Dnamarathi.com

BJP News: शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे  दिला आहे.

तुषार वैद्य यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मला शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली होती. दिलेल्या पदाचा मी पक्ष वाढीसाठी माझ्यापरीने प्रयत्न केला दरम्यानच्या काळात लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे सांगून लोकांपर्यंत पोहचवण्याच काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही. कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते.

स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. नंतर मी देखील माझ्या परीने अगदी प्रामाणीकपणे पक्षनीष्टा जोपासून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले. 

२०१४ विधानसभेसाठी आ. मोनिकाताईना पक्षाने संधी दिली, २०१९ ला दिली आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सौख्य राहीले नाही. आम्ही पटले नाही तरी पक्षाचा उमेदवार म्हणून काम केले परंतु स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जी.प., पं. स. तसेच ग्रामपंचायत मध्ये राजळे गटाने जुन्या भाजपाला कायम विरोध केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा या वेळी २०२४ ला विधानसभेच्या पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला म्हणजे अरुण भाऊ मुंढे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा आग्रह आम्ही म्हणजे जवळपास ८० % जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु त्याला यश आले नाही. पक्षाने मोनिकाताईंना उमेदवारी दिल्याने मागील १० वर्षाचा अनुभव पाहता आम्हाला मीळालेली वागणूक पाहता यावेळी आमच्या विचारांच्या लोकांनी मोनिकाताईचे काम करण्याची मानसीकता राहीली नव्हती. म्हणून मी व आमच्या विचारांच्या लोकांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथून मागे प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. आम्ही जरी पक्षाचा उमेदवार या नात्याने काम केले असते तरी त्यांनी ते मान्य केले नसते म्हणून शांत बसलो विधानसभेला पक्षासाठी काम केले नाही.  मी पदावर असून देखील मी या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे.  असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

पक्षवादीसाठी यांना देखील करावे लागले संघर्ष…..!
स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. त्यांना सहकार्य लाभलेल्यांमध्ये स्व. भाऊसाहेब कोल्हे, पांडुरंग लांडे, भीमराज सागडे, तानाजी मालुसरे, डॉ. सोनाजी लांडे, स्व. विष्णुपंत देहडराय, काशीनाथ चौधरी, पांडुरंग मिसाळ, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, कचरू चोथे, अरून मुंढे, विक्रम देशमुख, स्व. अंकुश केसभट, अशोकशेठ आहुजा, बंडूशेठ रासने, विजय देवळालीकर, राजाभाऊ लड्डा, छोटूशेठ लड्डा. शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोंढे, बापूसाहेब पाटेकर, नितीन काकडे, विनायक खेडकर, परशुराम गरड, स्व. सखाराम निर्मळ, गोपाळशेठ शर्मा, हरिभाऊ झुंबड, शब्बीरभाई राक्षीवाले, मारुतराव नागरे, स्व. गहीनीनाथ ढाकणे, बबनराव ढाकणे, आविनाश मगरे, पंडीतराव नेमाने, गोविंदराव बर्डे, रवी तानवडे, संजय टाकळकर, उद्धव काजळे, डॉ. मंत्री तसेच बालमटाकळी मधील अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *