DNA मराठी

क्राईम

Maharashtra News: पुस्तकं नाही वाचणारे युद्धं पेटवतात

Maharashtra News: “घरात असलेल्या गीता आणि कुराण यांच्यात कधी लढाई होत नाही; जे लोक त्यांच्यासाठी लढतात ते कधीच ती पुस्तकं वाचलेली नसतात.” ही वाक्यं केवळ एक उपहासात्मक निरीक्षण नाही, तर आजच्या सामाजिक वास्तवावर बोट ठेवणारा आरसा आहे. भारताच्या मातीत गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथसाहिब या सर्व धर्मग्रंथांचा सन्मान करणारी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विविध श्रद्धा, संस्कृती आणि विचारांची ही भव्य गंगा एकत्र वाहत आलेली आहे. पण दुर्दैवाने आज याच ग्रंथांच्या नावाने भिंती उभारल्या जात आहेत. रस्त्यावर रण मांडणारे, सोशल मीडियावर द्वेषाची भाषा करणारे, “धर्मरक्षक” असल्याचा दावा करणारे कितीजण खरेच हे ग्रंथ उघडून वाचतात? गीता सांगते “अहिंसा परमो धर्म:” आणि “कर्मण्येवाधिकारस्ते”; तर कुराण म्हणते “La ikraha fid deen”, म्हणजे धर्मात जबरदस्ती नाही. या पवित्र ग्रंथांनी माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा संदेश दिला आहे, त्याग, क्षमा, सहिष्णुता आणि न्याय यांचा मार्ग दाखवला आहे. पण जो माणूस पुस्तकाच्या मुखपृष्ठात अडकून राहतो, तो त्या मूळ संदेशापर्यंत कधी पोचतच नाही. राजकारण, सत्तालालसा आणि समाजात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हे ग्रंथ हत्यारासारखे वापरण्याचा प्रकार वाढला आहे. यात बळी जातो तो सामान्य नागरिकांचा  जो धार्मिकतेपेक्षा माणुसकीला महत्त्व देतो, पण अशा विभाजनाच्या जाळ्यात अडकतो. मूळ समस्या ही धार्मिक ग्रंथ नव्हे, तर त्यांचं गैरवाचन (किंवा अजिबात न वाचन) आहे. शिक्षणाची उणीव, विवेकाचा अभाव आणि सत्तेच्या खेळींमुळे समाजात कृत्रिम तणाव निर्माण केला जातो. मग प्रश्न येतो  आपण खरोखरच आपल्या श्रद्धेला समजून घेतोय का? समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण धार्मिकतेच्या नावे उभ्या राहणाऱ्या भिंती पाडायला हव्यात वाचून, समजून, आणि विचार करून. फक्त गीता किंवा कुराण हातात घेऊन फोटो काढणं सोपं आहे, पण त्यातील तत्वज्ञान अंगीकारणं आणि आचरणात आणणं हेच खरं आव्हान आहे. आज गरज आहे ती वादाच्या नाही, संवादाच्या. आणि तो संवाद सुरू होईल जेव्हा आपण ग्रंथांना हत्यार न समजता, विचारांची शिदोरी मानू. कारण शेवटी गीता आणि कुराण कधीही भांडत नाहीत माणूसच ते वाचायचं टाळतो आणि मग संघर्ष सुरू होतो.

Maharashtra News: पुस्तकं नाही वाचणारे युद्धं पेटवतात Read More »

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ जुन २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक

Ahilyanagar Crime : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी (दि. 1 जून) रात्री 10 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना, फिर्यादीने येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदारावर गोळीबार केला. यामधील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. जामखेड येथील पोकळे वस्तीतील रहिवासी आदित्य बबन पोकळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री 10 वाजता विंचरणा नदीजवळ त्याच्या घरासमोर काही महिला आणि नागरिक बसले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी संबंधित ठिकाणी लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्यने त्यांना येथे लघवी करू नका, महिला आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिथे आलेल्या कुणाल बंडू पवार (वय 20, रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केला. गोळीबारात कुणाल जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ पाऊले उचलत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपली तपास यंत्रणा कार्यरत केली. हा गुन्हा प्रभू रायभान भालेकर (राहणार संभाजीनगर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. हे आरोपी नेवासा मार्गाने जात असल्याचे समजतच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभू रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी तातडीने पाऊले उचलत या घटनेतील सहा आरोपींना तत्काळ अटक केली आहे. या आरोपीने मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास जामखेड पोलीस करत आहे.

जामखेड येथे तरुणावर गोळीबार, सहा जणांना 24 तासांच्या आत अटक Read More »

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ मे २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस

Kajal Guru : नगर शहरामध्ये बोगस तृतीयपंथी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी लूटमार करून दमदाटी करत असल्याची घटना काही दिवसापासून घडत असून याबाबतची माहिती नागरिकांनी तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांना दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन काजल गुरु यांनी सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणले होते. यामध्ये सदरची व्यक्ती ही बोगस प्रकारे सर्वसामान्य नागरिकांनी कडून तसेच शहरातील सोने व्यापाऱ्यांकडून तसेच काही उद्योजकांकडून पैशांची लूटमार करून दमदाटी करत होती अशी माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरिकांची लूटमार देखील सदर व्यक्ती करत होती. त्यामुळे या व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदरचा व्यक्ती हा तृतीयपंथी नसून माणूस आहे. या व्यक्तीमुळे तृतीयपंथी समाज हा बदनाम होऊ नये म्हणून सदर व्यक्तीला चोप देत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. तर दुसरीकडे अशा प्रकारे कोणाची फसवणूक होत असेल तर तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शहरात बोगस तृतीयपंथी अन् व्यापाऱ्यांची लूट; जिल्हाध्यक्ष काजल गुरूंनी प्रकरण आणले उघडकीस Read More »

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती

Vaishnavi Hagwane : राजेंद्र हगवणेला शोधायला 3 पथक तयार करण्यात आले असून हगवणेला लवकरच अटक करणार येणार असल्याची माहिती सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली. तसेच आमच्यावर या प्रकरणात कोणाचाही दबाव नाही नाही आम्हाला कोणाचा फोन आला आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत आहोत. आरोपींना कोर्टात हजर करून पोलीस रिमांड वाढवून घेणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त पुढे म्हणाले की, शिवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते पुढील तपासासाठी आम्ही पाठवणार आहोत. त्यामध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं एक कारण दिलेला आहे आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेटमध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे. त्यानुसार आम्ही कलम 304 हे वाढवले आहे. त्यासोबतच हुंडाबळी 80(2), 108 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दोन आरोपी म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा यांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या तीन-तीन बनवल्या आहेत आणि त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. या गुन्ह्याचा जो सिक्वेन्स आहे जे पुरावे आहेत त्यानुसार या घटनेचा जो लेखाजोखा आहे मारहाण केल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त करण्यापर्यंतच्या दोन तासाचे अनेक पुरावे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे आज आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचं पोलीस रिमांड वाढवून घेणार आहोत. असं देखील ते म्हणाले. हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांच्या घरी असणारे पाच ते सहा सीसीटीव्ही कॅमेरे परिस्थितीजन्य पुरावे आहे. आजूबाजूला असणारे साक्षीदार यांना जमा करण्यास आम्हाला वेळ मिळाला आहे. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही आम्हाला कुणाचाही फोन आला नाही कायदेशीर पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. ही घटना जी आहे. एका महिलेचा असा दुर्दैवी आणि अत्यंत क्रूरतेने अंत झाला आहे त्यामुळे या घटनेकडे आम्ही अत्यंत गांभीर्याने पाहत असून अगदी बारकाईने सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशी माहिती देखील सुनील कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, आतापर्यंत काय काय घडलं? पोलिसांनी सांगितली A to Z माहिती Read More »

YouTuber Jyoti Malhotra येणार अडचणीत, लष्करी गुप्तचर आणि आयबीकडून होणार चौकशी

YouTuber Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोपाखाली हरियाणाची प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या ज्योतीची आता मिलिटरी इंटेलिजेंस आणि इंटेलिजेंस ब्युरो (IB) च्या पथकांकडून चौकशी केली जाईल. त्याच्याकडून जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. हिसारचे डेप्युटी एसपी कमलजीत यांच्या मते, ज्योती सतत एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती. जेव्हा त्याचे गॅझेट तपासले गेले तेव्हा अनेक संशयास्पद फाइल्स आणि चॅट्स आढळून आल्या. पोलिस आता त्याच्या फोनमध्ये सेव्ह केलेले पाकिस्तानी नंबर ट्रेस करत आहेत. प्रवास आणि बँक व्यवहारांचीही चौकशी तपास संस्था 2023 ते 2025 दरम्यान ज्योतीच्या प्रवास कारवायांची चौकशी करत आहेत. यामध्ये देशभरातील राज्यांच्या भेटी तसेच आठ परदेश दौऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, त्याला पैसे कुठून मिळाले आणि ते कसे खर्च झाले हे शोधण्यासाठी त्याच्या बँक खात्यांचीही चौकशी केली जात आहे. तपासातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ज्योती एकटी काम करत होती की दुसऱ्या कोणाच्या मदतीने ती भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला देत होती. या संदर्भात अटक केलेल्या इतर लोकांचा मोबाईल डेटा देखील कसून तपासला जात आहे. इतर संशयितांना अटक आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये हे समाविष्ट आहे: गजाला (पंजाब) यासीन मोहम्मद नोमन इलाही (कैराना, उत्तर प्रदेश) अरमान (26 वर्षांचा, नूह) देवेंद्रसिंग ढिल्लोन (वय 25 वर्षे, कैथल) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दानिश नावाच्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे आयएसआयसाठी भरती केले होते किंवा ते एकमेकांशी जोडलेले होते. संभाषण कोड भाषेत चौकशीदरम्यान, ज्योती आणि दानिशमधील संभाषण कोड नावांनी झाल्याचे उघड झाले. चॅट आणि कॉल लॉगमधून असे दिसून आले की पाकिस्तानी संपर्क त्यांच्या खऱ्या नावांऐवजी कोड शब्दांनी सेव्ह केले होते. सोशल मीडिया ते हेरगिरी पर्यंतचा प्रवास दानिश भारतातील अनेक सोशल मीडिया प्रभावकांच्या संपर्कात होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बाजूने प्रचार करण्यासाठी ज्योती देखील त्यापैकी एक होती. ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा संपूर्ण खर्च दानिशने केला होता, जो त्यावेळी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करत होता. कैराना: हेरगिरी नेटवर्कचा बालेकिल्ला? तपास यंत्रणा उत्तर प्रदेशातील कैराना भागावर लक्ष केंद्रित करत आहेत, जिथून नोमान इलाहीला अटक करण्यात आली होती आणि तो एक महत्त्वाचा आयएसआय एजंट असल्याचे म्हटले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील अनेक तरुण आयएसआयच्या संपर्कात आहेत आणि सीमेपलीकडे देशविरोधी कारवाया करत आहेत.

YouTuber Jyoti Malhotra येणार अडचणीत, लष्करी गुप्तचर आणि आयबीकडून होणार चौकशी Read More »

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Double-decker Bus Fire : गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी सकाळी एका डबल डेकर बसला भीषण आग लागली, ज्यामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मोहनलालगंजजवळील किसान पथावर हा अपघात झाला. ही बस दिल्लीहून बिहारला जात होती आणि त्यात 60 हून अधिक प्रवासी होते. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. अचानक बस धुराने भरली तेव्हा सर्वांना जाग आली. आग लागल्यानंतर चालक आणि कंडक्टर बसमधून उड्या मारून पळून गेले. आपत्कालीन गेट उघडला नाही त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही म्हणून अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. आगीची परिस्थिती आणि बचाव कार्य बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे लोक मदतीला आले. मात्र आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा 1 किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी तासन्तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आणि तपास सुरू केला. आगीचे कारण एका प्रवाशाने सांगितले की, गिअरजवळील ठिणगीमुळे आग लागली. आगीमुळे बस अवघ्या 10 मिनिटांत पूर्णपणे जळून खाक झाली. दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, आग लागल्यानंतर बसमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याने त्याच्या पत्नीला उठवले आणि दोघेही बसमधून बाहेर पडले.

मोठी बातमी! डबलडेकर बसला भीषण आग, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू Read More »

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे . तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू Read More »

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण, आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी मनीषा माने या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणी करताना सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी आरोपी महिलेला पोलीस कोठडी सुनावली आहे. माहितीनुसार, आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती मात्र तिला कामावरून काढल्याने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली. सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन, न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपी मनीषा माने हिच्यासोबत या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण, आरोपी महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी Read More »