DNA मराठी

शेती

‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम; हर्षवर्धन सपकाळांची ठीक

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून पक्ष व चिन्ह गुजरातच्या मालकाने शिंदेंना दिले व मुख्यमंत्रीपदी बसवले त्या शिंदेच्या तोंडून मोदी शाह स्तुती करणे समजू शकतो पण आपल्या गुजराती मालकाला खूष करण्यासाठी चक्क जय गुजरात म्हणावे एवढी लाचारी बरी नव्हे. अमित शाह यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. महाराष्ट्राच्या सत्तेत एकापेक्षा एक नमुने बसलेत हे पुन्हा एकदा दिसले. एकनाथ शिंदे गुजरातचे नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडला का ? असा सवाल करत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मुंबई व महाराष्ट्र विकून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम शिंदे करत आहेत. मागील 11 वर्षात महाराष्ट्रातील उद्योग, संस्था, कार्पोरेट ऑफिसेस आणि कोट्यवधी निधी हा फडणवीस आणि शिंदेंमुळेच गुजरामध्ये जात आहेत. वेदांता फॅाक्सकॅान सारखे मोठे प्रकल्प ज्यामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला पाठवून दिला. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना रोजगार नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, कुपोषण वाढले आहे पण सत्तेतील हे लाचार गुजरातची गुलामी करण्यात व्यस्त आहेत. अशा महाराष्ट्रद्रोह्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम; हर्षवर्धन सपकाळांची ठीक Read More »

land Scam Sawedi “35 वर्षांची नोंदणी, 35 वर्षांचा प्रश्न!”

land Scam Sawedi अहिल्यानगर – Sawedi Land Scam एखादी गोष्ट इतकी अशक्य वाटावी की ती काल्पनिक वाटावी, पण जेव्हा ती सत्यात उतरते, तेव्हा प्रशासकीय व्यवस्थेचा गळक्या भिंती अधिक ठळकपणे समोर येतात. सावेडी येथील सर्व्हे नंबर 245/ब 1 आणि 245/ब 2 या एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीवर 1991 मध्ये खरेदीखत दाखवले गेले. मात्र त्याचे नोंदणी दस्ताऐवज 2025 मध्ये, तब्बल 35 वर्षांनी उगम पावतात – हा योगायोग नसून ठरवून केलेला दुर्दैवी ‘प्रयोग’ आहे, आणि या मागील यंत्रणांची मूक सहमती अधिकच धक्कादायक आहे. 1992 मध्ये गटाचे विभाजन होतो, पण एक वर्ष आधीच्या म्हणजे 1991 च्या गट क्रमांकाने खरेदी दाखवणे ही कायदेशीर अशक्यता आहे. परंतु हे अशक्य शक्य झाले — आणि हे शक्य होण्यामागे नोंदणी कार्यालयातील भ्रष्टतंत्राचे दडपण आहे. दस्तावेज कधी तयार झाले? त्या वेळी गट अस्तित्वातच नव्हता! तरीही ते मान्य केले गेले. ही चुकीची आणि खोटी कागदपत्रे स्वीकारणारे अधिकारी कुठल्या दबावाखाली होते? कि पैसा ? यात आणखी चिंतेची बाब म्हणजे — ज्या अधिकार्‍यांनी ही नोंदणी केली, त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. खरेदीखताचा आधार खोटा आहे, असा संशय व्यक्त होऊनही, प्रशासनातील काही मंडळी त्याच धर्तीवर मागील तारखेचा अर्ज घेऊन ते नियमात कसे बसवता येईल यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ते नियमित करण्दयासाठी राजकीय किवा पैशाचा दबाव अनु शकतात.कारण  याचा अर्थ फक्त हीच जमीन नाही, तर याआधीही अनेक अशा जमिनी गिळंकृत करण्यात आल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रश्न असा आहे की, या सर्व प्रकारनांनवर वरिष्ठ अधिकारी गप्प का आहेत?  मग प्रश्न असा पडतो वरिष्ठ अधिकऱ्यांची याला  त्यांची सहमती समजायची का? लोकशाहीत प्रशासन जबाबदार असतं. पण जेव्हा प्रशासनच स्वतःच्या चुकांची ढाल घेऊन उभं राहतं, तेव्हा जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास ढासळतो. ही केवळ एक प्रकरण नाही, हे एक ढासळलेल्या व्यवस्थेचं लक्षण आहे. आणि जर आज या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा बनावट दस्तावेजांच्या आधारावर भविष्यात आणखी जमिनी हडप केल्या जातील. लोकशाही व्यवस्था ही पारदर्शकता, कायदा आणि जनहितावर आधारलेली असावी लागते. मात्र येथे कायदाच गुंतवला जातोय, पारदर्शकतेला काळोखे पांघरून घातले जाते, आणि जनहिताला पायदळी तुडवले जात आहे. आता वेळ आली आहे की जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून या भ्रष्ट साखळीला रोखावं — अन्यथा ही जमीन कुणाच्या नावावर गेली यापेक्षा विश्वास कुणाच्या हातून गमावला गेला हे अधिक महत्वाचं ठरेल.

land Scam Sawedi “35 वर्षांची नोंदणी, 35 वर्षांचा प्रश्न!” Read More »

आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना…, अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar: आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना शेतकर्‍यांच्या नावावर राजकारण करायचे आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची सरकारची तयारी अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करणार्‍या आणि गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना खडेबोल सुनावले. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे यामध्ये सरकारचे दुमत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे, शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार पाडेल असेही स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळवाट काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे असेही अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे आणि राहणार आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेती ही आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.

आम्हाला शेतकऱ्यांची जाणीव आणि कणव आहे पण विरोधकांना…, अजित पवारांचा हल्लाबोल Read More »

राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना 10 लाख रुपयांची मदत द्या, विजय वडेट्टीवारांची

Vijay Wadettiwar: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन मध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले.

राज्यात वीज पडून मृत झालेले शेतकरी, शेतमजूर यांना 10 लाख रुपयांची मदत द्या, विजय वडेट्टीवारांची Read More »

land Scam Sawedi सावेडी जमीन घोटाळा : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लोटांगण आणि वरिष्ठांची गुप्त कृपा?

land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सावेडीतील जमीन घोटाळा नोंदणीच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली असतानाच या घोटाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाय धरून “आम्हाला वाचवा” अशी गाऱ्हाणी केली आहे. लाज न शरम! जे अधिकारी स्वतःच्या भ्रष्ट कारभाराने जनतेचा विश्वासघात करत आहेत, तेच आता प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायांवर लोटांगण घालत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. वरिष्ठांचे छत्र — भ्रष्ट अधिकाऱ्यांचे बिनधास्त कारनामेया प्रकरणातच नाही, तर यापूर्वीही ह्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी वरिष्ठांकडून आश्वासन मिळवले होते. त्या आश्वासनाची पूर्तता अजूनही सुरूच आहे आणि आता नव्याने उघडकीस आलेल्या या घोटाळ्यासाठीही त्यांना वाचवण्याचा शब्द मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासन हेच भूमाफियांना आणि त्यांच्या साथीदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 35 वर्षांनंतर नोंदणीचा खेळ — भूमाफियांना मोकळे रान सावेडीच्या सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर) या एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीची नोंदणी 35 वर्षांनी उगम पावली, आणि तिच्यामागील काळजीपूर्वक आखलेला भ्रष्ट कारभार उघड झाला. गटाचे विभाजन 1992 मध्ये झाले, पण 1991 मध्येच गट 245/ब 2 च्या नावाने खरेदीखत दाखवले गेले! अशक्य गोष्ट सहज शक्य करण्यात आली — आणि याचे मूळ मुळात नोंदणी कार्यालयातील सडलेल्या व्यवस्थेत आहे. प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातप्रशासनाने या प्रकरणात त्वरित कारवाई केली असती, तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेचा संताप उफाळून आला नसता. परंतु, हेच अधिकारी आणि भूमाफिया यांच्या साटेलोट्याला छुपे पाठबळ दिल्याचा आरोप सध्या जोर धरत आहे. जनतेचा एकच नारा — दोषींवर कारवाई करा!सावेडीतील सामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच आता एका सुरात म्हणत आहेत – “दोषींवर कठोर कारवाई करा, भूमाफियांना आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई झाली पाहिजे!”जर प्रशासनाने आता पावले उचलली नाहीत, तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित! आणि त्या वेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ढालही त्यांना वाचवू शकणार नाही.

land Scam Sawedi सावेडी जमीन घोटाळा : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लोटांगण आणि वरिष्ठांची गुप्त कृपा? Read More »

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट

Maharashtra Rain Alert: 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. 1 जून ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे. 22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही. अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

रखडलेल्या मान्सूनचा प्रवास राज्यात पुन्हा सुरु; जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Maharashtra Wheather Update :  राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शविली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने (IMD) आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे आणि आसपासच्या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रात्री उशिरापासून अधूनमधून पाऊस सुरू आहे,  यासोबतच, आज दुपारी 3.30 वाजता समुद्रात 4.31 मीटर उंचीची भरती येईल, ज्यामुळे या काळात 14 फूट उंच लाटा उसळतील. मान्सून लवकर आला मुंबईत पुन्हा पावसाने वेग घेतला आहे. शनिवारी रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे हवामान आल्हाददायक तर झालेच, शिवाय तापमानातही घट झाली आहे, ज्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उपनगरांचे तापमान 30.9 अंशांपर्यंत आणि शहराचे तापमान 28 अंशांपर्यंत खाली आले आहे. या आठवड्यात शहरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनने 26 मे रोजी दार ठोठावून हवामानाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला, कारण गेल्या 69 वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर आला. तथापि, सुरुवातीच्या दोन दिवसांच्या पावसानंतर त्याचा वेग मंदावला होता, परंतु आता ढग पुन्हा सक्रिय झाले आहेत. 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या मते, सोमाली जेट स्ट्रीम सक्रिय झाला आहे, जो भारतीय उपखंडात मान्सूनला चालना देत आहे. सोमालियाहून अरबी समुद्रातून भारतात जलदगतीने वाहणारा हा प्रवाह आणि नैऋत्य मान्सूनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्या प्रभावामुळे 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, 15 दिवसांच्या अंतरानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या मुंबईत चांगला पाऊस पडत आहे आणि हा टप्पा या आठवड्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.

राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट Read More »

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील बोल्हेगाव मिळकती एकत्र करून तयार करण्यात आलेल्या एकूण २४३२०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या जमिनीला मा. तहसीलदारांनी रहिवासी वापरासाठी अकृषिक वापराची परवानगी दिली होती. मात्र, यामधील केवळ स.नं. ३४/३ या मिळकतीसाठी स्वतंत्र खरेदीखत करताना ती शेती म्हणून नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. हे खरेदीखत करताना संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशासकीय प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रहिवासी वापरासाठी आधीच अकृषिक परवानगी मिळालेल्या जमिनींपैकी एक भाग पुन्हा शेती दाखवून खरेदी केल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणात शासकीय नियमबाह्य व्यवहार झाल्याचे स्पष्ट असून, महसूल विभागाने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सरकारी महसुलात घोटाळा होऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बोल्हेगावमध्ये बिनशेती जमीन शेती दाखवून विक्री? शासनाचा लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप Read More »

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश

Monsoon 2025 : राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठी, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीष महाजन, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा व युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री निलेश राणे उपस्थित होते. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून 19 कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश देण्यात येत आहेत. त्यावरून 19 कोटी 22 लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे सेठी यांनी सांगितले. राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा अकरा टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाली आहे, तथापि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.

नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा; CM फडणविसांचे आदेश Read More »

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert: जिल्ह्यात 28 मेपर्यंत वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात भिमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भिमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. तसेच अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाटरस्त्याने शक्यतो प्रवास करणे टाळावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरकरांनो, जिल्ह्यासाठी यलो अलर्ट; 28 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा Read More »