DNA मराठी

ट्रेंडिंग

img 20250814 wa0010

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल

Jalna Crime : जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला. त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतल. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशान भूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता. पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.

धक्कादायक, तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू अन् सकाळी 4 ला अंत्यविधी; गुन्हा दाखल Read More »

prakash ambedkar

Prakash Ambedkar यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र पण…

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 10 ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पत्राच्या 4 दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. अ‍ॅड. आंबेडकर यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 रोजी दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते.  परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांनी सांगितले की, यापूर्वी 16 जानेवारी 2025 रोजी त्यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खरगे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, जर राहुल गांधी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे “गुप्त” आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असे त्यांनी सुचवले आहे. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, “आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे.” अ‍ॅड. आंबेडकरांच्या या पत्रानंतर, कॉंग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Prakash Ambedkar यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र पण… Read More »

job

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत

Maharashtra Police: नोकरीच्या पदावर कायम राहताना, महाविद्यालयात जाऊन पूर्णवेळ (फुलटाईम) शिक्षण घेतल्याचे खोटे दाखले सादर करून पदोन्नती व वेतनवाढीचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने चांगलीच नजर रोखली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या केंद्रीय कार्यालयातून नुकताच जारी झालेला आदेश व्हायरलं झाला असून कर्मचाऱ्यांना थेट इशारा देणारा ठरला आहे. व्हायरल झालेला वाहतूक विभागाच्या परिपत्रका नुसार , चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई अशा विविध पदांवरील काही कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता मिळवताना नियम धाब्यावर बसवले. नियमानुसार, पूर्णवेळ शिक्षण घेण्यासाठी नोकरीवरून सुटी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी नोकरी करतानाच फुलटाईम पदवी घेतल्याचे दाखवून लाभ मिळवला. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, नियुक्ती प्रक्रियेनंतर घेतलेली पदवी नियमबाह्य पद्धतीने मिळवलेली असल्यास ती वैध मानली जाणार नाही. तसेच अशा शिक्षणावर आधारित पदोन्नती, वेतनवाढ किंवा अन्य लाभ तत्काळ रद्द केले जातील. अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात आले आहे की, संशयास्पद प्रमाणपत्रांसह पदोन्नतीसाठी अर्ज आले तर त्यांची काटेकोर चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी. यामुळे बनावट शैक्षणिक दाखल्यांच्या बळावर गोडीगुलाबीने पदोन्नती मिळवणाऱ्यांचे दिवस आता मोजकेच उरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या हालचालीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली असून, ‘कोणाच्या गळ्यात कारवाईची घंटा वाजणार?’ हा प्रश्न सध्या सर्वांच्या चर्चेत आहे.

Maharashtra Police : नोकरी करताना ‘फुलटाईम’ शिकल्याचा बनावट खेळ; प्रशासनाचे थेट कारवाईचे संकेत Read More »

'coolie' vs. 'war 2' — a colorful box office battle

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत

दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दोन वेगवेगळ्या सिनेमाई प्रवाहांचा थरार अनुभवायला मिळत आहे. एका बाजूला हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या “War 2” मधील अ‍ॅक्शन-थ्रिलरचा झंझावात, तर दुसरीकडे रजनीकांतच्या “Coolie” मधील साऊथ इंडियन मास एंटरटेनमेंटचा जादुई प्रभाव पडला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या टक्करने बॉक्स ऑफिसवर एक नवा अध्याय लिहायला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक विरुद्ध व्यावसायिक ब्रँडिंग War 2 हा यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. जागतिक दर्जाच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस, स्टार कास्टची जबरदस्त केमिस्ट्री आणि हॉलीवूडसदृश सादरीकरण या सगळ्यामुळे त्याची प्रतिमा ‘इंटरनॅशनल थ्रिलर’सारखी झाली आहे. मात्र, Coolieचा प्रभाव वेगळा आहे — रजनीकांतच्या करिष्म्याने तयार झालेला एक सांस्कृतिक सोहळा, ज्यामध्ये कथा, गाणी, संवाद आणि फॅन्सचा भावनिक ओघ या सर्वांचा संगम आहे. आकड्यांचा खेळ पहिल्या दिवशी War 2 ने ₹20–21 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली, विशेषतः हिंदी पट्टा आणि तेलुगू प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे. पण Coolieने एडवांस बुकिंगमध्येच ₹51 कोटींचा टप्पा गाठून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. परदेशातील प्रीमियर शोजमध्ये Coolieने War 2पेक्षा अनेक पटींनी अधिक कमाई करून एक स्पष्ट संदेश दिला — फॅनबेसची ताकद कोणापेक्षा कमी नाही. मराठी प्रेक्षकांचे स्थान महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमी या दोन्ही सिनेमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे War 2मधील आधुनिक अ‍ॅक्शनचा थरार त्यांना भुरळ घालत आहे, तर दुसरीकडे Coolieमधील रजनीकांतच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सची मोहिनीही कमी झालेली नाही. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतरच्या आठवड्याच्या शेवटी कोण आघाडीवर राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निष्कर्ष ही स्पर्धा केवळ आकड्यांची नाही, तर भारतीय प्रेक्षकांच्या विविध अभिरुचींची, भाषांच्या पलीकडच्या प्रेमाची आणि स्टारडमच्या अद्वितीय शक्तीची आहे. Coolie आणि War 2 हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या सिनेमाई शाळांचे प्रतिनिधित्व करतात — एक साऊथ इंडियन मास अ‍ॅक्शन, तर दुसरा बॉलिवूडचा जागतिक स्तरावरील थ्रिलर. शेवटी जिंकणारा ठरणार तोच, जो प्रेक्षकांच्या मनात अधिक काळ घर करून राहील.

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत Read More »

harshvardhan sapkal dna

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, वन नेशन वन लिडर संकल्पना आणून एकच नेता, एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता 15 ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे. कबुतरांसाठी लोढा-अदानींनी विशेष टॉवर बांधावे कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे तसाच माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. कबुतरांचे पंख व विष्टेपासून फुप्फुसाचे गंभीर आजार होतात यात काहीजणांना जीवही गमवावा लागतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे, पण भाजपा सरकारने जाणीव पूर्वक कबुतर जिहाद सुरु केला आहे. सरकारने अदानीला अर्धी मुंबई देऊन टाकली आहे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही मुंबईत भरपूर जमीन आहे. या जमिनीवर लोढा व अदानी विशेष कबुतर प्लाझा उभा करावा असे सपकाळ म्हणाले. भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही. NSUI च्या नवनियुक्त अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुखे यांचा पदग्रहण सोहळा टिळक भवनात पार पडला. मावळते अध्यक्ष आमीर शेख यांनी अध्यक्षपदाची सुत्रे साळुंके यांच्या हाती दिली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष वरूण चौधरी, माजी अध्यक्ष अमीर शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या रिसर्च विभागाच्या लेनी जाधव वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

‘कबुतर जिहाद’ भाजपा सरकारचेच पाप; लोढा व अदानी टॉवरमध्ये कबुतर प्लाझा उभा करा; हर्षवर्धन सपकाळ Read More »

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

stock market

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर

Stock Market : शेअर मार्केटच्या फसवणुकीतून सामान्य माणसांच्या पैसे बुडवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या नावावर मुंबईत खाते सुरू करून, त्या खात्यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपी कवडे यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जवळपास एक कोटी रुपयांची लाच ऑनलाइन घेतली अशी माहिती आहे. मयत व्यक्तीच्या नावाचे खाते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचे होते. पोलीसांनी बँकेतून ही रक्कम इतर ठिकाणी पाठवून, नंतर ती कॅश करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलीसाची नियंत्रण कक्षात बदली झाली असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरत आहे. शेवगाव-पाथर्डी परिसरात झालेल्या या घोटाळ्यात लोकांना जास्त परतावा मिळेल असे सांगून फसवले गेले. अंदाजे 1500 हजार ते 2000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यामुळे स्थानिक बाजारपेठेची परिस्थिती उध्वस्त झाली आहे. मी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्या होत्या, तेव्हा परिस्थिती खूपच भयानक होती. काहींनी जमीन विकून पैसे गुंतवले, काहींनी तर बँकेतून कर्ज काढले तर यामध्ये मोल मजुरी करणाऱ्या महिलांनीही पैसे लावलेले आहेत तर काही दोन्ही भांडे करणाऱ्या महिलांनी मुलांसाठी ठेवलेली रक्कमही या ठिकाणी गुंतवली आहे, काहींनी कुटुंबाचे राखीव पैसे घालून शेअरमध्ये गुंतवले, तर काहींनी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे पण वापरले. अनेक कुटुंबांना आज आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटाळ्याच्या काळात पोलीस केस न घेता पाहत राहिले, अक्षरशः लोंढेच्या लोंढे लोक पोलीस ठाण्यात येत होते, पण पोलीस का गप्प होते, हे उत्तर मला जवळपास वर्षभरांनी कळले. एकीकडे सामान्य कुटुंब संपत चालले आहेत, तर दुसरीकडे त्याच प्रकरणात पोलीस कोट्यावधी रुपयांची लाच घेत आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे “काय होणार यावर? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” स्थानिक कार्यकर्ते देखील ठाम आहेत. ते म्हणतात, “फक्त नियंत्रण कक्षात बदली करून काय होणार? अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे!” असा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. शेवगाव-पाथर्डीतील शेअर मार्केट घोटाळा प्रकरण आता केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आणी पोलीस प्रशासनाच्या जवाबदारीचा सत्यपरिक्षण बनले आहे.

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर Read More »

ration

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ

Maharashtra Politics : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना 53 हजार 910 रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र सरकारकडून 45 रुपये आणि राज्य सरकारकडून 105 रुपये असे एकूण क्विंटलमागे 150 रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे 20 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये (1700 रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92 कोटी 71 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ Read More »

maharashtra police requirement

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर

Maharashtra Police Requirment : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर Read More »