DNA मराठी

शेती

fb img 1758080430876

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Vikhe Patil: अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपीके, फळपीके, बंधारे, रस्ते, घरे, ओढे पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांसमवेत संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला. नुकसानीची माहिती घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उप विभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, सायली पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे तसेच अक्षय कर्डीले यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पुलाची तसेच ग्रामस्थांच्या घराची, किराणा दुकानाची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली. मौजे देवराई, मौजे तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेवगाव तालुक्यातील मौजे अमरापूरकर व परिसरातील नुकसानीची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेवगाव येथे नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे लेखी निवेदन स्वीकारली. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. मागील अनेक वर्षात झाला नाही एवढा पाऊस या भागामध्ये झाला आहे. पावसामुळे नाले, ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे. नागरिकांच्या घरांची, दुकानांचे तसेच शेतपिकांची मोठी हानी झाली आहे. या पावसामुळे साधारणपणे १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे, असेही त्यांनी सांगितले. पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज पुरेशा प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या नागरिकांची घरे संपूर्ण उध्वस्त झाली असतील अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर उभारणीसाठी मदत करण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत देण्यात येईल तसेच अधिकाधिक मदत व पुनर्वसनासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील Read More »

Ahilyanagar IMD Alert: नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी; जाणून घ्या सर्वकाही

Ahilyanagar IMD Alert : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून १००० क्युसेक, घोड धरणातून ८००० क्युसेक, सीना धरणातून १५०१ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ११० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सूचना मेघगर्जना होत असताना झाडाखाली, टॉवर, ध्वजांचे खांब किंवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. पाण्याने भरलेले पूल ओलांडू नयेत. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके झाकून घ्यावे. जनावरांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करावे. पर्यटनासाठी धरणे, नद्या व धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ahilyanagar IMD Alert: नगर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस; ‘यलो अलर्ट’ जारी; जाणून घ्या सर्वकाही Read More »

Maharashtra Politics: उद्योगांसाठी बळी देऊ नका, अन्यथा…, राज्यात शेतकरी आक्रमक; केंद्र सरकारला दिला इशारा

Maharashtra Politics: राज्यात गेल्याकाही दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातच अमेरिकेने वाढवलेले शुल्क आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या अस्पष्ट धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य आणि शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना गंभीर उपजीविकेच्या संकटाला सामोरे जावे लागेल. आयात शुल्क कमी करण्यास विरोध जावंधिया म्हणाले की, सरकारने अलीकडेच कापसावरील आयात शुल्क ११ % वरून शून्य केले आहे, जेणेकरून कापड उद्योगाला अमेरिकेच्या शुल्कातून दिलासा मिळू शकेल. परंतु याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. परदेशी कापूस भारतात ५०,०००-५१,००० प्रति कँडी (३५५.६ किलो) दराने येत आहे. परिणामी, देशांतर्गत कापसाचे दर घसरत आहेत आणि विदर्भातील शेतकऱ्यांना (देशाच्या कापूस उत्पादनाच्या ३०% उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या) ७,०००-७,५०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. लांब जातीसाठी किमान आधारभूत किंमत ₹८,११० आणि मध्यम जातीसाठी ₹७,७१० प्रति क्विंटल निश्चित केली आहे. शेतकऱ्यांचा नेहमीच बळी जवंधिया यांचा आरोप आहे की सरकार वारंवार उद्योग आणि ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेते आणि शेतकऱ्यांचा बळी देते. ते म्हणाले, “हे खूप अन्याय्य आहे. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करते.” एमएसपी आणि अनुदानावर भर त्यांनी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दोन प्रमुख पावले सुचवली… एमएसपी कायदेशीररित्या अनिवार्य केले पाहिजे, जेणेकरून कोणतेही पीक किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी विकले जाऊ नये. शेतकऱ्यांना थेट आणि पुरेसे अनुदान दिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या किमती आणि बाजारभावातील फरक भरून काढता येईल. सध्याच्या योजनांबद्दल प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीकडून दरवर्षी १२,००० रुपये मिळतात. कृषी पंपांसाठी ७.५ अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देखील दिली जाते. परंतु जवंधिया म्हणतात की या योजना “सरकारी अपयश लपवण्याचा” एक मार्ग आहेत. सोयाबीनचा किमान आधारभूत किमतीचा दर प्रति क्विंटल ५,३२८ रुपये आहे, पण शेतकऱ्यांना फक्त ४,०००-४,५०० रुपये मिळत आहेत. तूर (तूर) चा किमान आधारभूत किमतीचा दर ८,००० रुपये आहे, पण शेतकरी तो फक्त ६,५००-७,००० रुपयांना विकू शकतात. जावधिया यांनी प्रश्न उपस्थित केला की, अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते, तर भारतात ७०% लहान आणि सीमांत शेतकरी फक्त २-५ हेक्टर जमिनीवर शेती करतात. अशा परिस्थितीत ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकू शकत नाहीत. सरकारला थेट आवाहन जावधिया म्हणाले, “जेव्हा तुम्ही इतर योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करू शकता, तर शेतकऱ्यांवर खर्च का करू नये? जे शेतकरी उन्हात आणि पावसात दिवसरात्र कष्ट करून कोट्यवधी लोकांना पोट भरतात त्यांना पूर्ण आर्थिक मदत मिळाली पाहिजे.”

Maharashtra Politics: उद्योगांसाठी बळी देऊ नका, अन्यथा…, राज्यात शेतकरी आक्रमक; केंद्र सरकारला दिला इशारा Read More »

img 20250915 wa0022

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश

Karanji Flood : अहिल्यानगर जिल्ह्यात रविवार रात्रीपासून पुन्हा एकदा मुसरधार पाऊस सुरू झाला आहे. यातच 15 सप्टेंबर पहाटे पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अद्यापही चार ते पाच लोक पुरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बचाव कार्याचे पथक सध्या करंजी मध्ये सतर्क आहे. पावसाचा कहर अहिल्यानगर जिल्ह्यात रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी, घाटशिरस, मढी या गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. घरात पाणी, गोठ्यातील जनावरे वाहून गेली, शेतीचे प्रचंड नुकसान असे संकट शेतकऱ्यांवर कोसळलं आहे. तलाव फुटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथके गावांत दाखल झाली असून बचाव कार्य सुरू झाले आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 15 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

Karanji Flood : मोठी बातमी! करंजी येथे पुरात अडकलेल्या 16 नागरिकांना बाहेर काढण्यात यश Read More »

Rain Alert Today : नागरिकांनो सावधान… 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या सर्वकाही

Rain Alert Today : भारतीय हवामान खात्याने १२ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मेघगर्जना, वीजा किंवा वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळादरम्यान विद्युत उपकरणे वापरू नयेत व वीजेच्या सुवाहक भागांपासून दूर राहावे. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणाऱ्या केबल्स यांपासून दूर राहावे. जाहिरात फलकांच्या आसपास थांबू नये. मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे. धरण व नदी परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात उतरू नये व धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नदी, ओढा, नाले काठावरील नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, पाण्यावरून वाहणारे पूल ओलांडू नयेत. मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये थांबू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची शक्यता असल्याने डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी वेळीच स्थलांतर करावे, घाटरस्त्याने प्रवास टाळावा. शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलीस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष – दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० उपलब्ध आहेत.

Rain Alert Today : नागरिकांनो सावधान… 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, जाणून घ्या सर्वकाही Read More »

pravara river

Rain Alert: प्रवरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Rain Alert : जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल सायंकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार, भंडारदरा धरणातून १३,३४४ क्युसेक, तर निळवंडे धरणातून १५,३५७ क्युसेक पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, ओझर बंधाऱ्यावरूनही ६,३०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावे, पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, आणि पूरप्रवण भागांत गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. धोकादायक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Rain Alert: प्रवरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू Read More »

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे 26 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट Read More »

sadabhau khot

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; Sadabhau Khot यांचा गंभीर आरोप

Sadabhau Khot : गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहेत मात्र शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सरकारने कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन समोर आम्ही जनावराच्या छावण्या उभं करू असा इशारा देखील माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी दिला. माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, गाई म्हशीमध्ये शेण दूध आमची माय बहिण बाप काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधून धंदा करत आहेत. सरकारला माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांची ही मी बोलणार आहे की बाबा शेतकऱ्यांचा व्यवसाय आशाने मरून जाईल गाड्या अडवल्या जातात त्यांना मारलं जातं त्यामुळे यावर कारवाई करा. थार सारख्या कॉर्पोरेट गाड्या मधून काही लोक पुण्या मुंबईवरून येतात आणि आमच्या गोरक्षणाचा काम करत असल्याचे सांगतात. गोरे गुंठे असतात तुम्हाला कळत नाही शहरात कुत्रे मांजर बघितले यांच्याकडे गाई गोटे कुठून आले असं सदाभाऊ खोत म्हणाले. पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनाशी आम्ही चर्चा करू जे शेतकरी नेते माझ्यावर टीका करत आहेत त्यांना या बैठकीमध्ये बोलून यावर त्वरित उपाय काढण्याचा प्रयत्न करू. आम्ही आता गोसावी जाणार आहोत काल पोलिसांच्या समोर पंचनामा केला तिचे एकही जनावर नव्हतं तेच पोलीस पुन्हा म्हणतात सात जनावर होते आज परत पोलिसांना सांगितले आमचे 21 जनावर आहेत तर ते म्हणतात हा असते त्यामुळे कोणीतरी त्यांना पाठीशी घातले हे दिसतं. पोलीस खात्यामध्ये सुद्धा या संदर्भात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. राजस्थान इतर राज्यातून दूध देणाऱ्या गाई अशा तथाकथित गोरक्षकाकडून जर गाड्या अडवल्या तर येणार नाहीत शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान होईल शेतकरी भरडला जाईल. सरकार जरी आमचा असलं तरी मी शेतकरी नेता आहे त्यामुळे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं टाकण्यासाठी आम्ही आज इथं आलो आहोत आमचे जनावर आम्हाला दिली पाहिजे. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू; Sadabhau Khot यांचा गंभीर आरोप Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीसमान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, तूर कपाशी, सोयाबीन, मका, वाटाणा यांसह खरिपातील इतर पिके पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही भागांत दुष्काळसदृश परिस्थितीत पिके खुंटलेली असतानाच अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या. विशेषतः शेवगांव तालुक्यातील खामगांव, हिंगणगांव, गुंफा, जोहरापूर, भातकुडगांव तसेच राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी असल्याचे खा. लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. लंके यांनी या पत्रात नमुद केले आहे की, शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने खते व औषधे टाकून पिके उभी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कपाशी पिवळी पडली, सोयाबीनची फुले गळून पडली तर तूर व वाटाणा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी रोष व्यक्त करत आहेत. तातडीने पंचनामे करा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खा. लंके यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त भागात जाऊन पंचनामे करावेत व शासनस्तरावरून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले आहे.

Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या ; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Read More »

bhandardara dam

Ahilyanagar News : पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो…

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी भंडारदरा धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. दरम्यान भंडारदरा धरणातुन २० हजार ७६३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक होत असुन धरणातील पाणी पातळी नियत्रीत ठेवण्यासाठी निळवडे धरणातुन ८ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली. गेल्या आठवड्यात भंडारदरा धरण पाणलोट परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे १५ आँगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम मोडला होता. परंतु सोमवार पासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावासाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे. डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे जोमाने वाहत असून छोट्या नद्या, नाले खळखळून धरणात विसावत आहेत. बुधवारी भंडारदरा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.तर निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे निळवंडे धरणातून एकूण ८ हजार ६०० क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावत आहे. त्यामुळे प्रवरा नदी वाहती बनली आहे. आणि नवीन पाण्याची आवक निळंवडे धरणात वाढत असल्याने निळंवडे धरण लवकरच भरणार असल्याचे वर्तविले जात आहे.

Ahilyanagar News : पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो… Read More »