Suresh Dhas: मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लावला आहे.
माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही.या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे प्रकरणात माझी भूमिका एकच आहे. असं सुरेश धस म्हणाले.
तसेच माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही. माझ्या मतदारसंघातला 95 टक्के दलित बांधव माझ्यासोबत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये. आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. असेही धस म्हणाले.
परळी सोडून गेलेले व्यापारी बोलायला घाबरत आहेत. पंकजा मुंडेंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष राखेवर द्या.परळीत द्या गायरान जमिनी हडप केले आहेत तिथे द्या. असेही या पत्रकार परिषदेत सुरेश धस म्हणाले.