DNA मराठी

ट्रेंडिंग

mahesh landge

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले

MLA Mahesh Landge : गोरक्षक धर्माचे रक्षण करीत आहे. गोमातेच्या संवर्धनासाठी काम करीत आहेत. गोरक्षकांवर खोटे केस करण्याचा प्रयत्न कुणी केला. तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गोरक्षण करणे म्हणजे चिंचोका खेळणं नाही. चुकीच्या पद्धतीने काही लोक प्रशासनासमोर गोरक्षकांबाबत मांडणी करीत आहेत. त्यांनी एकदा गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करावा, म्हणजे गोरक्षण काय आहे, हे तुम्हाला समजेल, अशी खणखणीत भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडली. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधी येथील अतिक्रमण हटवण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित हिंदूत्ववादी जनसमुदायाला संबोधित करताना आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी गोरक्षकांबाबत चुकीची मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी ‘‘गोरक्षकांना आवर घाला…’’ अशा सूचना पोलिस प्रशासनाला केल्या. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववादी संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजाची सूर आहे. हिंदूत्ववादी सरकार असतानाही गोरक्षकांवर बंदी घालण्याची भूमिका घेतली जात आहे, अशी खंत गोरक्षकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, इंदापूरच्या मोर्चामध्ये आमदार लांडगे यांनी ‘‘गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे..’’ असे वक्तव्य केल्यामुळे गोसंवर्धन आणि गोरक्षकांच्या मुद्यावरुन दोन ‘दादा’ पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत, असे चित्र आहे. एखादा जिहादी, कोणी कुरेशी जातो आणि सांगतो..‘‘गोरक्षक आमचे नुकसान करतात’’. त्यांना काय अडचण आहे. जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने आम्ही बंद केले आहेत. गोमातेचे आम्ही रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा कोणी करु नये. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतर खपवून घेणार नाही. भाजपा महायुती हिंदूत्ववादी सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही. असं देखील यावेळी भाजप आमदार महेश लांडगे म्हणाले.

गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे! आमदार Mahesh Landge यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे सुनावले Read More »

Crime

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी

Crime News : शेअर बाजारात झालेल्या नुकसानात घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना वसई येथे समोर आली आहे. ज्योती मोहन भानुशाली, 27 असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली आहे. तिच्याकडून तब्बल दीड करोड चे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकले आहेत. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ओधवजी खिमजी भानुशाली,66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे. मला मदत करा असं सांगून घरात घुसला. त्यांनी आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतलं आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूम मध्ये जायचं असं सांगून वॉशरूम मध्ये गेला आणि तुमचं बाथरूम लिकेज झाला आहे. असं सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूम मध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता त्या सीसीटीव्ही मध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि ज्योती मोहन भानुशाली, 27 हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड करोड चे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहिले असल्याची माहिती मदन बल्लाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी दिली.

Crime News : धक्कादायक, गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी, सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी Read More »

stock market

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर

Stock Market : शेअर मार्केटच्या फसवणुकीतून सामान्य माणसांच्या पैसे बुडवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या नावावर मुंबईत खाते सुरू करून, त्या खात्यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपी कवडे यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी जवळपास एक कोटी रुपयांची लाच ऑनलाइन घेतली अशी माहिती आहे. मयत व्यक्तीच्या नावाचे खाते त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळच्या व्यक्तीचे होते. पोलीसांनी बँकेतून ही रक्कम इतर ठिकाणी पाठवून, नंतर ती कॅश करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलीसाची नियंत्रण कक्षात बदली झाली असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरत आहे. शेवगाव-पाथर्डी परिसरात झालेल्या या घोटाळ्यात लोकांना जास्त परतावा मिळेल असे सांगून फसवले गेले. अंदाजे 1500 हजार ते 2000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यामुळे स्थानिक बाजारपेठेची परिस्थिती उध्वस्त झाली आहे. मी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्या होत्या, तेव्हा परिस्थिती खूपच भयानक होती. काहींनी जमीन विकून पैसे गुंतवले, काहींनी तर बँकेतून कर्ज काढले तर यामध्ये मोल मजुरी करणाऱ्या महिलांनीही पैसे लावलेले आहेत तर काही दोन्ही भांडे करणाऱ्या महिलांनी मुलांसाठी ठेवलेली रक्कमही या ठिकाणी गुंतवली आहे, काहींनी कुटुंबाचे राखीव पैसे घालून शेअरमध्ये गुंतवले, तर काहींनी मुलांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे पण वापरले. अनेक कुटुंबांना आज आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटाळ्याच्या काळात पोलीस केस न घेता पाहत राहिले, अक्षरशः लोंढेच्या लोंढे लोक पोलीस ठाण्यात येत होते, पण पोलीस का गप्प होते, हे उत्तर मला जवळपास वर्षभरांनी कळले. एकीकडे सामान्य कुटुंब संपत चालले आहेत, तर दुसरीकडे त्याच प्रकरणात पोलीस कोट्यावधी रुपयांची लाच घेत आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे “काय होणार यावर? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” स्थानिक कार्यकर्ते देखील ठाम आहेत. ते म्हणतात, “फक्त नियंत्रण कक्षात बदली करून काय होणार? अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे!” असा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. शेवगाव-पाथर्डीतील शेअर मार्केट घोटाळा प्रकरण आता केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक आणी पोलीस प्रशासनाच्या जवाबदारीचा सत्यपरिक्षण बनले आहे.

शेवगाव शेअर घोटाळा प्रकरण: कोट्यावधीची online लाच उघडकीस, कुटुंब आत्महत्येच्या कड्यावर Read More »

ration

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ

Maharashtra Politics : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना 53 हजार 910 रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र सरकारकडून 45 रुपये आणि राज्य सरकारकडून 105 रुपये असे एकूण क्विंटलमागे 150 रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे 20 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये (1700 रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92 कोटी 71 लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! राज्यातील स्वस्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ Read More »

maharashtra police requirement

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर

Maharashtra Police Requirment : महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार आहेत. 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – 10 हजार 908, पोलीस शिपाई चालक – 234, बॅण्डस् मॅन – 25, सशस्त्री पोलीस शिपाई – 2 हजार 393, कारागृह शिपाई – 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

Maharashtra Police Requirment : पोलीस दलात 15 हजार पदांची मेगा भरती; लेखी परीक्षेसाठी होणार OMR प्रणालीचा वापर Read More »

raj uddhavs historic reunion mns shiv sena ubt alliance for best patpedi elections

“राज–उद्धव युती; BEST पाटपेडीत ऐतिहासिक क्षण”

मुंबई | प्रतिनिधी –राज – उद्धव – महाराष्ट्राच्या राजकीय पटावर नवा अध्याय लिहिला जात असल्याची चिन्हे दिसू लागले आहेत. दीर्घकाळाच्या वैचारिक व संघटनात्मक फाटाफुटीनंतर ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – प्रथमच एकाच व्यासपीठावर आले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी ‘BEST पाटपेडी’ निवडणुकीसाठी युती जाहीर केली आहे. या अनपेक्षित निर्णयाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्थानिक स्तरावरील निवडणूक असली तरी, ठाकरे बंधूंचे पुनर्मिलन हा व्यापक राजकीय संकेत मानला जात आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या दोन दशकांत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांमध्ये अनेक चढउतार झाले. २००६ मध्ये शिवसेनेतून वेगळे होत राज ठाकरेंनी MNS स्थापन केली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा आणि शब्दयुद्ध रंगत असे. त्यामुळे या निवडणुकीतली युती हा केवळ संघटनात्मक करार नसून, ‘जुन्या जखमांवर फुंकर घालण्याचा’ प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ‘BEST पाटपेडी’च्या निवडणुकीत या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “हा पहिला पाऊल आहे, पुढे मोठ्या निवडणुकीसाठीही आपण विचार करू,” असे दोन्ही नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी संकेत दिले आहेत. या युतीचे भविष्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय गोटांत रंगली आहे.

“राज–उद्धव युती; BEST पाटपेडीत ऐतिहासिक क्षण” Read More »

more money in your pocket; 2% dearness allowance increase for government employees

DA Hike – खिशात येणार जादा रक्कम; सरकारी कर्मचार्‍यांना २% महंगाई भत्ता वाढ

मुंबई | प्रतिनिधी –DA Hike – स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा निर्णय घेतला आला आहे. महागाईच्या झळा सहन करत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा महंगाई भत्ता (DA) राज्य सरकारने तब्बल २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, हा लाभ १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पगारात वाढीव भत्ता जमा होणार असून, कर्मचाऱ्यांच्या खिशात काहीशे रुपये जास्त येणार आहेत. वाढती बाजारपेठ, रोजचे वाढणारे खर्च आणि घरगुती गरजांचा ताण यामध्ये ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासा ठरणार आहे. “सरकारने दिलेली ही छोटीशी का होईना, पण वेळेवर मिळालेली मदत आहे,” असे अनेक कर्मचारी संघटनांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या खजिन्यावर वार्षिक कोट्यवधी रुपयांचा भार पडणार असला तरी जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांत पेन्शनधारकांना दिलेल्या सुविधा, कर्जावरील सवलती यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर मिळालेला हा भत्तावाढीचा ‘गोड दिलासा’ नक्कीच स्मरणात राहील.

DA Hike – खिशात येणार जादा रक्कम; सरकारी कर्मचार्‍यांना २% महंगाई भत्ता वाढ Read More »

munmun dutta

Munmun Dutta : TMKOC ची बबिता जी सोशल मीडियावरून गायब; मुनमुन दत्तावर कोसळला संकटांचा डोंगर

Munmun Dutta: लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. कधी शो मुळे तर कधी आपल्या खाजगी आयुषामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत राहते. तिने बबिता जीच्या भूमिकेने मुनमुनने घराघरात आपली ओळख निर्माण केली. बबिता आणि जेठालालची जोडी सर्वांशी स्पर्धा करते. मुनमुन चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते मात्र गेल्या काही दिवसांपासून मुनमुन सोशल मीडियावर अँक्टिव नसल्याने तिच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून बबिताने इंस्टाग्रामवर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही स्टोरी पोस्ट केली नाही. आता अलीकडेच मुनमुन दत्ताने स्वतः तिच्या याबाबतचे कारण सांगितले आहे. मुनमुन दत्ताने पोस्ट शेअर करत लिहिले की ‘हो, मी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता आहे. माझी आई बरी नाही. गेल्या 10 दिवसांपासून मी रुग्णालयात ये- जा करत आहे. आईची आता प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच बरी होईल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन बिघडवत आहे. पण मला खूप साथ देणाऱ्या माझ्या अद्भुत मित्रांचे मी आभार मानते. देव महान आहे.’ हे जाणून चाहत्यांना मुनमुनबद्दल खूप वाईट वाटले. चाहते मुनमुन दत्ताच्या आई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. मुनमुनने तिच्या बंगाली सौंदर्याने लोकांची मने घायाळ केली. तर दुसरीकडे शोचे निर्माते असित मोदी यांनी दिशा वाकानीसोबत रक्षाबंधन साजरे केले. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी वर्षानुवर्षे पाहून चाहते थक्क झाले.

Munmun Dutta : TMKOC ची बबिता जी सोशल मीडियावरून गायब; मुनमुन दत्तावर कोसळला संकटांचा डोंगर Read More »

team india

Asia Cup 2025 जसप्रीत बुमराह खेळणार; ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा

Asia Cup 2025 : इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर आता भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेत भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. तर आता आशिया कप 2025 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. अहवालानुसार, जसप्रीत बुमराह देखील या स्पर्धेत खेळणार आहे आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी संघ निवडू शकते. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या हे पहिल्या पाचमध्ये मजबूत खेळाडू असल्याने निवड समिती या संघात फारसे बदल करू इच्छित नाही हे समजते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “अभिषेक शर्मा हा गेल्या आयसीसी रँकिंगमध्ये जगातील नंबर वन टी-20 फलंदाज आहे. संजू सॅमसनने गेल्या हंगामात फलंदाजी आणि यष्टीरक्षक दोन्ही बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे निर्णय घेणे कठीण होईल परंतु सध्याचा फॉर्म पाहता (कसोटीत जरी), शुभमनला दुर्लक्षित करता येणार नाही. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. निवडकर्त्यांसाठी समस्या अशी आहे की टॉप ऑर्डरमध्ये अनेक चांगले खेळाडू आहेत. जुरेल आणि जितेश यांच्यात स्पर्धा असेल टॉप ऑर्डरमध्ये इतके खेळाडू असल्याने, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांना स्थान मिळणे खूप कठीण जाईल. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक लोकेश राहुल, मधल्या फळीत फलंदाजी करत नसल्याने त्याचा विचार केला जाण्याची शक्यता नाही. सॅमसनची पहिली यष्टीरक्षक म्हणून निवड होणे जवळजवळ निश्चित असले तरी, दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा असेल. जुरेल गेल्या टी-20 मालिकेचा भाग होता तर जितेशने आयपीएलमध्ये आरसीबीच्या विजयी मोहिमेत प्रभावी कामगिरी केली. त्याने फिनिशरची भूमिकाही खूप चांगली बजावली. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून भारताची पहिली पसंती आहे, तर इंग्लंड मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डी वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. तसेच शिवम दुबे यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर हे संघातील इतर दोन फिरकी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असतील.

Asia Cup 2025 जसप्रीत बुमराह खेळणार; ‘या’ दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा Read More »

Supreme Court

Supreme Court On Bihar SIR: आज सर्वोच्च न्यायालयात Bihar एसआयआरवर महत्वाची सुनावणी, 65 लाख मतदारांवर होणार निर्णय?

Supreme Court On Bihar SIR: बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) च्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आज 12 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांचे खंडपीठा समोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी यापूर्वी 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता आणि निवडणूक आयोगाला हे काम पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतु असे असूनही, मतदार यादीतून लाखो नावे वगळण्याचा मुद्दा वादांनी वेढला आहे. निवडणूक सुधारणांशी संबंधित संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे ज्यामध्ये दावा केला आहे की या प्रक्रियेअंतर्गत, बिहारमधील सुमारे 65 लाख मतदारांची नावे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, प्रक्रिया नियमांनुसार उत्तरात निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी प्रकाशित करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. याशिवाय, आयोगाने स्पष्ट केले आहे की प्रारूप यादी सर्व राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली आहे आणि जर एखाद्या व्यक्तीचे नाव त्यात नसेल, तर त्याला आपला आक्षेप नोंदवण्याचा आणि संबंधित कागदपत्र सादर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आयोगाचा पलटवार, याचिका दिशाभूल करणाऱ्या निवडणूक आयोगाने याचिका फेटाळण्याची मागणी करताना याचिकाकर्त्यांना दंड ठोठावण्याची विनंतीही न्यायालयाला केली आहे. आयोगाचा आरोप आहे की या याचिका न्यायालयाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न आहेत आणि त्या गांभीर्याने घेऊ नयेत. आयोगाने असाही युक्तिवाद केला की याचिकाकर्ते मतदारांच्या नावांची यादी वगळण्याची योग्य मागणी करू शकत नाहीत कारण अशी कोणतीही प्रक्रिया कायदेशीररित्या बंधनकारक नाही. लोकशाही प्रक्रियेत उद्भवणारे प्रश्न बिहारमधील मतदार यादीशी संबंधित या वादामुळे केवळ निवडणुकीच्या राजकारणालाच नव्हे तर घटनात्मक आणि कायदेशीर चर्चांनाही जन्म मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत, एसआयआरची प्रक्रिया पारदर्शक आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकते की त्यात खरोखरच व्यापक सुधारणांची आवश्यकता आहे. हे प्रकरण केवळ बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात लोकशाही प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबत एक महत्त्वाचे उदाहरण बनू शकते.

Supreme Court On Bihar SIR: आज सर्वोच्च न्यायालयात Bihar एसआयआरवर महत्वाची सुनावणी, 65 लाख मतदारांवर होणार निर्णय? Read More »