Dnamarathi.com

Ahmednagar News: अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने आज मंगळवारी वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून राहुरी येथील न्यायालयातील अॅड.राजाराम आढाव आणि अॅड.मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या झालेल्या या घटनेचा निषेध व्यक्त करत, भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिला आहे. 

यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट नरेश गुगळे, उपाध्यक्ष महेश शेडाळे, एडवोकेट सतीश गुगळे, सचिव संदीप शेळके, एडवोकेट अनिता दिघे, एडवोकेट सुहास टोने, एडवोकेट महेश काळे, एडवोकेट विकास सांगळे, एडवोकेट अनिता येवले आदी वकिलांनी सहभाग नोंदवला होता.

 तसेच सदर परिस्थिती गांभीर्याने घेऊन शासनाने एडवोकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत  मोर्चा काढून निदर्शने दर्शवत जिल्हाधिकारी यांना एडवोकेट प्रोटेक्शन कायदा लागू करण्याची केली मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *