DNA मराठी

क्राईम

Pohara Devi Temple : भीषण अपघात! पोहरा देवीला जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू तर ‘इतके’ जखमी

Pohara Devi Temple : यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुसद-दिग्रस रस्त्यावरील बेलगव्हाण घाटात हा अपघात झाला आहे.  बेलगव्हाण घाटात नाल्यात टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.   पोहरादेवी येथे जाण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. नवस पूर्ण झाल्यानंतर सर्व लोक बोकड घेऊन पोहरादेवीला जात होते, असे सांगितले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेलगवण घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे वाहन नाल्यात पडले आणि भीषण अपघात झाला. वाहनाचा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून आसपासचे ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. अपघाताच्या वेळी गाडीत सुमारे 15 ते 20 जण होते. पोलीस मृत व जखमींची ओळख पटवून पुढील तपास करत आहेत. जखमींना पुसद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात  सकाळी 11 वाजता वाहन नाल्यात पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुसद (ग्रामीण) पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश राठोड यांनी सांगितले की, नागपूरपासून 260 किलोमीटर अंतरावरील पुसद येथील जवाहर नगर येथे राहणारे गणेश राठोड यांच्या कुटुंबातील सुमारे 15 जण वाहनातून उमरी पोहरा देवीकडे जात होते. अधिकाऱ्याने सांगितले की, बेलागवान पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन खाली नाल्यात पडले. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पीडितांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.  या अपघातातील मृत व जखमी पुसद तालुक्यातील मोहा तांडा, टोकी तांडा, पांढुर्णा, सिंघनवाडी येथील रहिवासी आहेत.

Pohara Devi Temple : भीषण अपघात! पोहरा देवीला जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू तर ‘इतके’ जखमी Read More »

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

Ahmednagar News: वसीम गुलाब शेख ,समीर अब्दुल शेख ,तन्वीर निसार शेख ,आरिफ ईस्माईल कुरेशी हे चारही लोकं आर टी ओ कार्यालय जवळ वाहनाला रेडियम लावण्याचे काम करतात तेथेच सल्लाउद्दीन शेख उर्फ SS पण रेडियम लावण्याचे व्यवसाय करतात. सल्लाउद्दीन शेख उर्फ SS हे वारंवार वरील सगळ्यांना धमकी द्यायचे काम करतात तुम्ही इथे काम करायचे नाही मी येथे 25 वर्षा पासून काम करतो इथे माझा राज चालणार इथे काम करायचा तर माझ्याकडे करायचा नाही तर काम करू देणार नाही तुम्हाला जीवे मारून टाकीन माझे नेटवर्क लई मोठे आहे.  तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकवेन माझा कोण काही वाकडं करू शकत नाही पोलिसांबरोबर आणि आर टी ओ बरोबर पण माझे संबंध आहे. राजकारणात पण माझा चांगला वजण आहे. तुम्हाला आयुष्यातून संपून टाकेन अशी धमकी वारंवार दिल्याने वैतागून वरील वसीम गुलाब शेख याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद 19 एप्रिल 2023 रोजी दिली. या प्रकरणात पोलिसांनी  504,506 प्रमाणे NC दाखल करून घेतले . सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने वसीम शेख याला परत रस्त्यात अडवले व सांगितले कि तू जी NC दाखल केली ना त्या NC ने मला काही फरक पडत नाही ते तर बॉण्ड जामीन वर माझा जामीन होऊन जाईल पण मी तुला जिवंत ठेवणार नाही. नंतर काही राजकारणी यांना मध्यस्ती करायला लावून हे वाद मिटवून घेतला परंतु हे वाद मिटलेले असतांना सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याने 29 डिसेंबर 2023 रोजी परत वसीम गुलाब शेख आणि इतर तिघांना परत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हे लोक परत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गेले व तेथे सल्लाउद्दीन शेख उर्फ SS याच्यावर  504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Ahmednagar News: व्यवसायिक सल्लाउद्दीन शेख (SS)यांचे कडून जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल Read More »

Ahmednagar News: दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटवा; पोलीस, तलाठी तहसीलदारवर कारवाई करा नाहीतर…

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामधील गुहा या ठिकाणी रमजान बाबा दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटविण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त मुस्लिम समाजच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच दर्गामध्ये मूर्ती बसविण्यासाठी संबंधित पोलीस, तलाठी आणी तहसीलदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा या गावांमध्ये एकाच जागेवर असलेले दैवत दर्गा की मंदिर यावरून वाद चालू आहे हा वाद सध्या कोर्टात चालू आहे व  या जागेवर कोणताही धार्मिक विधी करू नये असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असताना देखील पोलीस अधीक्षकांसह संबंधित पोलीस अधिकारी तलाठी व तहसीलदार यांनी काही जातीयवादी संघटनांना मिळून वादग्रस्त असलेल्या जागेतील रमजान बाबा दर्गामध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसवली आहे. त्यामुळे बसविण्यात आलेले मूर्ती ही त्वरित हटवण्यात यावी तसेच जातीयवादी संघटनेला मदत करणाऱ्या पोलीस तलाठी तसेच तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत बसविण्यात आलेली मूर्ती ही येत्या पंधरा दिवसात काढावी अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आंदोलन करण्यात येईल असा इशाराच मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला आहे .

Ahmednagar News: दर्गामध्ये बसविण्यात आलेली मूर्ती हटवा; पोलीस, तलाठी तहसीलदारवर कारवाई करा नाहीतर… Read More »

Aurangabad News : भीषण अपघात! पोहताना 2 भावांसह 4 मुलांचा मृत्यू

Aurangabad News: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगरातील बनकरवाडी येथे 12 ते 14 वर्षे वयोगटातील चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय-12 वर्षे), अबरार जावेद शेख (वय-12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय-14 वर्षे), कुणाल अनिल दळवी (वय-13 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मुले गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर भागातील रहिवासी आहेत.  दुपारी सर्वजण पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी त्यांना मुले पाझर तलावावर गेल्याचे समजले. त्याचे आई-वडील तेथे गेले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल आढळून आले. मात्र मुले सापडली नाहीत. चारही मुले खोलात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अबरार आणि अफरोज हे सखे भाऊ होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने चार मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. पोलिसांनी मुलांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात नेले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Aurangabad News : भीषण अपघात! पोहताना 2 भावांसह 4 मुलांचा मृत्यू Read More »

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कर्तव्यात कसूर केले असल्याने यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा अशी मागणी डॉ परवेज अशरफी,एम आय एम जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.   त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा गुन्हेगारी आणि जाती दंगलीचा अड्डा झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जेव्हा पासून अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक या पदावर राकेश ओला साहेब यांची नियुक्ती झाली आहे तेव्हा पासून अहमदनगरमध्ये एक दिवस असे गेले नाही त्या दिवशी काही गंभीर गुन्हा झाले नाही.  पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे आल्यापासून जिल्ह्यात जातीय दंगली, दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, छोट्याशा कारणाने जातीय दंगली, काही कारण नसतांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले, मुस्लिम अल्पसंख्यांक समजाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले, धार्मिक ग्रंथाची विटंबना, मुस्लिम महिलांना खोट्या गुन्ह्यात फसवणे, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोज जिल्ह्यात सरास घडत आहे. चोरी, डकैती, महीलाची छेडछाड, छोटे मोठे गुन्हे हे तर  किरकोळ सारख्या होत आहे. जेव्हा पासून राकेश ओला साहेब अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर विराजमान झाले तेव्हांपासून अहमदनगर येथील काही जातीवादी आतंकी संघटनेला तसेच सरकारच्या जवळीक संघटनेला कायद्या हातात घेण्याचे  जणूकाही प्रमाण पत्र भेटले.  शेवगाव, राहुरी उंब्रा, राहुरी गुहा, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोला, कर्जत, अहमदनगर शहर या सर्व ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार करण्यात आले.  एकीकडे जातीवादी आतंकी संघटनेने मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करत आहे आणि दुसरी कडे पोलिस प्रशासनाने ज्या प्रकारे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर गुन्हे दाखल केले जसे सर्व काही पूर्ण नियोजित कट रचण्यात आले आहे. दोन समाजात दंगली झाल्यावर एका समाजावर असे गुन्हे दाखल करायचे की त्यांची ताबडतोब जमीन होईल किंवा न्यायालयात दुसऱ्या दिवशी जामीन होईल आणि त्याच गुन्ह्यात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर असे गंभीर गुन्हे दाखल करायचे की त्यांची  महिनो जामीन होणार नाही.  आपण अहमदनगर मध्ये झालेल्या सर्व घटनेची चौकशी केली तर आपल्या स्पष्ट दिसेल की पोलिस अधीक्षक साहेब यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग कसे केले आणि आपल्या सोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना कसे चुकीच्या काम करण्याचे आदेश दिले.  अहमदनगर येथील कसूर केलेल्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली असेल तर त्यांनी कितीही गंभीर गुन्हा केले असो, त्यांनी केलेला काम मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधात केले असेल तर ते कसुरवार नाही किंवा समज देऊन सोडण्यात येते.  याचा उत्तम उदाहरण म्हणजे मागील वर्षी कोटला घास गल्ली येथे दोन समाजात झालेल्या दंगली आणि त्यात त्या वेळची तोफखाना पोलिस निरीक्षक मॅडम यांनी केलेले कार्य हा मुस्लिम अल्पसंख्यांक विरोधी होती.  शेवगाव येथे दर्ग्याचे उर्स दरम्यान कोणताही कारण नसतांना शेवगाव पोलिस निरीक्षक यांनी केलेला लाठीचार्ज. संगमनेर येथे एका जातीवादी संघटनेचा पदाधिकारी आणि एका वृत्तवाहिनीचे संपादक यांनी केलेल्या चीतावनीखोर भाषणं नंतर अकोले येथे झालेल्या एका मुस्लिम अल्पसंख्यांक सामजाच्या तरुणाची हत्या आणि आणि पोलिसांचा मुख्य आरोपी वाचवण्याचा प्रयत्न, राहुरी उंब्रे येथे मुस्लिम धार्मिक स्थळांवर जातीवादी आतंकी संघटनेने हल्ला केल्याने त्या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांना वाचवण्यासाठी फिर्यादीवर दबाव तयार करण्याचा काम पोलिस निरीक्षक यांनी केल्याचे चित्र व त्यांनतर मुस्लिम महीलावर खोटे गुन्हे दाखल करणे.   तसेच राहुरी गुहा गावात काही जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांनी मुस्लिम दर्ग्यावर कब्जा करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद केले परंतु सदर दर्गा वक्फ येथे नोंद आहे. तरी देखील पोलिस प्रशासन या जातीवादी संघटनेला पाटबल देत असल्याचे चित्र आहे. गुहा येथील या जातीवादी आतंकी संघटनेच्या लोकांची मजल इतकी झाली की त्यांनी पोलिस अधिकारी, तलाठी,  तहसीलदार यांना हाताशी धरून दर्ग्यामध्ये अनधिकृत मूर्ती बसवली. विशेष म्हणजे या जागेवर कोणतीही धार्मिक विधी करण्याचा न्यायालयाचा मनाई हुकूम असताना पोलिसांच्या मदतीने हा सर्व प्रकार घडला याची कल्पना तातडीने पोलिस अधीक्षक साहेब राकेश ओला यांना दिली तर त्यांनी नेहमी प्रमाणे काहीच केले नाही.  या सर्व बाबी वरून असे दिसते की अहमदनगर पोलिस अधीक्षक साहेब हे  अकार्यक्षम अधिकारी आहे किंवा हे सर्व काही ते अहमदनगरचे पालक मंत्री यांचे आदेशाने करत आहे किंवा पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब हे स्वतः या जातीवादी आतंकी संघटनेचे कार्यकर्ते आहे जे पोलिस खात्यात राहून या जातीवादी आतंकी संघटनेला मदत करत आहे. या सर्व बाबींचा आपण घांभिर्यापूर्वक चौकशी करून अहमदनगर पोलिस अधीक्षक राजेश ओला यांच्यावर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने कारवाई करावी.

Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची चौकशी करा – AIMIM  जिल्हाध्यक्ष Read More »

Gondia News : मोठी बातमी! शहरात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार

Gondia News : गोंदियात माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.  गोळीबारात लोकेश यादव हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं आहे. ही घटना आज गुरुवारी सकाळी 11 वाजे सुमारास घडली. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोंदिया शहरात खळबळ उडाली.  दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व सर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस दल घटनास्थळी पोहोचवून आरोपीच्या शोध घेण्यास सुरुवात केली आहे तर विविध मार्गाने पोलीस टीमला आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे . पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की नागरिकांनी कोणत्याही अफेला बळी पडू नये.

Gondia News : मोठी बातमी! शहरात माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार Read More »

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Maharashtra News: राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने 12,40,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.  अहमदनगर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शाहरुख शहा, नदीम शेख व रिजवान शेख (सर्व रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर) हे त्यांचा हस्तक दानिश सय्यद रा. वार्ड नं.2, ता. श्रीरामपूर व त्याचा साक्षीदार यांचे मार्फतीने सुगंधीत तंबाखु, पानमसाला व गुटखा राजु शेख व वसीम (रा. बीड) यांचेकडुन खरेदी करुन बीड जामखेड मार्गे अहमदनगर शहरात येणार आहे.  या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिचोंडी पाटील येथे सापळा लावून आरोपींना अटक केली आहे. पोलीसांनी या कारवाईत विविध प्रकारची सुगंधी तंबाखु, गुटखा, पानमसाला, एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो व एक टाटा इंडीगो कार असा एकुण  12,40,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जप्त केला आहे.  शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादविक 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News:  गुटखा विक्री करणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.  या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला अवघ्या बारा तासात अटक केली आहे. पोलीसांनी रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. तसेच चोरलेली दानपेटी आरोपीने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवली होती. पोलीसांनी चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत केली असून आली गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.

Ahmednagar News : कोतवाली पोलीसांची मोठी कारवाई, अवघ्या 12 तासात ‘त्या’ प्रकरणात आरोपीला अटक Read More »

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार

Crime News : जुन्या उधारीच्या पैशांना घेऊन झालेल्या वादात तिघा बापलेकासह अन्य दोघांनी मिळून तरुणाला ठार केले. ही धक्कादायक घटना गोंदिया रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ शनिवारी  रात्री 8 वाजता दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.  मृत तरुणाचे नाव मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे असे आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा वापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.  काय आहे प्रकरण गोंदिया रामनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली की, तक्रारदार प्रवीण ऊर्फ लक्की राजकुमार मेश्राम (रा. आंबेडकर चौक, वॉर्ड क्रमांक-3, कुडवा), मनीष भालाधरे आणि राहुल बरेले हे तिघे शनिवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास इंजिनिअरिंग कॉलेज समोर सिगारेट पिण्याकरिता संतोष रामेश्वर मानकर यांच्या लकी रेस्टॉरंटमध्ये गेले होते.  तेथे त्यांचा मित्र प्रवेश मेश्राम याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता संतोष मानकर याने प्रवीण मेश्राम, मनीष भालाधरे आणि राहुल बरेले यांच्यासोबतही भांडण व शिवीगाळ केली. तसेच मिरची पावडर मनीष भालाधरे यांच्या डोळ्यात फेकून संतोष मानकर, लकी ऊर्फ लोकेश, पवन संतोष जॉर्डन ऊर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी लोखंडी रॉड, कुन्हाड, कोयता इत्यादी घातक हत्यारांनी वार करून मनीष भालाधरे याला ठार केले. प्रवीण मेश्राम याच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्ह दाखल केलाय. या प्रकरणात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमण्यात आले. यानंतर पथकांनी संतोष मानकर, लकी संतोष मानकर, पवन संतोष मानकर आणि विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले, तर जॉर्डन शेंडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.  आरोपीना अवघ्या काही तासांत पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात केले होते.

Crime News : डोळ्यात मिरची पावडर झोकून बापलेकाने केले तरुणाला ठार Read More »

Ahmednagar News: गामा भागानगरे हत्याकांडातील आरोपींना प्रशासन सहकार्य करते, कुटुंबियांकडून गंभीर आरोप

Ahmednagar News:  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड या ठिकाणी घडलेल्या बहुचर्चित असलेल्या ओंकार (गामा)भागानगरे हत्याकांडातील आरोपींना सिव्हिल प्रशासन व जेल प्रशासन सहकार्य करत असल्याचा आरोप मृत ओंकार (गामा)भागानगरे यांचे बंधू तुषार भागानगरे यांनी केला आहे.  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोपी हुच्चे हा आजारी असल्याचे नाटक करत असून त्यानंतर त्याचे अवैध धंदे चालवत असल्याचा आरोप केला असून या संदर्भातील निवेदन जिल्हाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परिक्षेत्राचे बीजी शेखर यांना तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील तक्रार केली असून मागणी केली आहे की आरोपींना कठोर कठोर कारवाई व्हावी.  यापूर्वी देखील सबजेल  कारागृहामध्ये खोटे आधार कार्ड दाखवून आरोपी हुच्चे यास अमोल येवले नावाचा एक ईसम भेटायला जात होता ते देखील आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले .  मदत करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी भागानगरे कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्याला सबजेल कारागृहातून हलवून इतर जिल्ह्यातील कारागृहामध्ये टाकावं अशी मागणी करण्यात आली. जर ही मागणी मान्य नाही झाली तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.

Ahmednagar News: गामा भागानगरे हत्याकांडातील आरोपींना प्रशासन सहकार्य करते, कुटुंबियांकडून गंभीर आरोप Read More »