार झालेला एक सांस्कृतिक सोहळा, ज्यामध्ये कथा, गाणी, संवाद आणि फॅन्सचा भावनिक ओघ या सर्वांचा संगम आहे. आकड्यांचा खेळ पहिल्या दिवशी War 2 ने ₹20–21 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली, विशेषतः हिंदी पट्टा आणि तेलुगू प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे. पण Coolieने एडवांस बुकिंगमध्येच ₹51 कोटींचा टप्पा गाठून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. परदेशातील प्रीमियर शोजमध्ये Coolieने War 2पेक्षा अनेक पटींनी अधिक कमाई करून एक स्पष्ट संदेश दिला — फॅनबेसची ताकद कोणापेक्षा कमी नाही. मराठी प्रेक्षकांचे स्थान महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमी या दोन्ही सिनेमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे War 2मधील आधुनिक अ‍ॅक्शनचा थरार त्यांना भुरळ घालत आहे, तर दुसरीकडे Coolieमधील रजनीकांतच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सची मोहिनीही कमी झालेली नाही. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतरच्या आठवड्याच्या शेवटी कोण आघाडीवर राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निष्कर्ष ही स्पर्धा केवळ आकड्यांची नाही, तर भारतीय प्रेक्षकांच्या विविध अभिरुचींची, भाषांच्या पलीकडच्या प्रेमाची आणि स्टारडमच्या अद्वितीय शक्तीची आहे. Coolie आणि War 2 हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या सिनेमाई शाळांचे प्रतिनिधित्व करतात — एक साऊथ इंडियन मास अ‍ॅक्शन, तर दुसरा बॉलिवूडचा जागतिक स्तरावरील थ्रिलर. शेवटी जिंकणारा ठरणार तोच, जो प्रेक्षकांच्या मनात अधिक काळ घर करून राहील.

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत Read More »

पत्रकारास शिवीगाळ,

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल;

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकीतोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करणार अहिल्यानगर – शहरातील ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक फौजदार टाईम्स चे कार्यकारी संपादक अन्सार राजू सय्यद (वय 51, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना कार्यालयीन आवारात शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबासाहेब बलभिम सानप या व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला असून, फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून कलम 351(2), 352 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. घटनेची पार्श्वभूमीफिर्यादी अन्सार सय्यद हे राज चेंबर्स, कोठला येथे असलेल्या आपल्या कार्यालयात नियमित हजेरी लावतात. त्यांच्या कार्यालयासमोरच आरोपी बाबासाहेब सानप यांचेही कार्यालय आहे. 9 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास फिर्यादींचा ओळखीचा गणेश उरमुले हा कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी आला होता. भेटीच्या दरम्यान उरमुले यांनी इमारतीतील शौचालय वापरले. यानंतर सानप यांनी उरमुले यांना बोलावून “तू लघवी केली आहेस, टॉयलेट धुवून घे” असे सांगितले. उरमुले हे पाणी घेऊन टॉयलेट धुण्यास जात असताना सानप यांनी पुन्हा हाक मारून “तू लघवीला तिकडे का गेला?” असे विचारत चापटी मारून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पत्रकार व मुलाला देखील धमकीही घटना फिर्यादींनी कार्यालयातून पाहिली व त्यांनी सानप यांना ओरडले की, उरमुले टॉयलेट धुवून देतील, मारू नका. यावेळी फिर्यादींचा मुलगा अमन सय्यद हा देखील तिथे गेला व दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविला. यानंतर, पार्किंगमध्ये असताना सानप यांनी अन्सार सय्यद यांना विनाकारण शिवीगाळ करत धक्का बुक्की केली, “तू पत्रकार आहेस म्हणून जास्त शहाणा झाला का? तुमची लायकी काय आहे मला माहित आहे,  मी चांगल्या-चांगल्यांना कामाला लावले आहे, आता पुढचा नंबर तुझा” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. या प्रकरणी तोपखाना पोलीस्थाण्य्त गुन्हा दाखल,फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी गुन्हा क्र. 832/2025 दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांच्याकडे दिला आहे. गुन्हा बीएनएस 351(2) व 352 या कलमांखाली नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी तक्रार लेखी स्वरूपात नोंदवून रोजनाम्यात नोंद केली आहे. या घटनेने पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पत्रकार संघटनांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पत्रकारास शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी,तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; Read More »

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

is the savedi land scam a clue to negligence or collusion in revenue records.

Sawedi land scam – महसूल नोंदीतील बेफिकीरी की संगनमताचा सुगावा?

Sawedi land scam – अहिल्यानगर तालुक्यातील मौजे सावेडी येथील स.नं. २४५ या जमिनीच्या नोंदी व खरेदी व्यवहाराचा मागोवा घेतला, तर एकाच वेळी अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. अपर तहसीलदारांच्या तपास अहवालातून समोर आलेला घटनाक्रम केवळ महसूल विभागातील बेपर्वाईचाच नाही, तर संगनमताचा संशयही दृढ करतो. १९९१ सालचा खरेदीदस्त क्रमांक ४३० हा व्यवहार, त्यानंतर झालेले वाटप, चुक दुरुस्ती लेख, आणि २०२५ मध्ये अचानक ३४ वर्षांनी झालेला फेरफार — हे सर्व दस्तऐवज पाहता कायदेशीर प्रक्रियेतले पायऱ्या जाणीवपूर्वक टाळल्याचे स्पष्ट दिसते. महसूल कायद्यानुसार खरेदी देणारा आणि घेणारा या दोघांना कलम १५०(२) नुसार नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र, येथे ना टपालाद्वारे नोटीस पाठवली, मलामत्तेवर नोटीस लावली, ना ग्रामपंचायतीमार्फत प्रसार केला. त्याऐवजी अवघ्या २० दिवसांत फेरफार मंजूर करण्याची “तातडी” दाखवली गेली. प्रश्न असा की — या तातडीमागे फक्त अधिकारी बेपर्वाई होती का, की काहींचा फायदा करून देण्याची जाणीवपूर्वक धडपड? सदर जमिनीची स्थिती १९९२ च्या फेरफार क्रमांक १४६७६ नुसार स्पष्ट होती. अब्दुल अजीज दायाभाई यांना ०.७२ हे.आर. तर दायाभाई अब्दुल अजीज यांना ०.६३ हे.आर. असे वाटप झाले होते. तरीदेखील खरेदीदस्तात संपूर्ण १.३५ हे.आर. क्षेत्राचा उल्लेख करून, वाटपापूर्वीचे आणि नंतरचे गट क्रमांक मिसळून विक्री दाखवण्यात आली. म्हणजे, नोंदीतील आकडेवारी आणि प्रत्यक्ष वाटप यात उघड विसंगती निर्माण झाली. या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे १९९१ सालचा दस्त प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला गेला की नाही, याबाबतच अद्याप खात्री नाही. अंगठे पुस्तक, पावती रजिस्टर, डे बुक यांसारखी आवश्यक मूळ नोंदीच उपलब्ध नाहीत. दस्त वैध आहे की बनावट, हे ठरवण्याऐवजी महसूल अधिकाऱ्यांनी त्यावर आधारित फेरफार मंजूर केला. ही केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर थेट कायद्याच्या गळचेपीसारखी बाब आहे. अहवालात नमूद केलेल्या समांतर प्रकरणांतून एक धोकादायक पॅटर्न समोर येतो — ३०-३५ वर्षे जुने खरेदीदस्त, ज्यात विक्रेते-खरेदीदार दोघेही मृत, आणि मग वारसदार किंवा इतर लाभार्थी अचानक विलंब माफी अर्जासह अपील दाखल करतात. अनेकदा हे दस्त बनावट असल्याचे विरोधी पक्ष सांगतो. महसूल यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अशा संशयास्पद फेरफारांना संमती मिळते आणि जमिनीच्या मालकीत दीर्घकाळानंतर ‘कायदेशीर’ फेरबदल होतात. सावेडी प्रकरण हा फक्त एक तुकडा आहे. पण तो आपल्याला महसूल नोंदी व्यवस्थेत खोलवर रुतलेल्या दोषांचे दर्शन घडवतो. अधिकारी जबाबदारी टाळतात, नियम मोडले जातात, आणि परिणामी काही हातांना कोटींच्या जमिनी सहज मिळतात. अशा प्रकरणांवर कठोर चौकशी होऊन जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. अन्यथा, जमीन माफियांच्या जाळ्यात अडकलेली महसूल यंत्रणा सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांसाठी न्यायालयीन लढ्याचं रणांगण बनून राहील. सावेडीचा धडा स्पष्ट आहे — महसूल नोंदी ही केवळ सरकारी कागदपत्रं नाहीत, तर त्या प्रत्येक गावाच्या मालमत्तेचा इतिहास असतात. त्या इतिहासात खोटा अध्याय लिहू देणं म्हणजे आपल्या भूमीच्या अस्मितेवरच गदा आणणं होय. १. तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी, सावेडी 1 – चूक: ३४ वर्षांपूर्वीचा खरेदीदस्त तपासणी न करता, ७/१२ वरील वास्तविक नावे व दस्तातील नावे पडताळणी न करता, चुकीची नोंद फेरफार क्र. ७३१०७ मध्ये घेतली. २ – गंभीर मुद्दा: कलम १५०(२) नुसार खरेदी देणारा आणि घेणारा (किंवा त्यांचे वारसदार) यांना नोटीस देणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. संशय: एवढ्या जुन्या प्रकरणात अवघ्या २० दिवसांत फेरफार मंजूर करून ‘तातडी’ दाखवली गेली. २. तत्कालीन मंडळाधिकारी, सावेडी 1- चूक: ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नोंदीची कोणतीही चौकशी न करता मंजुरी देणे. २ – गंभीर मुद्दा: दस्त वैध आहे का, दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद झाला का, याबाबत कोणतीही खातरजमा केली नाही. ३. दुय्यम निबंधक कार्यालय, अहमदनगर क्र. १ (दक्षिण) 1 – चूक: १९९१ चा दस्त क्रमांक ४३० नोंदवला गेला का, याबाबतची मूळ रजिस्टर, अंगठे पुस्तक, पावती रजिस्टर इ. अभिलेख अनुपलब्ध. २ – गंभीर मुद्दा: दस्त नोंदणीचा पुरावा पूर्ण नसताना महसूल कार्यालयाला स्पष्ट माहिती न देणे. ३ – संशय: जर हा दस्त बनावट किंवा अपूर्ण नोंद असलेला असेल, तर त्याची त्वरित नोंद महसूल विभागाला देणे अपेक्षित होते. ४. खरेदी घेणारे – पारसमल मश्रीमल शाह 1 – चूक/भूमिका: ३४ वर्षांनंतर अचानक फेरफार अर्ज दाखल करणे, तेही मूळ व्यवहारातील पक्षकार (खरेदी देणारे) मृत झाल्यानंतर. २ – संशय: एवढ्या मोठ्या विलंबानंतर जमीन आपल्या नावावर घेण्याचा प्रयत्न, तोही सर्व कायदेशीर प्रक्रिया टाळून. ५. खरेदी देणाऱ्यांचे वारस/संबंधित पक्ष थोडक्यात दोष 1 – थेट प्रशासनिक जबाबदारी: तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी (नोंदीची तपासणी व मंजुरी). २ – नोंदणी प्रक्रियेतील कमतरता: दुय्यम निबंधक कार्यालय. ३ – संभाव्य संगनमत: काही वारस व अधिकारी यांचा फायदा घेण्याचा व्यवहार.

Sawedi land scam – महसूल नोंदीतील बेफिकीरी की संगनमताचा सुगावा? Read More »

sawedi land scam a dark shadow over the records of the secondary registrar's office

सावेडीचा संशय: दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदींवर काळी छाया..

अहिल्यानगर – जमिनीच्या नोंदीतले संशयास्पद व्यवहार, हरवलेल्या कागदपत्रांचा गूढ मागोवा, आणि वर्षानुवर्षे चालणारा ‘खात खरेदी’चा खेळ… सावेडीच्या दुय्यम निबंधक क्र. १ (दक्षिण) कार्यालयाचा हा इतिहास जणू एखाद्या गुन्हेगारी कादंबरीसारखा वाटावा असा आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत या कार्यालयातून झालेल्या अनेक खरेदी खातांवर आता संशयाच्या भावऱ्यात आहेत . नोंदी तपासताना असे दिसते की काही खात व्यवहार अतिशय घाईघाईत, कागदपत्रांची पूर्ण पूर्तता न होता, आणि संबंधित महसूल विभागाच्या प्रक्रियेची शिस्त न पाळता पूर्ण करण्यात आले. यामध्ये काही व्यवहारांची मूळ फाईलच गायब असल्याचा आरोप आहे. ही फाईल गायब होणे ही केवळ “कार्यालयीन चूक” की ठरवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न — हा प्रश्न गंभीर आहे. DNA मराठीच्या शैलीत विचारला तर —सरकार, तुमचे नोंदणी व मुद्रांक विभागातील गुप्तहेर काय करत होते?महसूल अधिकारी आणि निबंधक यांची भूमिका केवळ कागदावर सही करणारी होती का, की “सर्व काही ठीक आहे” अशी मान्यता देणारी? या संशयास्पद व्यवहारांतून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले असावेत, असे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे. काही जमीनमालकांच्या मते, भूमाफिया आणि दलाल यांची सांगड, कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जमिनीच्या नोंदीत फेरफार करून “कागदावर मालक” बदलण्यात आली. प्रश्नांची रांग: सध्या चौकशीची गाडी सुरू झाली आहे, मात्र तिचा वेग सरकारी यंत्रणेसारखाच — संथ. चौकशी संपेपर्यंत काही भूमाफिया, दलाल व अधिकारी यांची सांगड असल्याचा आरोप स्थानिक पातळीवर जोर धरत आहे. दस्त हरवणे, नोंदी गायब होणे, व्यवहारात घाई करणे, आणि संबंधितांची पडताळणी न होणे – या सगळ्या गोष्टी संशयाला खतपाणी घालत आहेत. “जमीन ही मालमत्ता नव्हे, तर सोन्याची खाण” या मानसिकतेतून जणू काही व्यवहारांचा मेळ बसवला गेल्याची चर्चा रंगली आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक ‘बडी माशा’ जाळ्यात अडकण्याची शक्यता सूत्रांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. मात्र आतापर्यंत या चौकशीला ‘फाईल फिरवणं’ एवढंच महत्त्व दिलं गेल्याने, कारवाई खरंच होईल की, हा आणखी एक ‘कागदी वादळ’ ठरेल, असा संशय नागरिकांत आहे. महत्त्वाच्या फाईल्स पुराव्याच्या स्मशानात जाऊ नयेत, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. सरकारने जर खरंच सावेडीच्या संशयाचा शेवट करायचा असेल, तर या चौकशीला धारदार दात आणि टोकदार नखं लावावी लागतील. अन्यथा हा प्रकारही महाराष्ट्राच्या जमीन घोटाळा इतिहासात आणखी एक “प्रकरण संपले” म्हणून नोंदवला जाईल.

सावेडीचा संशय: दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदींवर काळी छाया.. Read More »

import duty hike hits maharashtra hard exports decline industry and agriculture in crisis

आयात शुल्क वाढीचा महाराष्ट्रावर तगडा फटका; निर्यात घटली, उद्योग-शेती संकटात

मुंबई – आयात शुल्क वाढ, निर्यात घट, कोल्हापूर हळद, नाशिक बेदाणे, इचलकरंजी कापड उद्योग, विदर्भ कापूस… या सगळ्या नावांच्या मागे आता एकच सत्य लपलेलं आहे – महाराष्ट्रातील कृषी व औद्योगिक अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली आहे. केंद्र सरकारच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयामुळे राज्यातील प्रमुख निर्यात वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता गमवावी लागत आहे. व्यापारी संघटनांच्या मते, निर्यातदार आता विदेशी बाजारपेठ गमावण्याच्या भीतीने आहे. कोल्हापूर-सांगलीतील हळद उत्पादक, नाशिकमधील बेदाणे व द्राक्ष शेतकरी, इचलकरंजीतील पॉवरलूम उद्योग आणि विदर्भातील कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. वाढीव शुल्कामुळे विदेशी खरेदीदार करार रद्द करत आहेत, तर अनेकांनी नवीन ऑर्डर देणे थांबवले आहे. तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण अर्थव्यवस्था, रोजगार आणि निर्यात महसूल या तिन्ही गोष्टींवर या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारने केंद्राशी तातडीने चर्चा करून आयात शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली नाही, तर राज्याच्या अर्थचक्राला दीर्घकालीन धक्का बसू शकतो. विश्लेषण : मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा घोषणा करताना जागतिक व्यापारातील ‘किंमत स्पर्धा’ या मूलभूत सत्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. आयात शुल्क वाढ म्हणजे संरक्षणवादाचा मार्ग, पण तोच मार्ग महाराष्ट्रातील शेतकरी, निर्यातदार आणि उद्योगपतींच्या कडू अनुभवाचा कारणीभूत ठरत असेल, तर धोरणकर्त्यांनी आरशात पाहायला हवं.

आयात शुल्क वाढीचा महाराष्ट्रावर तगडा फटका; निर्यात घटली, उद्योग-शेती संकटात Read More »

sawedi land case – missing records, fake signatures, yet rush to sell

सावेडी जमीन प्रकरण – गायब नोंदी, बनावट सह्या, तरीही विक्रीची घाई…

अहिल्यानगर | प्रतिनिधी Sawedi land scam – सावेडीतील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरण चौकशीच्या टप्प्यात असतानाच विक्रीची घाई सुरू असल्याने महसूल प्रशासन आणि निबंधन यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तीन गंभीर प्रश्न प्रशासनासमोर कायम आहेत – गायब झालेल्या नोंदी सापडणार का? बनावट सह्या सिद्ध होणार का? आणि अखेर हा व्यवहार कायदेशीर ठरणार का? १९९१ च्या खरेदीखताच्या आधारे २४ एप्रिल २०२५ रोजी खरेदीदार पारसमल मश्रिमल शहा यांनी नोंद घेण्याचा अर्ज दाखल केला. चार दिवसांत फेरफार नोंद घेऊन १७ मे २०२५ रोजी तत्कालीन मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी ती मंजूर केली. त्यानंतर तक्रारदार सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि प्रकरण मंडल अधिकाऱ्यांच्या चौकशीत गेले. चौकशीत शहा यांचे जनरल कुलमुखत्यारपत्रधारक गणेश शिवराम पाचरणे यांनी सुरुवातीला खुलासा देण्यास नकार दिला, मात्र अप्पर तहसीलदारांकडे सुनावणीदरम्यान अचानक “चूक दुरुस्ती लेख” सादर केला. हा दस्त आधीपासून अस्तित्वात असतानाही सुरुवातीला त्याचा उल्लेख न होणे, संशयाला अधिक वाव देणारे ठरले आहे. याशिवाय, १९९१ च्या मूळ खरेदीखतातील एका साक्षीदाराने “सही माझी नाही” असा दावा केला, तर १९९२ च्या चूक दुरुस्ती लेखातील दुसऱ्या साक्षीदारानेही “मी कधी सहीच केलेली नाही” असे स्पष्ट सांगितले. म्हणजेच, दोन्ही दस्तऐवजांवरील सह्यांच्या वैधतेवरच मोठा प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, सह दुय्यम निबंधक वर्ग २, अहिल्यानगर क्र.१ (दक्षिण) कार्यालयातील तपासणीत दस्त क्र. ४३०/१९९१ संदर्भात फक्त ‘खंड क्र. १९६’ उपलब्ध झाला आहे. सुची क्र. २, अंगठा-पुस्तक, डे बुक, पावती पुस्तक यांसारखी मूलभूत नोंदवही अद्याप सापडलेली नाही. त्या हरवल्या, लपवण्यात आल्या की कधी तयारच झाल्या नाहीत, हे अजूनही अज्ञात आहे. मात्र, इतक्या गंभीर विसंगती व चौकशी सुरू असतानाही संबंधित जमिनीची विक्री सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महसूल विभाग व निबंधन यंत्रणेसमोर हे मोठे आव्हान असून, चौकशी आणि निर्णयाआधी विक्री थांबवणे हा त्यांचा कस लागणारा कसोटीचा क्षण ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की – गायब नोंदी शोधल्या जातात का, बनावट सह्यांचे रहस्य उलगडते का, आणि अखेर हा व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसतो का? की सर्व प्रश्न अनुत्तरित राहून पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याला मोकळा रस्ता मिळणार? इथे मी तुमच्यासाठी धारदार, पॉइंट-बाय-पॉइंट स्वरूपात बातमी तयार केली आहे — वाचकाला थेट धक्का देणारी आणि शंका निर्माण करणारी: जमीन व्यवहाराचा गूढ – प्रश्नच प्रश्न!

सावेडी जमीन प्रकरण – गायब नोंदी, बनावट सह्या, तरीही विक्रीची घाई… Read More »

img 20250809 wa0001

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व”

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे, आमदार फोडणे आणि सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपेच रचणे हे काही नवीन राहिले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या सगळ्याला एक वेगळे आणि अधिक धोकादायक दिशा मिळालेली दिसते. शरद पवारांसारख्या थोर राजकारण्यांनीही भूतकाळात पक्ष फोडला, नवा पक्ष उभारला, सत्ता मिळवली. पण त्या काळात पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्याचा फोटो यावर असा थेट दावा कुणी केला नव्हता. तात्पर्य, राजकीय भूक होती, पण तिची एक मर्यादा होती. पण आज ती मर्यादा धूसर होत चालली आहे. “मी निवडून आलोय, म्हणजे माझीच मक्तेदारी,” असा अहंकार काही निवडून आलेल्या काही लोकप्रतिनिधींच्या वागण्यात दिसतो. जनतेने मतदान पेटीतून ज्यांना विश्वासाने निवडलं, तेच प्रतिनिधी निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांनाच कमी लेखतात. हीच का लोकशाही असा प्रश्न पडतो? या सगळ्या घडामोडींचा एक सकारात्मक पैलूही आहे. आज या अस्थिर आणि अस्वस्थ राजकारणात दोन तरुण नेते उभे राहताना दिसतात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे. या दोघांनीही आपल्या राजकीय प्रवासात पक्ष फोडणे, दबाव तंत्र, आमदारांची खरेदी-विक्री, विश्वासघात, एकनाथ शिंदें व अजित पवारांसारखे बंड आणि सत्तापालट यांचे साक्षीदार झाले आहेत. हे राजकारण त्यांनी बाहेरून पाहिलं नाही अनुभवलं आहे. आज हे दोघंही नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताना, पक्ष रचनेचा गाभा कसा मजबूत करायचा, कार्यकर्त्यांशी नातं कसं टिकवायचं, जनतेचा विश्वास कसा जपायचा, आणि राजकारणात नैतिकता जिवंत कशी ठेवायची याचा धडा घेऊन पुढे येत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांचा वारसा आणि ठाकरे बाणा जपण्याचा प्रयत्न केला. तर रोहित पवार यांनी शरद पवारांच्या परंपरेचा अभ्यास केला, तरुणाचे प्रश्न कसे हाताळायची आणि ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क कास रहायचं “शरद पवार जसे आज बहुतांशी गाडीने प्रवास करताय. असं रोहित पण काकांचा वारसा जपतानी दिसतंय, ग्रामीण भागात नाळ जुळून घेण्याचे त्याचे कौशल्य त्यांच्यात दिसते. हे दोघेही आज सत्तेच्या खेळात नाहीत, पण राजकारणाच्या अभ्यासातून आणि प्रत्यक्ष संघर्षातून त्यांनी आपले राजकीय स्थान मजबूत केले आहेत. म्हणूनच भविष्यकाळाकडे पाहताना वाटते आजच्या फोडाफोडीच्या राजकारणातूनच उद्याचं ठाम आणि विचारधारेशी बांधिल नेतृत्व उगम पावू शकतं आणि या बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार आणि आदित्य ठाकरे ही नावं नजरेआड करणं अशक्य आहे.

Maharashtra Politics : “फोडाफोडीच्या राजकारणातून उगम पावणारे नवे नेतृत्व” Read More »