Dnamarathi.com

Ahmednagar News:  श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कोथूळ गावात मध्यरात्री अडीचच्या सुमारास 4 अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करून ठार केल्याची घटना घडली असून योगेश सुभाष शेळके (वय 33 वर्षे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयताच्या पत्नीने अज्ञात चार व्यक्तींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 मयताच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हणले आहे की,मी माझे पती, सासरे मुले सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून झोपलो असता मध्यरात्री अडीच च्या सुमारास दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्याने मी उठले त्यावेळी घरातील लाईट गेली होती,मी उठून घराचा दरवाजा उघडला असता काळे कपडे घातलेले व तोंडाला बांधलेले हातात कोयता असलेली 4 इसम दिसून आले. 

त्यातील एकाने माझ्या गळ्याला कोयता लावत तू जर आरडाओरडा केला तर तुला ठार मारेल असा दम दिला आणि त्यातील तिघे जण पती योगेश सुभाष शेळके झोपलेल्या ठिकाणी जाऊन कोयत्याने गळ्यावर, पायावर ,हातावर कोयत्याने वार करून पतीला ठार मारून पळून गेले.त्यानंतर आरडाओरडा केल्याने शेजारील जमा झाले. 

घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पीएसआय राजेंद्र चाटे, पीएसआय गाजरे,पो हे कॉ. नंदकुमार पठारे,पो.हे.कॉ. खेडकर, पो. कॉ. संदीप दिवटे, पो. कॉ. कैलास शिपणकर यांच्यासह बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

घटनास्थळी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तापसाबाबत सूचना केल्या.

काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून त्यादृष्टीने तपास चालू आहे. बेलवंडी पोलिसांची चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच आरोपी गजाआड केले जातील. अशी प्रतिक्रिया  पोलीस निरीक्षक श्री. संतोष भंडारे यांनी फोनवर बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *