DNA मराठी

ट्रेंडिंग

navnath waghmare

Navnath Waghmare : मोठी बातमी, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कारला जाळण्याचा प्रयत्न

Navnath Waghmare : जालन्यातील निलम नगर परिसरात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली. ही आग जाळपोळीच्या उद्देशाने लावण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी वाघमारे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कदीम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रविवारी रात्री साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील निलम नगर येथील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गाडीजवळ एक संशयास्पद व्यक्ती आल्याचे दिसून आले, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी थेट जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर आरोप केले. “शनिवारी संध्याकाळपासून माझी गाडी घरासमोर झाकून ठेवलेली होती. मी दुसऱ्या गाडीने बाहेरगावी दौऱ्यावर होतो. रात्री जेवणानंतर मी गाडीपासून काही अंतरावर फिरायला गेलो असताना, दहा-पंधरा मिनिटांतच गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा झाला,” असे वाघमारे यांनी सांगितले. या घटनेसाठी जरांगे-पाटील यांच्या समर्थकांना पूर्णतः जबाबदार धरत वाघमारे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मी जरांगेसारखा भिकारचोट नाही. गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. आम्ही ठरवले आणि जरांगे यांच्या गाड्या आणि घरे जाळले तर चालेल का? परंतू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे निष्ठावान आहोत आणि असे कृत्य आम्ही करणार नाही.” याचवेळी वाघमारे यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. सध्या पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे जालन्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

Navnath Waghmare : मोठी बातमी, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कारला जाळण्याचा प्रयत्न Read More »

img 20250920 wa0023

Sawedi Plot Scam : अखेर ‘त्या’ प्रकरणात तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप जायभाय निलंबित

Sawedi Plot Scam : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. सावेडी येथील गट क्रमांक २४५ मधील जमीन फेरफार प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. अहवालानुसार, १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्ताअंतर्गत झालेल्या फेरफार प्रक्रियेत न्यायालयाचा आदेश नसताना ३४ वर्षांनंतर नोंद घेण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. सदर खरेदी दस्ताच्या गावदप्तरी फेरफार नोंदी करताना तत्कालीन सावेडी मंडल अधिकारी जायभाय यांनी संबंधित खरेदीदार-खरेदीदारांना लेखी कळवले नसल्याचे नमूद आहे. तसेच शेती जमीन खरेदी करताना खरेदीदाराचा शेतकरी पुरावा न घेता थेट नोंद करण्यात आल्याची बाब उघड झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून, तत्कालीन सावेड मंडळाधिकारी दिलीप जायभाय यांना तत्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Sawedi Plot Scam : अखेर ‘त्या’ प्रकरणात तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप जायभाय निलंबित Read More »

team india

IND vs OMAN : पैसा वसूल, भारताचा रोमांचक सामन्यात 21 धावांनी विजय

IND vs OMAN : भारताने आशिया कप 2025 च्या ग्रुप सामन्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 21 धावांनी जिंकला आहे. ओमानविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत आठ विकेट्स गमावत 188 धावा केल्या. संजू सॅमसनने 56, अभिषेक शर्माने 38, तिलक वर्मा 29, अक्षर पटेल 26, हर्षित राणा 13 नाबाद, शुभमन गिल 5, हार्दिक पंड्या 1, शिवम दुबे 5, अर्शदीप सिंग 1 आणि कुलदीप यादवने नाबाद 1 धावा केल्या. ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान 20 षटकात 4 गडी गमावून फक्त 167 धावाच करू शकला आणि सामना 21 धावांनी गमावला. आमिर कलीमने 64 धावांची शानदार खेळी केली. हम्माद मिर्झा यांनीही 51 धावा केल्या. मात्र, या दोन दमदार खेळी असूनही ओमान जिंकू शकला नाही. ओमानकडून जतिंदर सिंगने 32, जिकरिया इस्लामने 0, विनायक शुक्ला 1 आणि जितेन रामनंदीने 12 धावा केल्या. मात्र, ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तथापि, अर्शदीप सिंगने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या.

IND vs OMAN : पैसा वसूल, भारताचा रोमांचक सामन्यात 21 धावांनी विजय Read More »

rain

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी

IMD Rain Alert: नगर जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांना याचा फटका देखील बसला आहे. शेतकऱ्यांना लाखोंचा नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या घरात पाणी साचले आहे. यातच आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत.जनावरे व शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावे. मेघगर्जना होताना झाडाखाली/टॉवरजवळ थांबू नये. पर्यटनासाठी धरणे व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याची सूचना देखील हवामान विभागाने नागरिकांना दिली आहे. याच बरोबर आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष टोल-फ्री 1077 0241-2323844 / 2356940 या नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

IMD Rain Alert: नगरकर सावधान, 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी Read More »

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे

Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेत अनेकांनी चुकीच्या मार्गाने फायदा घेतल्याने आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत शासकीय पोर्टलवर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे. याचबरोबर केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे Read More »

chhagan bhujbal

Chhagan Bhujbal: हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही, छगन भुजबळ असं का म्हणाले?

Chhagan Bhujbal: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना पक्षावर टिका होणार… हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. निवडणुकीत उतरताना आपल्या कार्यकर्त्यांकडे विषय असला पाहिजे. फक्त पक्षाचे लेबल उपयोगी पडणार नाही त्यासाठी झटून काम करावे लागणार आहे. पक्ष सोबत असेलच असे स्पष्ट करतानाच पक्षावर टिका होणार… हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही असे आत्मविश्वास निर्माण करणारे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे असून धाडसी व ठोस निर्णय घ्यायचे आहे. आजच्या चिंतन शिबिरातून आराखडा तयार करणार आहोत त्याला नागपूर डिक्लेरेशन म्हणून मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंतन शिबिरात दिली. लोकांना विश्वास देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे असून लोकशाही – न्याय – समता या विचारावर आज शिबिर होत आहे. अनेक वर्षे समाजकारण, राजकारण करणारे लोक उपस्थित आहेत. सर्वधर्मसमभाव मानणारा हा पक्ष आहे. शिव – शाहू – फुले- आंबेडकर यांची विचारधारा घेऊन काम करत आहोत असेही विचार अजित पवार यांनी मांडले. पक्षाच्यावतीने बुथ, जनसंवाद, रोजगार शिबिरे घेणार आहोत. त्यावेळी पक्ष लोकांच्याजवळ राहणार आहोत. सत्ता किंवा पदासाठी आम्ही पाऊल उचलले नव्हती तर राज्याची प्रगती व्हावी… ठोस निर्णय घेता यावा या हाकेला ओ दिली आणि आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनेत्राताई पवार,कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आदींसह पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Chhagan Bhujbal: हल्ले होणार… पण घाबरून मागे हटून चालणार नाही, छगन भुजबळ असं का म्हणाले? Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi on Election Comission : ब्लॉक, ब्लॉक, ब्लॉक … ‘मतदार चोरी’ वरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक

Rahul Gandhi on Election Comission : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतदारांचे नाव ऑनलाईन पद्धतीने डिलीट करण्याच्या आरोप केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या अलांड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याच्या चौकशीला जाणीवपूर्वक थांबवले जात असल्याचा देखील आरोप केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पारदर्शकता टाळत आहे आणि विरोधी मतदारांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की अ‍ॅक्समधील काँग्रेस उमेदवाराने फसवणूक उघड केल्यानंतर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सीआयडी तपास थांबवला. ते म्हणाले की कर्नाटक सीआयडीने गेल्या 18 महिन्यांत आवश्यक पुरावे मागण्यासाठी 18 पत्रे पाठवली, परंतु प्रत्येक वेळी सीईसीने तपास रोखला. 6,018 मते वगळण्याचा आरोप राहुल गांधी म्हणाले की जर ही कथित “मतचोरी” वेळेत उघड झाली नसती तर या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार हरला असता. त्यांनी सांगितले की एकूण 6,018 मते हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारला आणि आरोप केला की डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्स यासारखी महत्त्वाची तांत्रिक माहिती जाणूनबुजून रोखण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व पुरावे कर्नाटक सीआयडीकडे तात्काळ सोपवावेत. निवडणूक आयोगाचा प्रतिहल्ला निवडणूक आयोगानेही राहुल गांधींच्या आरोपांना तात्काळ उत्तर दिले. #ECIFactCheck या टॅगसह त्यांच्या अधिकृत खात्यावरून एका पोस्टमध्ये, आयोगाने गांधींचे दावे “खोटे आणि निराधार” असल्याचे फेटाळून लावले. आयोगाने म्हटले आहे की मतदारांची नावे कोणत्याही खाजगी नागरिकाद्वारे ऑनलाइन हटवता येत नाहीत आणि अशी कोणतीही तरतूद नाही. आयोगाच्या मते, 2023 मध्ये अलांड विधानसभा मतदारसंघात नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, त्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्याने एफआयआर दाखल केला होता. अलांड मतदारसंघाचे निवडणूक निकाल आयोगाने स्पष्ट केले की अलांड मतदारसंघ 2018 मध्ये भाजपचे सुभध गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर बी.आर. 2023 मध्ये काँग्रेसचे पाटील विजयी झाले. आयोगाने सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे 6 सप्टेंबर 2023 रोजी कलबुर्गी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आली. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निवेदन कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाने म्हटले आहे की या प्रकरणात मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे संबंधित तपास संस्थांना आधीच पाठवण्यात आली आहेत. त्यांनी म्हटले आहे की मतदार यादीतून नावे वगळण्याच्या कथित कटाबद्दलचा एफआयआर निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (ईआरओ) दाखल केला आहे. सीईओ कार्यालयाने म्हटले आहे की ते तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कोणतीही माहिती रोखण्यात आलेली नाही. राहुल गांधी आक्रमक भूमिकेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकशाही संस्था कमकुवत करण्याचा आणि विरोधी मतदारांना लक्ष्य करण्याचा आरोप केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा असा दावा आहे की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती आणि कोणतीही अनियमितता झाली नाही. या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi on Election Comission : ब्लॉक, ब्लॉक, ब्लॉक … ‘मतदार चोरी’ वरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक Read More »

ram shinde

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी

Ram Shinde: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामस्थांना संवाद साधताना शिंदे म्हणाले, “ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.” “ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी Read More »

devendra fadnavis

Ahilyanagar News : आठ महिन्यात 22 हजार जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण; विद्यार्थी व अर्जदारांना दिलासा

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत २२ हजार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली आहेत. समितीच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्याना व अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सुयोग्य व्यवस्थापन यामुळे प्रमाणपत्रांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, त्रुटी पूर्तता शिबिरे, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. यामध्ये आता १७ सप्‍टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या समितीमध्ये अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) रेश्मा माळी, सदस्य तथा उपायुक्त राकेश पाटील, व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांची त्रिस्तरीय समिती जातवैधता पडताळणीचे काम जलद गतीने करत आहे. त्यामुळेच १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण २५ हजार २७९ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी २२ हजार ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जात (SC) वर्गातील ३ हजार १५१ पैकी २ हजार ८५८, विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJNT) वर्गातील ५ हजार १३० पैकी ४ हजार २८७, इतर मागासवर्गीय (OBC) वर्गातील १४ हजार ३०८ पैकी १२ हजार ६८६, विशेष मागासवर्गीय (SBC) वर्गातील ८२० पैकी ६४३, तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) वर्गातील १ हजार ८७० पैकी १ हजार ५३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अर्जदार स्तरावर त्रुटी पूर्ततेसाठी १ हजार ५७७ प्रकरणे प्रलंबित असून १ हजार ६९६ प्रकरणे निर्णय प्रक्रीयेत आहेत. सद्यस्थितीत जिल्हा समिती परिपुर्ण जातदाव्याच्या प्रकरणांवर ३५ ते ४० दिवसांच्या आत निर्णय घेत आहे. ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाबत ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या असून अर्जदारांनी त्रुटी पुर्ततेची कागदपत्रे प्रत्यक्ष समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात समक्ष जमा केल्यानंतर सदर जातदाव्याचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही केली जात आहे. अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, जातदाव्याचे प्रकरण दाखल करतांना अर्जदारांनी विहित नमुन्यात नमुना 3 आणि नमुना १७ चे शपथपत्र कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावा. मोडीभाषेतील पुरावे शासन मान्यता प्राप्त मोडी लिपी वाचकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावे. साध्या पेपरवर टंकलिखीत केलेले शपथपत्र देखील समिती ग्राह्य धरत असल्यामुळे शपथपत्रासाठी स्टँम्प पेपरची आवश्यकता नाही. अर्जात नमूद केलेल्या वंशावळ शपथपत्रानूसार महसुली व शालेय पुराव्यांच्या प्रमाणित प्रती अर्जदाराने प्रस्तावासोबत उपलब्ध करुन दिल्यास संबंधित प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येते. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित अर्जदार व पालकांना आवाहन करण्यात येते की, सन 2025-2026 या वर्षाअखेरीस CET व्दारे प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदारांनी वेळेवर धावपळ करण्याऐवजी तात्काळ महाविद्यालयांमार्फत प्रकरणे समिती कार्यालयाकडे जमा करावीत, जेणेकरुन व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी समितीवर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन अर्जदारांना देखील वेळेत जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करणे सुलभ होईल. महाविद्यालयांना सूचना महाविद्यालयांनी जातदावा प्रकरणांसाठी विहीत फार्म नंबर १५ A वर महाविद्यालय प्राचार्यांची सही व शिक्यासह देण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमावा. विद्यार्थ्यांना जातदाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. समितीच्या वतीने दिलेल्या सुचना व माहिती पत्रकांची १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन सर्व पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज जमा करुन घ्यावे. जेणेकरुन १२ वी विज्ञान अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना व पालकांना पुढील शैक्षणिक हित साध्य करणे सुलभ होईल. ही कागदपत्रे जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज, प्राचार्यांची स्वाक्षरी असलेला फॉर्म 15 A व महाविद्यालयाचे चालु वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, अर्जदार, वडील, आजोबा यांचे शालेय दाखले/ जातीविषयक महसुली पुरावे, जातदाव्यासाठी निश्चित केलेला मानीव दिनांकापुर्वीची कागदपत्रे, ज्यामध्ये अनुसूचित जाती करीता सन 1950, विजाभज साठी सन 1961, इमाव व विमाप्र करीता सन १९६७ पुर्वीचे जातनोंदी असलेले अहिल्यानगर जिल्ह्रयातील पुरावे, मोडी भाषेतील पुरावे असल्यास मोडी लिपीवाचकाकडून लिप्यांतर केलेले नोंदणीकृत शपथपत्र, वारसनोंदीसाठी 7/12 उतारे, फेरफार किंवा कडईपत्रक उतारे, नमुना 3 व नमुना 17 चे नोंदणीकृत मुळ शपथपत्र, जात पडताळणी ऑनलाईन अर्जासाठी भरावे लागणारे ऑनलाईन शुल्क जात वैधता पडताळणीच्या शैक्षणिक प्रकरणासाठी शुल्क १०० रुपये, सेवाविषयक व निवडणूक कामासाठी ५०० रुपये शुल्क ऑनलाईन भरुन त्याची पावती व ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांचा सर्व जातीविषयक पुराव्यांची कागदपत्रे प्रस्तावासोबत समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. जातवैधता पडताळणीसाठी परिपूर्ण कागदपत्रे जमा केल्यास विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळते.

Ahilyanagar News : आठ महिन्यात 22 हजार जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण; विद्यार्थी व अर्जदारांना दिलासा Read More »

satara crime

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार

Satara Crime: शिरवळ (ता. खंडाळा) येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळ्या झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला. एक गोळी हाताला चाटून गेल्याने रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा जखमी झाला आहे. मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली असून गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार शिरवळच्या विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रियाज शेख हा मित्रासोबत बोलत असताना दोघेजण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने पिस्तुलातून रियाजवर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी उजव्या हाताला लागून तो जखमी झाला. या थरारानंतर मुख्य रस्त्यावर पळापळ झाली. त्याचा फायदा घेऊन दोन्ही हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाले. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद गोळीबाराचा हा थरार एका सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना पूर्ववैमन्यातून झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. गोळीबाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. गोळीबारामुळे मुख्य रस्त्यावर पळापळ शिरवळच्या मुख्य रस्त्यावर सायंकाळी झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांची पळापळ झाली. गोळीबाराच्या घटनेवेळी शालेय विद्यार्थी घरी जात होते. त्याचचवेळी हा थरार घडला. सुदैवाने विद्यार्थी अथवा नागरिकांना गोळी लागली नाही. मात्र कायदा, सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्याची वेळ शिरवळकरांवर आली आहे. संशयित आरोपींची नावे कळली, तपास पथके रवाना झाली आहेत. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शिरवळ पोलीस तपास करत आहेत. जखमी तरुणाचा जबाब घेतला आहे. हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

Satara Crime: धक्कादायक तरुणावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार; हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार Read More »