DNA मराठी

शेती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या आदी सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवल्याने तसेच काही नागरिकांनी गेवराई येथील अधिकाऱ्यांना संपर्क केल्याने गेवराई नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि आठ दिवसात दोन वेळेस गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने एयरवाल बंद केले.  पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्या जवळील एअरवॉलला अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.  सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. परंतु गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने याविषयी सध्या नागरिकात मात्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.  या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होती,  तर काही जण मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्याने पाईपलाईनच्या एअरवॉलमधून वाया जात असलेले पाणी हे तत्परतेने गेवराईचा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केले. तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण-गेवराई या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवर असणाऱ्या एअरवॉलला कोणत्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये जेणेकरून पाण्याची नासाडी होऊन पाणी वायाला जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी घ्यावी.  तसेच कोणी अशा प्रकारची छेडछाड करत असल्याचे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकास निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांच्या आदेशावरून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. – ए.बी. लाड  पाणीपुरवठा प्रमुख, गेवराई नगरपरिषद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Prajakta Tanpure

Prajakta Tanpure : ‘हा’ तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल

Prajakta Tanpure – गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारकडून 40 हुन अधिक गावांचा समावेश दुष्काळजणीमध्ये करण्यात आला. मात्र नगरच्या गावांचा सुरुवातील यामध्ये समावेश नव्हता.  दुष्काळाची परिस्थिती असताना नगरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. दुष्काळजन्य सदृश्य परिस्थिती निकष तसेच लाभ आपण पहिले तर कोणताही फायदा महसुली मंडळांना होणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पहिले तर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. हे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणायचा प्रकार आहे, अशा शब्दात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले, कृषी पंपांना वीजबिलात सूट दिली मात्र खरी गरज पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये महत्वाचा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या योजना आहे याच्या वीजबिलात सूट देणे गरजेचे आहे. यांचे कनेक्शन बंद केले जाऊ नये मात्र महावितरण कडून यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो आहे. यामुळे  दुष्काळजन्य परिस्थिती पाहता यावर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी तनपुरे यांनी केली. पिकविम्याबाबत अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. मात्र खूप कमी लोकांना याचा फायदा मिळाला आहे, अशी खंत यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केली. अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. केवळ सरकारकडून घोषणा केल्या जात असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही, असे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल असे धोरण सरकारने राबवावे,  पीकविम्याची अग्रीम रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळावी अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली. दूधदराबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, आमच्या जिल्ह्यात दूध उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र दुधाचे दर काही दिवसांपूर्वी 35 ते 40 रुपयांवर गेलेले दुधाचे दर आता 20 ते 25 रुपयांवर आले आहे. महाविकास आघाडीने दूध खरेदी करून दुधाचे दर नियंत्रित ठेवले होते. मात्र या सरकारच्या काळात दुधाचे दर पडलेले  आहे मात्र ग्राहक खरेदी करत असलेले दुधाचे  दर काही कमी झाले नाही आहे.  यामुळे सरकारनं दुधाच्या दरबाबाबत काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

Prajakta Tanpure : ‘हा’ तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल Read More »

Sharad Pawar On Onion Farmer Protest : राज्यात पुन्हा कांद्यावरून संघर्ष; शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला बंद; शरद पवार म्हणाले … 

Sharad Pawar On Onion Farmer Protest : मोदी सरकारने काही दिवसापूर्वी मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान तापले आहे. आज कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला करत कांदा निर्यातीवरील बंदी लवकरात लवकर उठवण्याची मागणी केली तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कष्टाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी दुपारी पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसह नाशिकच्या चांदवड शहरातील कांदा उत्पादकांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी हजारो स्थानिक शेतकरी उपस्थित होते. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला आहे. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे कांदा निर्यातीवर घातलेली बंदी तात्काळ हटवण्याची मागणी केली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावात केंद्राच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या कांदा उत्पादकांना संबोधित करताना पवार म्हणाले की, शेतकऱ्यांनी संघटित होऊन त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची गरज आहे. ते म्हणाले, नाशिक सर्व शेतकऱ्यांना या दिशेने मार्ग दाखवू शकते. पवार म्हणाले, कांदा उत्पादक हे छोटे शेतकरी आहेत जे चांगले पीक घेण्यासाठी कष्ट करतात. ते म्हणाले की, ते केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी कधीही कांद्याचे भाव कमी केले नाहीत किंवा त्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली नाही. कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवावी, असे ते म्हणाले. केंद्र सरकार कांदा खरेदी करेल- फडणवीसदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधान परिषदेत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचा कांदा विकला गेला नाही किंवा ज्यांच्या बोली मिळालेल्या नाहीत, त्यांच्याकडून केंद्र कांदा खरेदी करण्यास तयार आहे. सोमवारी त्यांनी सांगितले की, कांदा निर्यातबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. केंद्र सरकारने अलीकडेच पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवून भाव नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. याविरोधात राज्याच्या काही भागात शेतकरी आंदोलन करत आहेत.

Sharad Pawar On Onion Farmer Protest : राज्यात पुन्हा कांद्यावरून संघर्ष; शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग केला बंद; शरद पवार म्हणाले …  Read More »

winter

Weather Update: तयार राहा! पुढील आठवड्यात वाढणार थंडी; ‘या’ भागात कोसळणार धो धो पाऊस, जाणून घ्या सविस्तर

Weather Update : मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात झपाट्याने बदल पाहायला मिळत आहे. मात्र आता राज्यात डोंगरावर बर्फवृष्टी झाल्याने थंडी वाढत आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसाचीही शक्यता आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पारा घसरेल आणि काही ठिकाणी थंडी वाढू शकते. येत्या 8-10 दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यातील कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. मात्र, पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या अंतर्गत भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रात्री जास्त थंड राहतील. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केली. IMD च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, शहराचे किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली जाऊ शकते. मात्र तापमानात फारशी घट होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईत थंडी वाढणार!IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात उत्तरेकडील वाऱ्यांच्या आगमनामुळे येत्या 2-3 दिवसांत तापमानात घट होईल. तथापि, किमान तापमान हे उत्तरेकडील वारे किती मजबूत आहेत तसेच पश्चिम विक्षोभाच्या प्रभावावरही अवलंबून आहे. राज्यात पावसाची शक्यतात्याचबरोबर पुढील काही दिवसांत पूर्व महाराष्ट्रातील अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कांबळे म्हणाले, “चक्रीवादळ आधीच कमकुवत झाले आहे, त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या पूर्व भागात जाणवेल आणि तेथे हलका पाऊस पडेल. मात्र, कोकण विभागाला याचा फटका बसण्याची शक्यता नाही. मुंबई तसंच शेजारील जिल्ह्यात पाऊस पडणार नाही. थंड कधी?स्कायमेट वेदरचे महेश पलावत म्हणाले की, 14 डिसेंबरनंतर मुंबई शहरात तापमानात मोठी घसरण अपेक्षित आहे. ते उत्तरेकडील वाऱ्यांवर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तापमानात केवळ एक ते दोन अंशांची घट होऊ शकते. कारण वेस्टर्न डिस्टर्बन्स आलेला नाही. देशाच्या उत्तरेकडील भागात जोरदार पाऊस झाल्याशिवाय पारा फारसा घसरण्याची शक्यता नाही. तथापि, 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टी अपेक्षित आहे, ज्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडेल. महानगरातील हिवाळा साधारणपणे 15 डिसेंबरनंतर सुरू होतो. त्यानंतर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली असते. गेल्या आठवड्यात 30 नोव्हेंबर रोजी या थंडीच्या मोसमात मुंबईत पहिल्यांदाच तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला. मात्र मिचौंग चक्रीवादळामुळे राज्यात तापमानात वाढ झाल्याने उष्मा जाणवला.

Weather Update: तयार राहा! पुढील आठवड्यात वाढणार थंडी; ‘या’ भागात कोसळणार धो धो पाऊस, जाणून घ्या सविस्तर Read More »

मराठी बातम्या

मराठी बातम्या मराठी बातम्या ही दिवसभरातील ताज्या व गर्म बातम्या मिळवणारी वेबसाइट आहे. या वेबसाइटवर आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक, खेळ, मनोरंजन, व्यापार, विचार आणि इतर विविध विषयांवरील बातम्या मिळतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला रोजच्या घडामोडीची जाणीव, राजकीय आणि आर्थिक बातम्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या, खेळाच्या जगातील घडामोडी, व्यापार, विचार, सामाजिक विषयांवरील बातम्या आणि इतर विविध विषयांवरील बातम्या मिळतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला नवीनतम आणि ताज्या बातम्या मिळतात. या वेबसाइटवर आपल्याला राजकीय आणि आर्थिक विषयांवर ताज्या बातम्या मिळतात, ज्यामुळे आपण राजकीय विद्यार्थ्यांना आणि उद्योजकांना आर्थिक बातम्या वाचायला मिळतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला विविध विषयांवरील बातम्या मिळतात. आपल्याला खेळ, मनोरंजन, व्यापार, विचार, सामाजिक विषयांवरील ताज्या बातम्या वाचायला मिळतात. खेळ विषयांवरील बातम्या आपल्याला खेळ प्रेमींना आणि खेळाच्या जगातील घडामोडी जाणून घेण्यास मदत करतात. मनोरंजन विषयांवरील बातम्या आपल्याला नवीनतम चित्रपट, टेलिविजन शो, संगीत, कला आणि अभिनयाच्या घडामोडी जाणून घेण्यास मदत करतात. मराठी बातम्या वेबसाइटवर आपल्याला सामाजिक विषयांवरील बातम्या मिळतात. या विषयांवरील बातम्या आपल्याला समाजातील बदलांची जाणीव देतात आणि आपल्याला त्या बदलांच्या विचारांसाठी प्रेरणा देतात. आपल्या आवडत्या विषयावरील बातम्या वाचायला मराठी बातम्या वेबसाइटला भेट द्या आणि ताज्या व गर्म बातम्या वाचा.

मराठी बातम्या Read More »