Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Police : शेवगाव पोलीसांनी मोठी कारवाई करत अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन आरोपीस 24 तासाचे आत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना 18 डिसेंबर रोजी दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करुन जि.सांगली, जि.बीड तसेच तिसरे पथक ता.पैठण हद्दीत रवाना केली. तपासाच्या सहाय्याने जि.बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहिती मिळाली की शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले आहे. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना तसेच अपहरित व्यक्तीस ताब्यात घेतले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सोमनाथ बाबुश्या जाधव (रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि.बीड) असं आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहोत.
Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई Read More »








