DNA मराठी

ऑटोमोबाईल

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

Chandrakant Patil:  राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू

Trump Steel Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली, त्यांनी परदेशातून येणाऱ्या स्टीलवरील आयात शुल्क सध्याच्या 25 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याची घोषणा केली. नवीन शुल्क दर 4 जूनपासून लागू होणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील यूएस स्टीलच्या मोन व्हॅली वर्क्स-इर्विन प्लांटमध्ये ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे अमेरिकन स्टील उत्पादकांचे संरक्षण होईल आणि देशाच्या उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही ते 25 टक्क्यांनी वाढवत आहोत. आम्ही स्टीलवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत, ज्यामुळे अमेरिकेच्या स्टील उद्योगाला अधिक संरक्षण मिळेल.” चीनवर थेट हल्ला ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आणि म्हटले की अमेरिकेचे भविष्य “पिट्सबर्गच्या ताकदीने आणि अभिमानाने” बांधले पाहिजे, “शांघायच्या कनिष्ठ स्टीलवर” अवलंबून न राहता. हे विधान चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार तणावाचे अधिक स्पष्ट प्रतिबिंबित करते. उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता पोलादावरील आयात शुल्क दुप्पट केल्याने गृहनिर्माण, ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्रांसारख्या स्टीलवर अवलंबून असलेल्या उद्योगांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2018 पासून लागू केलेल्या स्टील टॅरिफनंतर आतापर्यंत स्टील उत्पादनांच्या किमती सुमारे 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ट्रम्प यांचे व्यापार संरक्षण धोरण सुरूच राष्ट्रपती ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या सातत्यपूर्ण व्यापार संरक्षण धोरणाचा एक भाग आहे. जानेवारीमध्ये पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ लादला होता, जो मार्चपासून लागू झाला. त्यांनी कॅनेडियन स्टीलवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकीही दिली होती, परंतु नंतर ती मागे घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू Read More »

iPhone16 Pro Max वर प्रचंड डिस्काउंट; होणार बंपर बचत; असा घ्या फायदा

iPhone 16 Pro Max : तुम्ही देखील iPhone 16 Pro Max खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात बंपर डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये iPhone 16 Pro Max घरी आणू शकतात. सध्या विजय सेल्समध्ये अँपल डेज सेल सुरू आहे ज्यामध्ये आयफोन 16 प्रो मॅक्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. सध्या तुम्ही हे डिव्हाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 18,700 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत खरेदी करू शकता. गेल्या वर्षी अँपलने हा हँडसेट भारतात 1,44,900 रुपयांच्या किमतीत सादर केला होता. या फोनमध्ये उत्तम डिस्प्ले, हाय लेव्हल कॅमेरे देण्यात आले आहे. याच बरोबर या फोनमध्ये अँपल इंटेलिजेंसचा सपोर्ट देखील उपलब्ध देण्यात आला आहे. iPhone 16 Pro Max डिस्काउंट ऑफर Apple iPhone 16 Pro Max सध्या विजय सेल्स वेबसाइटवर फक्त 1,30,650 रुपयांना विकला जात आहे. या सेलमध्ये या फोनवर 14,250 रुपयांची फ्लॅट सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून या हाय-एंड डिव्हाइसवर 4,500 रुपयांची अतिरिक्त सूट किंवा ICICI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे 3,00 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. याशिवाय, फोनवर 21 महिन्यांसाठी 6,250 रुपयांपासून सुरू होणारा EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. iPhone 16 Pro Max फीचर्स आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 2868 x 1320 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.9-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. नियमित आयफोन मॉडेलच्या तुलनेत, हे डिव्हाइस 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या प्रीमियम फ्लॅगशिप हँडसेटमध्ये Apple ची A18 Pro चिप आहे, जी 8GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये अँपल इंटेलिजेंस देखील दिसत आहे. iPhone 16 Pro Max कॅमेरा स्पेसिफिकेशन आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 48 एमपीचा प्राथमिक कॅमेरा आहे ज्यामध्ये 12 एमपीचा पेरिस्कोप टेलिफोटो आहे ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूम आहे आणि 48 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये 4,685mAh ची मोठी बॅटरी देखील आहे जी 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग देते.

iPhone16 Pro Max वर प्रचंड डिस्काउंट; होणार बंपर बचत; असा घ्या फायदा Read More »

सीमेवर पाकिस्तानचा कट फसला, बीएसएफने 5 बंकर उद्ध्वस्त केले

BSF Action on Pakistan: बीएसएफने जम्मू सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या कारवाईत बीएसएफने पाच पाकिस्तानी चौक्या आणि एक दहशतवादी लॉन्चपॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईची माहिती बीएसएफ कमांडंट चंद्रेश सोना यांनी दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये भारतीय गावे आणि चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत मस्तपूर भागात असलेले पाकिस्तानचे एक सक्रिय लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यात आल्याचे कमांडंट सोना यांनी सांगितले. याशिवाय पाकिस्तानच्या पाच चौक्या आणि अनेक बंकरनाही लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ते म्हणाले, “आम्ही त्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या अनेक संरचना उद्ध्वस्त केल्या. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का होता.” पाक सैन्य आणि रेंजर्सचे नुकसान बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 10 मे रोजी पाकिस्तानने भारतीय सीमेवर 61 मिमी आणि 82 मिमी मोर्टार डागले, ज्याचा वापर करून गावे, चौक्या आणि तैनाती स्थळांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. बीएसएफने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्सचे मोठे नुकसान केले. जखमींच्या हालचालींमुळे उघड झालेले नुकसान कमांडंट सोना म्हणाले की, कारवाईनंतर अनेक तासांपर्यंत पाकिस्तानी भागातून रुग्णवाहिकांची हालचाल दिसून आली, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे दिसून येते. महिला सैनिकांच्या शौर्याला सलाम ऑपरेशन सिंदूर दरम्यान महिला सैनिकांची भूमिका देखील कौतुकास्पद होती. कमांडंट म्हणाले की, प्रत्येक बीएसएफ बटालियनमध्ये महिला कॉन्स्टेबल तैनात आहेत आणि त्यांनी आघाडीवर राहण्याचा संकल्प केला आहे. त्याने मुख्यालयात परतण्याची विनंती केली नाही किंवा रजा घेतली नाही.

सीमेवर पाकिस्तानचा कट फसला, बीएसएफने 5 बंकर उद्ध्वस्त केले Read More »

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!”

Ahilyanagar News: नगर तालुक्यातील एका व्यावसायिकाच्या मुरूम संबंधित कामात तलाठी व अप्पर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून अक्षरशः एक लाख रुपयांचा ‘हंटर’ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्टाचाराचा हा प्रकार इतका संगनमताने पार पडला की सर्कलला बायपास करून तलाठी आणि ‘कडक’ साहेबांनीच आपापसात वाटणी केली. सदर व्यावसायिकाने मुरूम वाहतुकीसाठी शासकीय पावती भरून अधिकृत मुरूम उचललेला असतानाही, नव्याने आलेल्या अप्पर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. या दरम्यान, “35 ते 40 लाखांचा दंड होईल,” असा धाक दाखवून तलाठी साहेबांनी तो व्यावसायिक थेट गाऱ्हाणीच्या स्थितीत आणला. यानंतर प्रकरण एका लाखात मिटवण्यात आलं. यातील काही हिस्सा खिलाडी साहेबांचा तर काहीसा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्टपणे एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. “साहेब फार कडक आहेत, मी तुमचं काम करून देतो… कुणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील!” अशा सज्जड दमासह ही रक्कम स्वीकारण्यात आली. या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – हे सर्व ‘पंचनामा’ करून अधिकृतपणे मांडल्याचा देखावा करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात पैसे ‘खाल्ले’ गेले. रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येतं – “फर्स्ट पणे साहेबांसाठी एक लाख द्या… लवकर द्या…” कारवाई होणार का? हा प्रकार उघडकीस येताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. “निव्वळ दमदाटी करून भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल तयार केले आहे काय?” असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“तलाठ्याचा दम, साहेबांचा दंड – एक लाखात मुरूम प्रकरणाचा भ्रष्ट सौदा!” Read More »

राज्यात नवीन 1 लाख रोजगार येणार, ‘या’ प्रकल्पांना सरकारची मान्यता

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३२५ उद्योग प्रस्तावांना मंजुरी; १ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, ९३ हजार रोजगारांची अपेक्षा राज्य शासनाच्या उद्योग धोरणांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ उद्योग प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंजुरी दिलेल्या प्रस्तावांमुळे एकूण ₹१,००,६५५.९६ कोटींची गुंतवणूक आणि सुमारे ९३,३१७ नवीन रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. उद्योग विभागाच्या अधीन येणाऱ्या खालील धोरणांचा कालावधी संपला आहे: नवीन धोरणे ठरवण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून, दरम्यानच्या काळात विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रस्तावांना प्रोत्साहन मंजूर करण्यास वित्त विभागानेही हिरवा कंदील दाखवला आहे. मंजूर करण्यात आलेले प्रमुख प्रस्ताव: 🔹 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ अंतर्गत: 🔹 अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण २०१८ अंतर्गत: 🔹 फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण २०१८ अंतर्गत: राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धोरणांचा कालावधी संपला असतानाही महत्त्वाचे औद्योगिक प्रकल्प रखडणार नाहीत, तसेच गुंतवणूकदारांना वेळेत प्रोत्साहने मिळून उद्योग सुरू करता येतील, अशी माहिती मंत्रिमंडळानंतर देण्यात आली.

राज्यात नवीन 1 लाख रोजगार येणार, ‘या’ प्रकल्पांना सरकारची मान्यता Read More »

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा

Ahilyanagar News: अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 20 मे रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन वेळा खंडीत झाल्याने पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. तर दुसरीकडे बूधवार 21 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार 22 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर 22 मे रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार 23 मे रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे.

नगरकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ भागात आज होणार नाही पाणीपुरवठा Read More »

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या

Pratap Sarnaik : मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑन लाईन बदल्या करण्यात आल्या. व संदर्भात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, ऑनलाइन बदल्या करतांना अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाऊन घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑन लाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑन लाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी. असे ते म्हणाले.तसेच यावेळी गतवर्षी राबविलेल्या ऑन लाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या Read More »

… तर कलम 142 लागू केले असते, कार्यक्रमादरम्यान भडकले सरन्यायाधीश बीआर गवई

CJI BR Gavai : भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांनी त्यांच्या अलीकडील महाराष्ट्र दौऱ्यात राज्य प्रशासनाकडून अपेक्षित आदर न मिळाल्याबद्दल नाराजी जाहीर केली आहे. बीआर गवई रविवारी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की, मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मुख्य सचिव, पोलिस महासंचालक (डीजीपी) किंवा मुंबई पोलिस आयुक्तांसारखे राज्य सरकारचे उच्च अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित नव्हते. सरन्यायाधीश गवई यांनी त्यांच्या निवेदनात लोकशाहीचे तीन स्तंभ, न्यायपालिका, कार्यकारी आणि कायदेमंडळ यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे यावर भर दिला. ते म्हणाले, “जर महाराष्ट्राचा नागरिक देशाचा सरन्यायाधीश बनला आणि तो पहिल्यांदाच त्याच्या मूळ राज्यात आला, तर प्रोटोकॉलनुसार, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असते. जर त्यांना ते योग्य वाटत नसेल, तर त्यांनी त्याचा विचार करावा.” प्रोटोकॉल ही केवळ औपचारिकता नाही, तर ती आदराचे प्रतीक आहे. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, प्रोटोकॉल ही केवळ औपचारिक प्रक्रिया नाही तर ती संवैधानिक पदांमधील परस्पर आदराचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, एका संवैधानिक संस्थेने दुसऱ्या संस्थेला दिलेला हा सन्मान लोकशाहीची प्रतिष्ठा राखतो. या मुद्द्यावर भाष्य करताना गवई विनोदाने म्हणाले, “जर माझ्या जागी दुसरे कोणी असते तर त्यांनी कलम 142 वापरण्याचा विचार केला असता.” कलम 142 काय आहे? त्यांच्या निवेदनात, सरन्यायाधीश गवई यांनी भारतीय संविधानाच्या कलम 142 चा उल्लेख केला, जो सर्वोच्च न्यायालयाला न्यायाच्या उद्दिष्टांची खात्री करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही आदेश देण्याचा अधिकार देतो. या कलमाअंतर्गत, सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही पक्षाला समन्स बजावण्याचा, कारवाई थांबवण्याचा किंवा निर्देश देण्याचा अधिकार आहे. ही तरतूद भारतीय न्यायव्यवस्थेच्या शक्तीचे प्रतिबिंब आहे, जी सरन्यायाधीशांनी प्रतीकात्मकपणे वापरली होती. गवई म्हणाले की ते सहसा अशा बाबींवर बोलत नाहीत, परंतु यावेळी त्यांनी ते नमूद केले जेणेकरून लोकांना कळेल की संवैधानिक पदांचा आदर करणे का महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, हा मुद्दा छोटा असू शकतो, पण लोकशाही रचनेच्या स्थिरतेवर त्याचा मोठा परिणाम होतो. गेल्या आठवड्यात भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणारे बीआर गवई हे हे पद भूषवणारे दुसरे दलित आहेत. यापूर्वी, न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांनी हे पद स्वीकारले आहे.

… तर कलम 142 लागू केले असते, कार्यक्रमादरम्यान भडकले सरन्यायाधीश बीआर गवई Read More »

Solapur Fire: मोठी बातमी! सोलापूरच्या एमआयडीसीत भीषण आग, 8 जणांचा मृत्यू

Solapur Fire: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, सोलापूर येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या टॉवेल कारखान्यात काल (रविवार, 18 मे) भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. बचाव कार्यात अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके म्हणाले की, टॉवेल कारखान्यातील भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना 17 तास लागले.

Solapur Fire: मोठी बातमी! सोलापूरच्या एमआयडीसीत भीषण आग, 8 जणांचा मृत्यू Read More »