Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल
Raghuji Bhosle Sword : 18व्या शतकातील प्रसिद्ध मराठा सेनानी रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर मुंबईत दाखल झाली आहे. तब्बल दोन शतकांनंतर या अमूल्य वारशाचा परतावा होत असून, मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेची ही तलवार पुन्हा एकदा लोकांसमोर येणार आहे. या तलवारीचे मुंबईत मोठ्या जल्लोषात व कलात्मक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विविध कलासंस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तलवारीसोबतच भोसले घराण्याच्या वारशाशी संबंधित दुर्मीळ वस्तूंचा समावेश होता. इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या मते, रघूजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा प्रभाव विदर्भापासून मध्य भारतापर्यंत विस्तारला. त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ही तलवार आजही मराठ्यांच्या शौर्याचा दुर्मिळ पुरावा मानली जाते. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक व्याख्याने आणि प्रदर्शन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, मराठा इतिहास रसिकांसाठी हा उपक्रम एक अविस्मरणीय सोहळा ठरला.
Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल Read More »









